‘अपहरण’ नाट्यावर बेतले आहेत हे बॉलिवूड सिनेमे, यातील तुमचा आवडता कोणता ?

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

क्राईम थ्रिलर सिनेमे आवडणारे तुमच्या आमच्यापैकी बरेच जण आहेत. पण या थ्रिलरमध्ये खरी रंगत आणतात ते किडन्यापिंग म्हणजेच अपहरण नाट्यावर बेतलेले सिनेमे.
बॉलिवूडमध्ये या सिनेमांनी स्वत:चा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. या सिनेमात प्रत्येक क्षणाला वाढणारी उत्कंठा, अपहरणकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये रंगणारा पाठशिवणीचा खेळ हे पाहताना वेगळीच रंगत येते. आम्ही तुमच्यासाठी असे सिनेमे घेऊन आलोत जे अपहरण नाट्यावर बेतले आहेत. तुमचा यातील आवडता सिनेमा कोणता जरुर सांगा

तीन – अमिताभ बच्चन, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने सजलेला सिनेमा म्हणजे तीन. आजोबांची आपल्या अपहरण झालेल्या नातीला शोधण्यासाठी चाललेली धडपड या सिनेमात दिसली आहे.

TE3N Movie Review - Movies News

हायवे – दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या उत्तम दिग्दर्शनाने सजलेला आणखी एक सिनेमा म्हणजे हायवे. रणदीप हुडा आणि आलियाच्या अभिनयाने या सिनेमा नटला आहे. श्रीमंत वीराचं ट्रक ड्रायव्हर असलेला महावीर अपहरण करतो आणि स्टॉकहोम सिंड्रोमचा नवा अध्याय सुरु होतो. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Highway - Disney+ Hotstar

मदारी – दिवंगत अभिनेता इरफान खानच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा आजही अनेकांचा आवडता आहे. मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक निशिकांत कामतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. गृहमंत्र्यांच्या मुलाचं अपहरण होतं. त्यानंतरच त्यामागचं कारण समोर आल्यावर अनेकांना विचारात पाडणारा हा सिनेमा आहे.

MADAARI Full Hindi Movie | Cinekorn Movies 2020 | Irrfan Khan, Jimmy  Shergill - PassMaga

जज्बा – आई झाल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा हा कमबॅक सिनेमा आहे. या सिनेमात ती कमालीची सुरेख दिसली आहे. अनुराधा वर्मा या वकिलाच्या व्यक्तिरेखेत ती दिसली आहे. या सिनेमात ती मुलीच्या अपहरणकर्त्यांशी लढताना दिसली आहे. या सिनेमात तिच्या शिवाय इरफान खान, शबाना आझमी जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत.

Jazbaa Full Movie | Aishwarya Rai- irrfan Khan | Jazbaa(2015) Hindi Movie -  YouTube

मर्दानी – राणी मुखर्जीने साकारलेली शिवानी शिवाजी रॉय या सिनेमात भाव खाऊन गेली. या सिनेमात ह्युमन ट्रॅफिकींग आणि अपहरण यावर प्रकाश टाकला आहे. राणी यात पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली आहे. या सिनेमाचा सिक्वेलही आला आहे.

Mardaani Full Movie HD Watch Online - Desi Cinemas

रावण – ऐश्वर्या – अभिषेक या जोडीचा सिनेमा. या सिनेमात अभिषेकच्या व्यक्तिरेखेने विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता विक्रमही दिसला होता.

Raavan (2010) - IMDb

किडनॅप – अभिनेता इम्रान खानच्या नकारात्मक भूमिकेने सजलेल्या या सिनेमात देखील किडनॅपिंग ड्रामा रंगला आहे. मुलीच्या अपहरणकर्त्याशी दोन हात करणा-या पित्याच्या भूमिकेत संजय दत्त दिसला आहे.

Kidnap (Original Motion Picture Soundtrack) Songs Download: Kidnap  (Original Motion Picture Soundtrack) MP3 Songs Online Free on Gaana.com

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.