जमिनीचे शासकीय भाव हे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट द्वारे मोबाईल वर ऑनलाइन कशा रीतीने चेक करायचे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आज आपण जमिनीचे शासकीय भाव हे ऑनलाइन महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट द्वारे मोबाईल वर कशा रीतीने चेक करायचे याबाबतची ही सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जमिनीचे भाव व शासकीय भाव व मार्केट ची किंमत यामध्ये खूप फरक असतो.

मुद्रांक शुल्क जो भरल्या जातो, तो शासकीय भावाप्रमाणे भरल्या जातो. शहरी भागामध्ये काही भागांमध्ये जमिनीचे भाव एक ठिकाणी खूप अधिक असतात तर काही भागांमध्ये ते कमी असतात. त्याचप्रमाणे रहिवाशी भागाची किंमत वेगळी व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीची किंमत ही वेगळी असते.

या सर्व प्रकारच्या जमिनीची किंमत आज आपण या वेबसाईटद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागांमध्ये जमिनीचे भाव हे कसे आहेत. हे आपण महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर कसे पाहायचे ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो यासाठी आपण सर्वप्रथम एक वेबसाईट ओपन करायचे आहे.

यासाठी आपल्याला igrmaharashtra.gov.in ही वेबसाईट आपण आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवर ओपन करू शकता. ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर एक पेज तुमच्यासमोर येईल, त्या पेज वर तुम्हाला मिळकत मूल्यांकन हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

मित्रांनो मिळकत मूल्यांकन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या नवीन पेज वर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल. तर ज्या ठिकाणचा जमिनीचा शासकीय भाव तुम्हाला माहिती करायचा आहे तर त्या ठिकाणाच्या जिल्ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे.

जर समजा आपण औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणी क्लिक केले. तर त्या ठिकाणी आणखी एक पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला आता सर्व प्रथम वर्ष निवडायचे आहे. नंतर तुम्हाला जी भाषा सोपी जाईल ती भाषा तुम्हाला निवडायची आहे. आता जर समजा मराठी ही भाषा निवडली.

आता आपण औरंगाबादला जिल्ह्यावर क्लिक केल असल्यामुळे आपोआप औरंगाबाद हा जिल्हा येईल. त्यानंतर तालुका निवडा हा पर्याय दिसेल. त्यावर आपण गंगापूर हा तालुका निवडू व त्यानंतर तुमचे गाव निवडा हा पर्याय दिसेल. गाव निवडल्यानंतर त्या गावाची वैशिष्ट्ये आहे,ती वैशिष्ट्ये तुम्हाला दिसेल.

जसे फळबागा असेल ,एमआयडिसी परिसर, त्याचप्रमाणे रहिवाशी जो भाग असेल त्याचे भाव वेगळे असतात व शेत जमीन असेल त्याचे भाव वेगळे असतात. तर या ठिकाणी मी आता अंगाठा हे गाव निवडले. तर मित्रांनो गाव निवडल्यानंतर तुम्हाला जमिनीचे विविध भाव खाली दिसेल.

तर तुम्हाला त्याच्या वर किंमत दिसेल ही किंमत पर हेक्‍टर याप्रमाणे असेल तर आता अंगाठा या गावांमध्ये एमआयडीसी परिसर नसल्यामुळे तुम्हाला ते भाव दिसणार नाही. खाली तुम्हाला एक व दोन अशी क्रमांक दिसतील तर ते क्रमांक हे पेज चे आहे. तर पेज 2 वर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या गावाच्या वैशिष्ट्ये नुसार तेथील जमिनीचे भाव बघू शकता. तर अशाप्रकारे गावातील जमिनीचे भाव तुम्ही बघू शकता.

मित्रांनो, आता शहरांमध्ये शेतजमिनीचे भाव कशी असतात ते आपण बघू या. आता तालुका निवडा हा पर्यायावर क्लिक करून प्रत्यक्ष औरंगाबाद हे निवडायचे व गाव निवडा या पर्यायावर क्लिक केल्यावर प्रॉपर औरंगाबाद शहरातील एखादा भाग निवडाचा जसे आता आपण मौजे औरंगाबाद एक हे निवडले.

तर मौजे औरंगाबाद एक हे निवडल्यानंतर तुम्हाला तिथे विविध भागांची नावे दिसेल व सर्वे नंबर सुद्धा दिसेल. सर्वे नंबर वर क्लिक करुन तुम्ही त्या भागामध्ये असलेले सर्वे नंबर पाहू शकता. आणि त्या सर्वे नंबर वरून चौरस मीटर प्रमाणे असलेले जमिनीचे भाव आहे हे तुम्हाला दिसेल.

शहरी भागामध्ये शेतीसाठी जमीन हे वापरले जात नाही .शहरी भागामध्ये जमीन ही निवासी सदनिका,ऑफिस, दुकाने तसेच खुले प्लॉट साठी जमिनी शहरांमध्ये वापरली जाते. त्यानुसार तुम्हाला खाली जमिनीचे भाव हे चौरस मीटर मध्ये दिसून येईल. शहरांमध्ये प्रत्येक भाग खूप मोठा असतो व प्रत्येक भागाचे काही वैशिष्ट्ये असतात.

त्यानुसार शहरात प्रत्येक कॉलनीनुसार प्लॉटचे भाव, दुकानाचे भाव हे वेगवेगळे असतात. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वैशिष्ट्ये नुसार जमिनीचे भाव हे दिसून येतील. तसेच तुम्हाला खाली पेज क्रमांक दिसून येईल.आता आपण दोन क्रमांकाचे पेज ओपन करू यानंतर तुम्हाला भाव बदललेले दिसतील, नंबर बदल झालेले दिसतील.

त्यानंतर उपविभाग त्याचे नाव सुद्धा तुम्हाला बदललेले दिसतील तर अशाप्रकारे तुम्ही शेत जमिनीचे भाव तुम्ही या वेबसाईट वरती चेक करू शकता. खुली जमीन असेल, निवासी सदनिका असेल, ऑफिस असेल, दुकाने असेल, शेत जमीन असेल, किंवा बागायती शेत जमीन असेल या विविध शेत जमिनीचे भाव तुम्हाला या ठिकाणी माहित करता येईल.

या वेबसाईट वरती महाराष्ट्रातल्या सर्व शेतजमिनीचे गुणवैशिष्ट्ये यावरून जमिनीचे शासकीय भाव तुम्हाला माहित होईल. (वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे).

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “जमिनीचे शासकीय भाव हे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट द्वारे मोबाईल वर ऑनलाइन कशा रीतीने चेक करायचे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या !

Comments are closed.