ड्रोन तंत्रज्ञान आता सर्वांच्या आवाक्यात, वाचा सविस्तर

Uncategorized लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

समजा तुम्ही ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि तो घेऊन डिलिव्हरी बॉय कधी पोहोचतो आहे ह्याची तुम्ही आतूरतेने वाट पहात आहात. दारावरची बेल वाजली की दार उघडून पिझ्झाची डिलिव्हरी घेण्यासाठी तुम्ही अगदी तयार आहात. पण अचानक तुमच्या खिडकीच्या बाहेर एक खेळण्यातील हेलिकॉप्टर सारखं काहीतरी भिरभिरतं आणि खिडकीच्या जवळ एका जागी स्थिर रहातं. तुम्ही ऑर्डर केलेला पिझ्झा घेऊन जो आला आहे, तो म्हणजेच ड्रोन! तुम्ही पिझ्झाचा बाॅक्स त्याच्या ताब्यातून घेतला, की तो निघाला परतीच्या प्रवासाला. होय, येत्या काही वर्षांत ड्रोन्स अगदी घराघरात पोहोचणार आहेत.

ड्रोन म्हणजे नक्की काय?

ड्रोन म्हणजे मानवरहित एरिअल व्हेईकल (UAV). ही एक हवाई प्रणाली किंवा विमान आहे जी दूरस्थपणे मानवी ऑपरेटरद्वारे किंवा ऑनबोर्ड संगणकाद्वारे स्वायत्तपणे चालविली जाते. मूलत: ड्रोन हा एक उडणारा रोबोट आहे जो दूरुन नियंत्रित केला जाऊ शकतो किंवा त्याच्या अंतर्गत असलेल्या सिस्टिममध्ये सॉफ्टवेअर-नियंत्रित फ्लाइट प्लॅन वापरून स्वतंत्रपणे उड्डाण करू शकतो. ऑनबोर्ड सेन्सर्स आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) च्या संयोगाने त्याचे उडण्याचे कार्य चालते.

ड्रोन हे सुरुवातीच्या काळात सैन्याशी संबंधित होते. विमानविरोधी लक्ष्य सराव, शत्रुपक्षाची माहिती गोळा करणे, आणि शस्त्रसिद्धता ओळखणे अशा गुप्त कार्यासाठी वापरले जात असे. परंतु आतां मात्र ड्रोन इतर अनेक कामांसाठी देखील वापरले जातात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

शोध आणि बचाव, पाळत ठेवणे, रहदारी निरीक्षण, हवामान निरीक्षण, वैयक्तिक वापर, ड्रोन-आधारित, छायाचित्रण, व्हिडिओग्राफी, शेती, वितरण सेवा

ड्रोन कसे काम करतात?

ड्रोनची दोन मूलभूत कार्ये आहेत: फ्लाइट मोड आणि नॅव्हिगेशन.

उड्डाण करण्यासाठी ड्रोनमध्ये बॅटरी किंवा इंधनासारखे उर्जा स्त्रोत असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर रोटर, प्रोपेलर आणि एक फ्रेमदेखील असणे गरजेचे आहे. ड्रोनची फ्रेम सामान्यत: हलकी, कमी वजनाची आणि उडण्याचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी संमिश्र सामग्रीपासून बनलेली असते.

ड्रोनला कंट्रोलरची आवश्यकता असते, ज्यामुळे ऑपरेटरला रिमोट कंट्रोल्सद्वारे विमान लॉन्च करणे, नॅव्हिगेट करणे आणि उतरवणे ह्यासाठी सहाय्य होते. नियंत्रक वाय-फाय सारख्या रेडिओ लहरींचा वापर करून ड्रोनशी संवाद साधू शकतात.

सामान्यतः ड्रोनची वैशिष्ट्ये आणि घटक काय आहेत?

ड्रोनमधील घटक पुढीलप्रमाणे:

इलेक्ट्रॉनिक गती नियंत्रक, जे मोटरचा वेग आणि दिशा नियंत्रित करतात, फ्लाइट कंट्रोलर, जीपीएस मॉड्यूल, बॅटरी, अँटेना, कॅमेरे, प्रचंड कंपनसंख्या असलेल्या (ध्वनिलहरी) आणि टक्कर टाळणारे सेन्सर्स
एक्सीलरोमीटर, जे वेग मोजते; आणि आल्टिमीटर, जे उंची मोजते

ड्रोनची वैशिष्ट्ये त्याच्या वापरानुसार बदलतात. साधारण ड्रोनची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

उच्च-कार्यक्षमता, झूम आणि गिम्बल स्टेडीकॅम आणि टिल्ट क्षमता असलेले विविध प्रकारचे कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) जी ड्रोनला वस्तूंचे अनुसरण करण्यास सक्षम करते, ड्रोनच्या कॅमेरा फीडवर वर्च्युअल ऑब्जेक्ट्स दाखविणारी ऑगमेंटेड रिॲलिटी, मीडिया स्टोरेज, जास्तीत जास्त उड्डाण वेळ, जे ड्रोन हवेत किती काळ राहू शकते हे निर्धारित करते, उंच जाणे आणि उतरणे यासह कमाल वेग, दिशा बदलाची अचूकता, थेट व्हिडिओ फीड आणि फ्लाइट नोंदी.

नॅव्हिगेशनल सिस्टिम, जसे की GPS, सामान्यत: ड्रोनच्या नाकात ठेवल्या जातात. ड्रोनवरील जीपीएस त्याचे अचूक स्थान नियंत्रकाला कळविते. नियंत्रकाने एखादे अल्टिमीटर
नियुक्त केल्यास ते ड्रोनला विशिष्ट उंचीवर ठेवण्यास देखील मदत करते. सुरुवातीला ड्रोनला समोरच्या वस्तू बघता येत; काही ड्रोन आता पाच दिशांमधील वस्तू शोधतात: समोर, मागे, खाली, वर आणि बाजूला.

लँडिंगसाठी ड्रोन खाली बघणारे कॅमेरे आणि अल्ट्रासोनिक सेन्सर्ससह व्हिज्युअल पोझिशनिंग सिस्टिम वापरतात. ड्रोन जमिनीच्या किती जवळ आहे हे अल्ट्रासोनिक सेन्सर ठरवतात.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी केला जातो ते आता पाहूया.

क्रुषि क्षेत्रात ड्रोनचा वापर पिकांची उंची मोजण्यासाठी होतो. ते रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लेझरच्या सहाय्याने पीकांवर प्रकाश टाकतात आणि मागे पडणाऱ्या सावलीवरुन त्याची उंची नोंदवतात.

अग्निशमन दलासाठी ड्रोनचा वापर खूपच महत्त्वाचा आहे. आग किती वेगाने पसरत आहे आणि किती नुकसान झाले आहे हे निर्धारित करण्यासाठी आगीने प्रभावित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनचा वापर करतात.

क्रीडा कव्हरेजसाठी ड्रोनचा उपयोग तर सर्वज्ञात आहे. टेलिव्हिजन नेटवर्क क्रीडा इव्हेंटचे फुटेज, जसे की टेप केलेले आणि थेट फ्लाय-ओव्हर फुटेज घेण्यासाठी ड्रोनचा उपयोग होतो.

गेल्या दशकात ड्रोनचा जलद अवलंब केल्याने गोपनीयता, सुरक्षाविषयक तक्रारी आणि चिंता वाढल्या आहेत. ड्रोनचा वापर शहरी भागात आणि विमानतळांजवळील ठिकाणीही केला जातो, म्हणून त्यासंबंधी कायदे करण्यात आले आहेत. एकूण काय, तर येणाऱ्या काळात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे एव्हढं मात्र नक्की.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.