घर बसल्या पॅन कार्ड दुरुस्ती कशी करायची? जाणून घ्या

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पॅन कार्ड दुरुस्ती मध्ये तुम्ही नाव दुरुस्ती करू शकता, जन्मतारीख दुरुस्ती करू शकता, एड्रेस, पत्ता दुरुस्ती करू शकता, फोटो आणि सिग्नेचर सुद्धा तुम्ही बदलू शकता, तसेच यामध्ये जर E-PAN तुम्ही कधी काढला असेल, तर तुम्हाला फादर नेम तुम्हाला ऍड करायचं असेल, तर फादर नेम सुद्धा ऍड करू शकता. सर्व पॅन कार्ड दुरुस्ती तुम्ही ऑनलाईन घरबसल्या एकदम सोप्या पद्धतीने करू शकता.

पॅन कार्ड दुरुस्ती करण्याची प्रोसेस, खाली अगदी सरळ आणि सोप्या भाषेत दिली आहे.

Process

📍 सर्वात पहिल्यांदा NSDL वेबसाईट वरती जायचं.

📍 वेबसाइटची लिंक मध्ये ऑनलाइन PAN एप्लीकेशन मध्ये एप्लीकेशन टाईप आहे, तो तीन नंबरचा, जो आहे चेंजेस ओर करेक्शन इंन एक्झीटींग PAN.

📍हा निवडल्यानंतर कॅटेगिरी “individual” येणार आहे.

📍त्यानंतर “Applicant इन्फॉर्मेशन”. Applicant इन्फॉर्मेशन मध्ये तुमची इन्फॉर्मेशन टाकायचे असते. ज्यामध्ये पहिल्यांदा title सिलेक्ट करायचं. जर तुम्ही पुरुष असेल तर श्री निवडा, स्त्री असेल तर श्रीमती आणि लग्न नसेल झाले एखाद्या स्त्रीचं तर कुमारी निवडायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. तर जे असेल ते तुम्ही निवडायचे.

📍 त्याच्यानंतर “Last name” (आडनाव )सरनेम आपण म्हणतो. त्याच्यानंतर First name आणि middel name, असे एकदम व्यवस्थित टाका. स्पेलिंग वगैरे एकदम व्यवस्थित टाका. जे तुम्हाला चेंज करायचे आहे ते टाका. जे बरोबर नाव आहे, तुमचं ते तुम्हाला टाकायच आहे.

📍 त्याच्यानंतर जी “डेट ऑफ बर्थ” तुमचे आहे तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे.

📍 त्यानंतर “ईमेल आयडी” सुद्धा तुम्हाला टाकून द्यायचं आहे. कोणताही ईमेल आयडी तुम्ही टाकु शकता. मोबाईल नंबर जो चालू आहे, तो मोबाईल नंबर तुम्ही तर टाकून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला इंडिया मध्ये “yes” करायच आहे. आपण इंडियन citizen असल्यामुळे yes करायचे आहे.

📍आणि त्यानंतर तुमचा नंबर जो PAN CARD नंबर आहे. तो पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागतात. “Terms& condition” आहे ते एक्सेप्ट करायचा.आणि त्यानंतर खाली येऊन “capche” टाकायचा आहे. तो जसा आहे, तसा खाली टाकायचा. आणि त्यानंतर तुम्हाला “सबमिट” करायचं आहे. हे डिटेल्स जी तुमची बरोबर आहेत तीच इथे टाकायचे आहेत.

📍Submit केल्या नंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल. तो टोकन नंबर फक्त Save करून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला लागू शकतो.

📍 त्यानंतर आता “कंटिन्यू विथ पॅन एप्लीकेशन फॉर्म” या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ॲप्लिकेशन वर क्लिक करतात, तेव्हा तुमच्या समोर ज्या चार स्टेप्स येतात त्या तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तीन ऑप्शन वरती दिसतील. तर पहिला ऑप्शन समजून घ्यायचा, तो म्हणजे “पेपरलेस”. म्हणजे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स पाठवायची गरज नाही.

अपलोड करायची सुद्धा गरज नाहीये. दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर फक्त चेंज करायचे असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील, फोटो अपलोड करावे लागेल. आणि तिसरा ऑप्शन जर तुम्ही select केला तर, तिथे तुम्हाला Aadhar card ला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील आणि पाठवावे लागतील. हे 3 ऑप्शन व्यवस्थित समजून घ्या. मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करणाऱ्यांमध्ये आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे पूर्णपणे पेपरलेस आहे डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करण्याची गरज नाही.

📍 हे इकडे केल्यानंतर तुम्हाला खाली जायचंय .खाली येतो तेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचय “वेदर फिजिकल PAN card” म्हणजे तुम्हाला पोस्टाने पॅनकार्ड हवा आहे का? तर “yes” ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर “परमनंट अकाऊंट नंबर” हा व्यवस्थित आहे? का इथं चेक करून घ्या.

त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं. खाली तुम्हाला जर आधार नंबर बदलायचा असेल, तर टिक करायचे आहे. पण आधार कार्ड नंबर बदलायचा नाहीये , तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय आहे की yes ऑप्शनवर क्लिक करायच आहे.

हे करून तुम्हाला फक्त फोर डिजिट जो शेवटचा Aadhar नंबर असतो.तो आधार फोर डिजिट तुम्हाला टाकायचे आहे बाकी दुसरं काहीच टिक करायचं नाही आहे .

📍त्यानंतर पुन्हा खाली यायचं. खाली आल्यानंतर “Full name”. जर तुम्हाला नावांमध्ये करेक्शन करायचा असेल, तर तिथे बॉक्स वरती तुम्हाला लिव रंगाचं क्लिक करायचं आहे. नसेल करायचे तर तुम्ही काढू शकतात. त्यानंतर तुम्हाला जे नाव आहे ते नाव सुद्धा व्यवस्थित टाकून द्यायच आहे. नसेल टाकायचं तर काढून टाका.

📍त्यानंतर “जन्मतारीख”. जन्मतारीख तुम्हाला बदलायची असेल तर ठीक करायची. नसेल करायचे तर सोडून द्यायचं. असेल तर वरती बॉक्स मध्ये ठीक करायचे नसेल तर सोडून द्यायचं. जर आपल्याला नाव बदलायचं असेल, नाव जन्मतारीख आणि gender. जे काही बदलायचं असेल ते तुम्ही चेक करायचे.जर जन्मतारीख बदलायची तर त्याच्यावर क्लिक करायचं.

📍 त्याच्यानंतर पॅन कार्ड वर फादर नेम नसेल तर ते तुम्हाला टिक् करायची आहे. डिटेल्स ऑफ पेरेंट्स बॉक्स वरती क्लिक करायचं आणि जे फादर नेम असेल तुमच ते टाकायचे. किंवा हजबंड नेम असेल ते तुम्हाला तिथे टाकून द्यायचं आहे. ती प्रोसेस झाल्यानंतर उजव्या बाजूला अगदी वरती सेव हा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर next करायचं.

📍Next केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स द्यायची आहेत.
पर्सनल डिटेल्स हि दुसरी स्टेप आहे,ज्यामध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे. तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्हाला Address बदलायचा असेल तर तुम्हाला Address proof द्यायचा आणि त्यानंतर ब्लू रंगांमध्ये जी ठीक आहे ति ठीक करून तुम्हाला तुमचा जो ऍड्रेस प्रूफ असेल तो अपलोड करावा लागेल.

📍दुसरा ऑप्शन आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुम्हाला बदलायचा आहे का? असेल बदलायचा तर ठीक करायचं , नसेल तर काढून टाकायचं तर आपल्याला बदलायचा असेल तर तुम्हाला तिथे टीक करावे लागेल आणि त्याच्यानंतर इंडिया सिलेक्ट करून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. तर आपल्याला इथे बदलायचा आहे त्यामुळे टीक करा. Address बदलायचा असेल तर वरच्या ऑप्शन वर क्लिक करू शकता.

त्यानंतर तुम्हाला तिथे खाली यायचंय. खाली 1 ऑप्शन आहे जो काही कामाचा नाही. जर आपल्याला पॅनकार्ड सरेंडर करायचा असेल तर तीथे PAN Card चा नंबर टाकायचा असतो. पण आपल्याला इथे काही टाकायचं नाही.

📍 यानंतर next ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि प्रत्येक वेळी next करताना सेव ड्राफ्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नंतर पाहू शकाल कि तुम्ही जो मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलणारे आणि डेट ऑफ बर्थ बदलणारे पण तिथे पाहू शकाल कि , तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स द्यायची गरज नाही.कारण की proof of आयडेंटिटी, proof of ऍड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ तिथे आधार कार्ड ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले असेल कारण की तुम्ही पहिल्यांदा ऑप्शन निवडला होता आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यामुळे. तिथे फक्त proof of PAN, copy of PAN ,No documents नसेल तरी चालेल तिथे काही अडचण येणार नाही. त्यानंतर जर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे ऑप्शन येतील. तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता.

📍त्याच्यानंतर declaration द्यायचय. Declaration करतेवेळी himself सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली नाव येईल तुम्ही किती डॉक्युमेंट त्याच्यासोबत देणार आहात ते तुम्हाला तिथे लिहावे लागेल.आणि तुमच्या लोकेशन करून सबमिट करायचे आहे.
तुम्ही दुसरा ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन येईल. तुम्ही पहिला ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही.

📍Next केल्यानंतर Aadhar card चे पहिले 8 digit तुम्हाला तिथे टाकावे लागतील. बाकी इतर काही तुम्हाला टाकायचं नाही हे लक्षात ठेवा.

📍next केल्यानंतर फक्त 8 डिजिट आधार कार्डचे टाकायचे. आणि बाकीचे सगळी माहिती तिथे आपण जी भरलेली आहे ती दाखवली जाईल.

📍 हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जी माहिती अपलोड केली असेल ती फक्त एकदा चेक करा. तुम्हाला काहिही करायची गरज लागणार नाही कारण की आपण फक्त काय करतोय डेट ऑफ बर्थ चेंज करतोय त्यानंतर ईमेल आयडी मोबाईल नंबर चेंज करतोय. तुम्ही जर फोटो आणि सिग्नेचर चेंज करत असाल, तर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर ॲड करावा लागेल.

📍तर पहिला ऑप्शन चांगला आहे. ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती बघितल्यावर कंटिन्यू करायचा आहे.

📍 आता पेमेंटची प्रोसेस करायची आहे. पेमेंट साठी पहिला ऑप्शन ऑनलाइन पेमेंट through पेटीएम. हाच select करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं 106 रुपये तुम्हाला पेमेंट येथे दिसेल, तर 106 रुपये पेमेंट फक्त आपल्याला करायचे आहे.

📍या ऑनलाईन NSDL च्या website वरती terms & condition agree क्लिक करून , तुम्हाला पुन्हा एकदा proceed for payment या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ती केल्यानंतर pay कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं. ते केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे तुम्हाला दिसेल. तर तिथे सोप्या पद्धतीने पेमेंट करायचं असेल तर बारकोड दिलाय त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा .

बारकोड वरती क्लिक केलं तर तुमचा गुगल पे, फोनपे , पे टीएम फोन पे असेल तर तुम्ही direct बारकोड स्कॅन करा. तो बारकोड 106 रुपयाचा तुम्हाला स्कॅन केल्यानंतर wait म्हणेल. वेट म्हणल्यानंतर थोडावेळ थांबायचं आहे रिफ्रेश करायचं नाही. तिथे थोडं थांबल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुली होईल. पेमेंट पावती तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी confirm option क्लिक करायचं आहे .

confirm केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला आधार अथेंतिकेशन द्यायचं आहे. तिथे थोडं खाली जाऊन तुम्हाला terms अँड कंडिशन agree करायचे आहेत. हे करताना तुम्हाला अथेंतिकेट या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला एक ओटीपी सेंड केला जाईल जो मोबाईल नंबर लिंक आधार कार्ड ला त्या मोबाईल नंबर वरती तो ओटीपी जाईल.

📍 त्यानंतर continue with e-kyc करायची आहे. जो मोबाईल नंबर लिंक आधार कार्ड ला ,त्या मोबाईल नंबर वर ओटीपी जाईल . तो OTP तिथे तुम्हाला टाकावा लागेल.
एकदम सोप्या पद्धतीने करण्याची सगळी माहिती आहे ते आधार कार्ड चेक केली जाईल आणि आधार कार्ड नुसार तुमचा पॅन card रेडि होईल. त्यानंतर सबमीट ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल आपल्या चे पेमेंट आहे ते तिथ सगळं व्यवस्थित झाले असेल .

📍continue with e-sign करायचे .एकदा तुम्ही otp घेतला तर अजून एक तुम्हाला आता e-sign द्यावी लागते. म्हणजे तुमचं Pan var A येईल तुम्ही त्याच्यावर स्वतः हाताने सही करायची असते. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन e-sign द्यायची त्यासाठी तिथे ऑनलाईन आधार कार्ड नंबर टाकायचा सेंड करायचे आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. तुम्हाला दोनदा टाकावा लागणारे.

आपली सगळी प्रोसेस आता इथं कम्प्लीट होते . तिथे प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgement नंबर येणारे येथे तुम्हाल पेमेंट स्लिप येईल त्या स्लीप चा जो पासवर्ड तो म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे ते लक्षात ठेवायचा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही एप्लीकेशन ओपन करू शकता. आणि डाव्या साईडला एक ऑप्शन डाउनलोड पीडीएफ त्यावर क्लिक करायचं.

त्या स्लिप मध्ये या सगळ्यात वरती एक नंबर भेटेल तो acknowledge ment नंबर तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी लागणार. Pdf सेव करून घ्या आणि save झाल्यानंतर तुम्हाला एक acknowledge ment number आहे तो कॉपी करायचा आहे. ते तुम्हाला PAN Crad ट्रेक करण्यासाठी व पॅन कार्ड स्टेटस चेक करण्यासाठी उपयोगी पडेल.

अशाप्रकारे तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने पॅन कार्ड करेक्शन करू शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.