टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स कोणासाठी आणि का महत्त्वाचे आहे? तो कधी काढला पाहिजे? टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

तुमचा परिवार तुमच्यावर अवलंबून आहे का? तुम्ही घरामध्ये एकटेच कामवता का? तुमच्या वर काही कर्ज आहे का? तुमचे उत्पन्न कमी आहे का? यापैकी एक तरी गोष्ट तुम्हाला लागू होत असेल तर तुम्हाला तर टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

आजकालच्या धावपळीच्या जगात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. आपण बघत आहोत सध्या जगामध्ये महामारीमुळे, अपघातामुळे, आजारामुळे, अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अशा मध्ये आपल्या परिवाराची आर्थिक बाजू भक्कम करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.

आजचे लेखामध्ये आपण बघणार आहोत टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्सुरेन्स कोणासाठी महत्त्वाचे आहे आणि का? व कधी काढला पाहिजे? आणि टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे. मला खात्री आहे हा लेख वाचल्यावर टर्म इन्शुरन्स बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील.

पहिला प्रश्न आहे टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? तर टर्म इन्शुरन्स एक प्रकारची लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असते ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या इन्शुरन्स या काळात तुम्हाला काही झाले तर तुम्ही घेतलेल्या टर्म इन्शुरन्स ची रक्कम तुमच्या नॉमिनी ला मिळते. उदाहरण बघायचे झाले तर समजा एका व्यक्तीने तीस वर्षाचा असताना एक करोड चा टर्म इन्शुरन्स काढला, त्याचा कालावधी साठ वर्षापर्यंत आहे.

दुर्दैवाने वयाच्या चाळिसाव्या वर्षी या व्यक्तीचा मृत्यू होतो. आता त्याच्या परिवाराला टर्म इन्शुरन्स चे एक करोड रुपये मिळतील. टर्म इन्शुरन्स ही सर्व लाइफ इन्शुरन्स पैकी स्वस्त पॉलिसी आहे. टर्म इन्शुरन्स मध्ये कुठलाही मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे तुमची पॉलिसी संपल्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम जितक्या जास्त कालावधी साठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तितक्या कालावधीसाठी तितकी वर्षे तुमचा परिवार सुरक्षित होतो,

पण जितक्या जास्त कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तेवढे तुमचे वार्षिक प्रिमियम ची किंमत सुद्धा वाढत जाते. टर्म इन्शुरन्स चा प्रीमियम तुम्ही वेगळ्या प्रकारे भरू शकता. जसे की इयरली प्रत्येक वर्षाला, हाफ इयरली म्हणजे प्रत्येक सहा महिन्याला, क्वाटरली म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला किंवा मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला.

दुसरा प्रश्न टर्म इन्शुरन्स कोणासाठी महत्त्वाचे आहे आणि का? टर्म इन्शुरन्स हे अशा व्यक्तींसाठी महत्वाचे आहे ज्यांच्यावर परिवाराची संपूर्ण जबादादरी असते आणि त्यांनतर दुसऱ्या व्यक्ती ती जबाबदारी लगेच पेलू शकणार नाही. हि पूर्णपणे तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी काढलेली पॉलिसी आहे. म्हणजे तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू नये हा त्यामागचा उद्देश.

तुम्ही घेतलेले कर्ज असेल तुमच्या परिवाराची आरोग्य असेल, तुमच्या मुलांची शिक्षण व त्यांची लग्न असतील त्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि अचानक तुम्हाला काही झालं की मग तुमच्या परिवाराला ह्या जबाबदारी सांभाळणे अवघड जाते आणि मग त्यांना पावलोपावली संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुम्ही असताना टर्म इन्शुरनस काढला तर तुमचा परिवार या सगळ्या संकटातून सुरक्षित होऊन जातो.

तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी वीस पॅट जास्त असावा म्हणजे समजा तुमचे उत्पन्न वर्षाला एक लाख आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर कमीत कमी 20 लाखांचा पाहिजे आणि समजा तुमचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपर्यंत आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर दोन करोड पर्यंत पाहिजे. टर्म इनशुरन्स कव्हर म्हणजे तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला मिळणारी रक्कम.

तिसरा प्रश्न इन्शुरन्स कधी काढला पाहिजे? टर्म इन्शुरन्स तुम्ही वयाच्या जेवढ्या लवकर काढाल तेवढं चांगलं म्हणजे वयाच्या 25 ते 30 वर्षांमध्ये. कारण टर्म इ्शुरन्स कढायला तुम्ही जितका उशीर कराल तेवढा तुमचा प्रीमियम वाढत जातो. पण तुम्ही लवकर इंसुरेन्स काढला तर शेवटपर्यंत तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो.

म्हणून जेवढे कमी वयात तुम्ही टर्म इन्शुरन्स काढाल तेवढे चांगले. टर्म इनशुरन्स काढताना तुम्हाला कोणता आजार असेल किंवा कसलेही व्यसन असेल तर तुम्हाला निरोगी किंवा निर्व्यसनी व्यक्ती पेक्षा जास्त प्रमिअम भरावा लागतो.

चौथा प्रश्न टर्म इन्सूरेन्स कुठून काढला पाहिजे? टर्म इन्शुरन्स आपण दोन प्रकारे काढू शकतो ऑफलाइन आणि ऑनलाइन. ऑफलाइन आपल्याला नेहमी महाग पडतो कारण तो आपल्याला एजंट मार्फत काढावा लागतो आणि त्यामध्ये एजंटचे कमिशन सुद्धा आपल्याला द्यावे लागते. ऑनलाईन काढण्यासाठी एक ट्रस्टएड प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तो म्हणजे पॉलिसी बाजार. पॉलिसी बाजार वर टर्म इन्शुरन्स काढायचा कसा.

इथे तुम्हाला सुरुवातीला काही माहिती भरायची आहे जसे की तुम्ही मेल (पुरुष) आहात का फिमेल(स्री) आहात तुमचं पूर्ण नाव तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर, ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली क्लिक करायचा आहे. इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील जसे की डु यू स्मोक म्हणजे तुम्ही स्मोकिंग करता का? किंवा तंबाखू खाता का? तुमचे वार्षिक उत्पन्न काय आहे?

म्हणजे सिलेक्ट युअर ऍनुअल इन्कम, तुम्ही सॅलरीड आहात का? की सेल्फ एम्प्लॉइड आहात? तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण? तुम्ही महाराष्ट्र मध्ये राहता का? ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे अनेक इन्शुरन्स कंपन्यांची यादी दिसेल. पॉलिसी बाजार वर 20 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनी आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसत असतील. जसे की लाइफ कव्हर तर आपण मघाशी पाहिलं की तुमचा लाइफ कव्हर तुमच्या उत्पन्नापेक्षा 20 पट जास्त पाहिजे आणि इथे कव्हर टील एज ते म्हणजे तुमचा कव्हरेज म्हणजे तुम्हाला किती वर्षापर्यंत पाहिजे?

तिथे तुम्ही शंभर वर्षापर्यंत सुद्धा सिलेक्ट करू शकता उदाहरणार्थ मी माझ्यासाठी एक करोड सिलेक्ट करतोय आणि कव्हर टिल एज मी 80 वर्ष सिलेक्ट करतो. आता मला वेगवेगळ्या कंपन्या दिसतील जे मला ह्या माझ्या पर्यायानुसार मला टर्म इन्शुरन्स द्यायला तयार असतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापैकी माझ्यासाठी योग्य कंपनी कोणती आहे इथे आपण बघू शकतो.

मॅक्स लाइफ इन्शुरन्स आणि टाटा ए आय ए आहे या दोघांचा प्रीमियम सारखा आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो. इथे मॅक्स लाइफ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट रेशओ आहे 99.4 टक्के आणि टाटा ए आय ए चा आहे 98 टक्के. म्हणजे काय ज्या वेळेस कंपनीकडे शंभर एप्लीकेशन क्लेम सेट्टेलमेंटसाठी आले त्यावेळेस मॅक्स लाइफ इन्शुरन्स त्याच्यामधले 99.4% क्लेम सेटेल केले. म्हणजे माझ्यासाठी मला असं वाटतं की ही कंपनी योग्य आहे.

पॉलिसी बाजार वर तुम्हाला त्यांचा अस म्हणणं आहे तुम्हाला सर्वात कमी मिळतो, याचा ते अस्सुरेन्स देतात याशिवाय तुम्हाला ट्वेंटी फोर सेवन(24/7) क्लेम असेसमेंट सपोर्ट मिळतो. म्हणजे काय तुम्हाला क्लेम सेटल करायचा असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडे जायची गरज नाही. तुम्ही यांच्या आणि क्लेम असिस्टंट सपोर्टला कधीही कॉल करून तुमचं काम करू शकता. इथे तुम्ही वेगवेगळ्या रायडर सुद्धा घेऊ शकता.

जसे की एक्सीडेंट रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर, ज्याच्या मध्ये एकूण 60 पेक्षा जास्त क्रिटिकल इलनेस कवर केलेले आहेत. त्या शिवाय इथे तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असाइन होतो. म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला एक मॅरेजर असाइन होतो, तो तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतो आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतो.

याच्या व्यतिरिक्त टर्म इन्शुरनस चा प्रीमियम तुम्ही तिच्या अंडर टॅक्स बेनिफिट साठी दाखवू शकता. आता समजा मी ठरवलं आहे की मला मॅक्सलाइफ चा हा प्लॅन आवडला आहे. मी काय करेल मी मॅक्स लाइफ वर क्लिक करतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला माझी माहिती भरायची आहे आणि फक्त प्रोसीड म्हणायचं आहे. तियोग्य माहिती भरून तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी बाजार वर काढू शकता.

टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? : मुदतीनंतर लाभ मिळणार नसला तरीही आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना जोखीम कमी करणारा म्हणून महत्त्वाचा असा हा प्रकार आहे. तो घेण्याचा निर्णय झाल्यावर या गोष्टींवर जरुर लक्ष द्या. इथं एक जरी हप्ता चुकला तरी विमा पॉलिसी रद्द होण्याची भीती असते त्यामुळे हप्ता नियमित भरा. टर्म इन्श्युरन्स घेताना फॉर्म बिनचूक भरा. तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर तसं न चुकता लिहा. त्यामुळे नॉमिनीला पैसे मिळताना अडचण येणार नाही. स्वत:विषयी खरीखुरी माहिती द्या.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.