तुम्हाला माहीत आहे का भारतात दारू, तंबाखू, पान मसाला यांच्या जाहिरातींवर बंदी आहे? तरी देखील या जाहिराती का प्रदर्शित होतात?

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

अभिनेता अक्षय कुमारवर तंबाखू ब्रँड ची जाहिरात केल्याप्रकरणी टीका होत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का ती जाहिरात तर सुगंधीत इलायची ची आहे? खरंतर अक्षयने अनेकदा आपण गुटखा कंपन्यांनी दिलेल्या जाहिरातींच्या ऑफर नाकारल्याच सांगितलं होतं, पण आता अश्याच एका कंपनीच्या जाहिराती मध्ये तो झळकला आहे आणि त्यामुळेच त्याला ट्रोलिंगला सुद्धा सामोरे जावे लागत आहे. पण फक्त अक्षय कुमारच नाही तर असे प्रकार इतर सेलिब्रिटीजच्या बाबतीतही घडले आहेत. त्यावरूनच चर्चा होते ती बंदी असलेल्या पदार्थांच्या छुप्या जाहिरातबाजीची. तंबाखू, दारू, गुटखा अशा पद्धतीच्या उत्पादनांचा या कंपन्या जाहिराती कशा करू शकतात? त्यासाठीची पळवाट म्हणजे “सरोगेट मार्केटिंग” नेमकं काय आहे? हे जाणून घेऊ यात.

अक्षय कुमारचं प्रकरण नेमकं काय आहे? : बरेचदा थिएटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमार एका सॅनेटरी पॅड संबंधीच्या जाहिरातीत एका व्यक्तीला सिग्रेट वरती पैसा वाया घालवू नको अशा आशयाचा सल्ला देताना दिसतो. पण तोच अक्षय कुमार काही दिवसांपूर्वी अजय देवगन आणि शाहरुख खानसोबत एका जाहिराती झळकला. ही एका गुटखा कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात असल्यानं अक्षय वर टीका सुरू झाली. सोशल मीडियावर त्याच्याविरोधात मिम्सचा पाऊस देखील पडला. त्यानंतर अक्षयने ट्विटरवरून माफी मागितली आणि यापुढच्या काळात मी अशा पद्धतीच्या उत्पादनांच्या जाहिराती करणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली.

पण मुळात अशा पद्धतीच्या जाहिरातींना भारतात परवानगी आहे का? : तर ॲडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात ASCI या संस्थेच्या नियमानुसार भारतामध्ये तंबाखू, गुटखा, दारू अशा पदार्थांच्या जाहिराती करता येत नाहीत. 1995 साला पासूनच तंबाखू, गुटखा, दारू या पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी आहे. फक्त जिथे वस्तूंची विक्री केली जाते तिथेच या पदार्थांची जाहिरात करता येते. तसेच भारतामध्ये 2003 साली लागू झालेल्या कायद्यानुसार तंबाखू उत्पादनांची थेट किंवा छुपी जाहिरात करता येत नाही. पण हे नियम लागू झाले तश्या त्यातल्या पळवाटा सुद्धा शोधल्या गेल्या, आणि अशीच एक पळवाट आहे “सरोगेट ॲडव्हर्टायझिंग”.

सरोगेट या शब्दाचा अर्थ होतो बदली किंवा पर्यायी. सरोगेट जाहिरात म्हणजे अशी जाहिरात ज्यात मूळ उत्पादनाची ब्रांड इमेज त्याच ब्रॅण्डच्या दुसऱ्या एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे एखाद्या दारुचा ब्रॅन्डच्या नावानं सोडा किंवा मिनरल वॉटरची जाहिरात असो किंवा इलायची च्या नावाखाली गुटका. मुखवासच्या नावानं तंबाखू आणि कॅसेट सीडी च्या नावानं दारूची विक्री असो. हे सगळे सरोगेट जाहिरातींचे प्रकार आहेत . अशा उत्पादनांच्या सरोगेट जाहिरातींच्या बाबतीत बीबीसीच्या सुद्धा कठोर पॉलिसी आहे. क्रिकेट सुद्धा सरोगेट जाहिरातींपासून दूर राहिलेला नाहीये. 2021 साली “ए एस सी आय” ने “आय पी एल” वरतीच कारवाईचा बडगा उगारला होता. आणि त्यावेळेला कॅसेट, मिनरल वॉटर, अल्कोहोल विरहित पेय आणि क्रिकेट मर्चंडाईजच्या नावाखाली सरोगेट जाहिराती करणारे आठ ब्रँड विरोधात “ए एस सी आय” ने तक्रार दाखल केली होती.

मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सरोगेट जाहिरातींवर एकीकडे बंदी असताना आयपीएलच्या एका टीमचं नाव “रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू” हे एका दारूच्या ब्रँड वरून घेतलेलं कसं चालू शकतं? तर ही टीम म्हणजे एक ब्रॅन्ड एक्सटेन्शन आहे. ब्रांडएक्सटेन्शनला भारतात मान्यता आहे.

ब्रांड एक्सटेन्शन म्हणजे एखाद्या कंपनीने आपल्या एका मूळ ब्रँडच्या नावाचा वापर करून एखादा नवीन प्रॉडक्ट लॉंच करणं. म्हणजे स्टील ची निर्मिती करणाऱ्या कंपनीने मीठ विकण असो किंवा एखाद्या फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीने स्मार्टफोन किंवा घड्याळ तयार करण असो. ही सगळी ब्रँड एक्स्टेंशनचीच उदाहरणे आहेत. पण ब्रांड एक्सटेन्शन विषयी सुद्धा काही नियम आहेत.

1. ब्रांड एक्सटेन्शन केलेली उत्पादने संबंधित सरकारी संस्थांमध्ये नोंदणी झालेली असावीत.

2. त्यांचा बाजारातला वाटा किमान दहा टक्के असायला हवा.

3. त्या उत्पादनाची वार्षिक उलाढाल राज्य पातळीवर किमान एक कोटी आणि देशपातळीवर किमान पाच कोटी असावे.

4. म्हणजेच त्या उत्पादनाचा स्वतंत्र अस्तित्व असावे अशा नियमांचा त्यात समावेश आहे.

आता ब्रांड एक्सटेन्शन सरोगेट जाहिरातील पेक्षा वेगळा कसा आहे? : तर ब्रँड एक्सटेंशन मध्ये कंपनीच्या ब्रँड्चे नाव वापरले जाते. पण पूर्णपणे नव्या प्रॉडक्टचे प्रमोशन केलं जातं. आणि या नव्या उत्पादनांची विक्री वाढवण्याचा प्रयत्न असतो. तर सरोगेट जाहिरातींमध्ये नव्या उत्पादनापेक्षा मूळ उत्पादनाचे म्हणजे दारू, तंबाखू यांचे प्रमोशन करण्यावर भर असतो.

नैतिक दृष्ट्या अशा जाहिराती करणं चुकीचं असल्याचं अनेकदा बोललं जातं. तरीही सेलिब्रिटीज अनेकदा अशा जाहिराती मधे सर्रास दिसतात. अक्षय कुमार, शाहरुख खान, अजय देवगन चे उदाहरण ताजच आहे. पण एके काळी अमिताभ बच्चन यांनीही पान मसाले ची जाहिरात केली होती. प्रियंका चोप्राही इलायचीच्या नावाखाली पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकली होती. जेम्स बॉण्ड फिल्म साठी प्रसिद्ध असलेले हॉलिवूड अभिनेता पी.एस. ग्रॉसनन आणि तेलगू फिल्म इंडस्ट्री मधील स्टार महेश बाबु यांना सुद्धा अशा जाहिराती केल्या मुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.