एखाद्या दाव्यास उशीर का लागतो? जाणून घ्या

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण पाहत असतो की अनेकजण बहुदा हा प्रश्न मुख्यत्वेकरून विचारतात की वाटपाच्या दाव्यास किती वेळ जाईल? किंवा वाटपाचा दावा किती वर्षे चालतो? तर आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊयात. त्याचप्रमाणे एखाद्या दाव्यास उशीर का लागतो? आणि त्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत असू शकतात. किंवा कारणीभूत असतात त्याची देखील आपण माहिती घेऊ या.

ज्या वेळेस एखाद्या प्रॉपर्टी संबंधाने त्या प्रॉपर्टीच्या सहहिस्सेदार मध्ये वाद असेल, तर त्याचे कोर्टामार्फत वाटप करून घेणे हा एकमेव उत्कृष्ट आणि कायदेशीर असा पर्याय असतो. आता या वाटपाच्या दाव्यास किती उशीर लागतो? किंवा वाटपाचा दावा किती दिवसांमध्ये निकाली निघतो, त्या प्रश्नाचे उत्तर तर आपण पाहुयात. परंतु हे उत्तर काही घटकांमध्ये अडकलेले आहे. तरी या प्रश्नाचे उत्तर पाहण्या अगोदर आपण 4 घटकां माहिती घेवूयात. की जे घटकच ठरवतील की आपला दावा किती दिवस, किती महिने, किंवा किती वर्ष चालेल.

1) पक्षकारांची वागणूक

जो वादी असतो म्हणजेच जो दावा दाखल करतो. त्याच्या त्या दाव्याबद्दल किंवा त्या दाव्यावर किती लक्ष आहे. किंवा तो दावा लवकरात लवकर संपविण्याचा वादीचा दृष्टिकोन कसा आहे? हा घटक दाव्याचा न्याय निर्णय लवकरात लवकर होण्यास मदत करतो. म्हणजेच वादीने प्रत्येक तारखेला आपल्या वकील साहेबांना विचारणा केली की आज आपला दावा कोणत्या स्टेजला आहे? आज दाव्यांमध्ये आपली काय रणनीती राहील? किंवा कोणता अर्ज वगैरे देणार आहोत, तर मला वाटते की वकील साहेब देखील तुमच्या दाव्यामध्ये काळजीपूर्वक लक्ष देतील. आणि तो दावा लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत करते. आता दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे,

2) वादीचे वकील

दुसरा खूप महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे वादिचे वकील. सर्वच वकील साहेब दिवानी केसेसमध्ये एक्सपर्ट असतीलच असे नाही. कोणते वकील साहेब फक्त फौजदारी स्वरूपाचे कामकाज पाहतात. कोणकोणते वकील साहेब फक्त दस्ताचे काम करतात. काही वकील साहेब फक्त तहसीलदार किंवा प्रांत साहेब यांचेकडे चालणाऱ्या महसुली कामकाजात निपुण असतात. सांगायचे तात्पर्य एकच आहे की ज्या वकील साहेबांची जास्तीत जास्त कामकाज दिवाणी स्वरूपाचे आहे असेच वकील साहेब आपल्या दाव्यासाठी नेमावे. अन्यथा ज्या वकील साहेबांचा दिवाने दाव्यांमध्ये अनुभव नसतो, अभ्यास नसतो, ते दावा तर दाखल करतात. परंतु दाव्याचे कामकाज चालविण्यासाठी टाळाटाळ करतील. त्यामुळे वादीचे वकील एक महत्त्वाचा घटक असतो.

3) प्रतिवादी आणि त्याचे वकील..

दाव्यामध्ये एक-दोन-तीन…..दहा असे प्रतिवादी असतील, तर गोष्ट खूप वेगळे आहे. परंतु वीस, पंचवीस….तीस अशी प्रतिवादीची संख्या असेल तर दाव्याचे कामकाज तुलनात्मक रित्या हळू हळू चालते. आता हे कामकाज हळूहळू का चालते ते पाहण्यासाठी एक उदाहरण घेऊयात. समजून चालूयात की वादीने प्रतिवादी विरुद्ध बांधकामास मंजुरी देण्यासाठी ताकीदचा अर्ज कोर्टामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये प्रतिवादी यांचेकडून त्या अर्जावर म्हणणे कोर्टाने मागवले आहे. तर अशा परिस्थिती मध्ये जर प्रतिवादी हे म्हणणे देण्यासाठी वारंवार मुदत मागत असतील. तर या मदतीमुळे किंवा प्रतिवादीचे वेळ काढू पणामुळे देखील दाव्याचे कामकाज लांबणीवर पडू शकते. म्हणजेच हा देखील एक खूप महत्त्वाचा घटक आहे की जो वाटपाच्या दाव्यांमध्ये वेळ काळ निश्चित करू शकतो.

4) प्रीसायडिंग ऑफिसर..

म्हणजेच ज्या कोर्टासमोर, म्हणजे ज्या जजसाहेबां समोर तुमचे केसचे कामकाज चालणार आहे. त्यांच्यासमोर किती कामकाज किती केसेस आहेत, त्याचप्रमाणे त्या सर्व केसेस मधील दिवसभरामध्ये जजसाहेब किती केसेस चालवतात. यावर देखील तुमच्या दाव्याचा कालावधी अवलंबून आहे.

जर तुमच्या दाव्याचा क्रमांक 24 असेल. आणि कोर्ट किंवा जजसाहेब चौथ्या-पाचव्या केस पर्यंत पोहोचले. आणि बाकी सर्व केसेस किंवा दाव्यांना पुढील तारीख मिळाली, तर आपोआपच आपल्या दाव्याचे कामकाज देखील लांबणीवर जाते. त्यामुळे हा देखील एक डिझायनिंग फॅक्टर आहे. की ज्यामुळे आपण आपल्या वाटपाच्या दाव्याचा लागणारा वेळ ठरवू शकतो.

▪️म्हणजेच आता आपण पाहिलेले चार घटक निश्चितच दाव्यावर परिणाम करणारे असे आहेत.
▪️समजा या चारही घटकांमध्ये समतोल असेल तर वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय दोन ते अडीच वर्षे मध्ये लागतो.
▪️ परंतु वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय होणे म्हणजे वाटप होणार असे नाही. त्यासाठी वाटपाचे दरखास्त कोर्टामध्ये दाखल करणे अतिशय महत्त्वाचे असते. या संबंधीच्या संपूर्ण प्रक्रिया बाबत माहिती ही उपलब्ध होते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा