या अभिनेत्रींचं भारतीय सेनेशी असलेलं कनेक्शन तुम्हाला माहिती आहे का?
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
भारतीय सेना ही तुमच्या आमच्या अभिमानाचा भाग आहे. आजवर भारतीय सेनेच्या प्रत्येक यशाचा, कर्तृत्वाचा आजवर प्रत्येक देशवासियांना गर्व वाटत आला आहे.
आर्मीत असलेल्या व्यक्तींच्या घरच्यांनाही त्यांच्या प्रोफेशनचा देशसेवेचा अभिमान वाटत असणारच यात शंका नाही. तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडच्या अनेक तारकाही भारतीय सैन्यअधिका-यांच्या घरातून आल्या आहेत.
विविध आर्मी स्कूलमध्ये शिक्षण झाल्याने या अभिनेत्रींच्या अंगी असलेल्या शिस्तीचा करिअरमध्ये उपयोग झाला असल्यास नवल नाही. आर्मी बॅकग्राउंड असलेल्या या अभिनेत्री कोणकोणत्या आहेत ते पाहू-
प्रियांका चोप्रा – माजी मिस वर्ल्ड असलेली प्रियांका चोप्रा ही देखील आर्मी बॅकग्राउंड असलेल्या घरातून आली आहे. विशेष म्हणजे प्रियांकाचे आई- वडिल या दोघांनीही इंडियन आर्मीसाठी सेवा बजावली आहे. डॉ. अशोक चोप्रा आणि डॉ. मधू चोप्रा या दोघांनीही आर्मीमध्ये डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे.
प्रिती झिंटा- प्रिती तिच्या आयुष्यातील मल्टीटास्कींगचं श्रेय तिच्या आर्मी बॅकग्राऊंडला देते. प्रितीचे वडील दुर्गानंद झिंटा हे मेजर या पदावर कार्यरत होते. याशिवाय तिचा भाऊही आर्मीमध्ये कार्यरत आहे.
लारा दत्ता- माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताही सैन्याची पार्श्वभूमी अभिमानाने मिरवते आहे. लाराचे वडील सेवानिवृत्त विंग कमांडर एल. के दत्ता आहेत. तर तिची मोठी बहीण भारतीय हवाई सेनेत कार्यरत आहेत. एअरफोर्स क्लबमधील सभाधीटपणाचा लाभ सौंदर्यस्पर्धांवेळी अनेकदा झाल्याचं तिने शेअर केलं.
अनुष्का शर्मा – अनुष्काचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा यांनी देखील देशातील विविध ठिकाणी सैन्यदलात सेवा बजावली आहे. कंटोंमेंटमधील शाळांमध्ये अनुष्काने आपले बरेचसे शिक्षण पुर्ण केले आहे.
नेहा धुपिया – नेहाचे वडील कमांडर प्रदीप सिंग धुपिया यांनी भारतीय नौदलासाठी सेवा बजावली आहे. नेहा तिच्या शिस्तप्रिय आयुष्याचं श्रेय प्रदीप सिंग धुपिया यांना देते.
सुश्मिता सेन – सुश्मिता सेनचे वडील सेवानिवृत्त विंग कमांडर सुबीर सेन. सुश्मिताचं शिक्षण देशभरातील विविध एअर फोर्स स्कूलमध्ये झालं आहे. सुश्मिता आपल्या जडण घडणीत आणि निर्णय प्रक्रियेतील ठाम असण्यावर वडिलांच्या शिकवणुकीचा प्रभाव असल्याचं सांगते.
गुल पनाग – टेलिव्हिजनचा गोड चेहरा अशी ओळख असलेली गुल पनागचे वडील लेफ्ट. जनरल एच. एस. पनाग यांनी देशासाठी देशांतर्गत आणि देशाबाहेरही सेवा बजावली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या सिरीजमध्ये ती एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.