कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक, आता सगळी कागदपत्रं पुन्हा काढावी लागणार?

कायदा

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि अजित आशाताई आनंदराव पवार. मार्च महिन्यात मंत्रालयाच्या दालनाबाहेर बदललेले अशा पाट्या दिसल्या. कारण सगळे शासकीय कागदपत्रांवर आईच नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता 1 मे 2024 पासून हा निर्णय लागू झाला.

आणि अनेकांना प्रश्न पडला की आता मला कागदपत्र बदलावी लागणार का? आता आमची सगळी कागदपत्रं नव्याने काढावी लागणार का? असे अनेकांनी सोशल मीडिया वरून प्रश्न विचारले आणि तसेच लग्न झालेल्या महिलांनी तिचं नाव कसं लिहायचं? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुम्हाला येथे प्रश्न पडले का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपणच आज घेऊयात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या कागदपत्रांवर आईचं नाव घेणे बंधनकारक करण्यात आले त्यावर आधी एक नजर टाकुयात. महाराष्ट्र सरकारने गेल्या मार्च महिन्यात महिला धोरण लागू केल्यानंतर शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव घेणे बंधनकारक करण्यात आलं, म्हणजे आधी तुमच नाव मग तुमच्या आईचे नाव आणि मग वडिलांचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपाचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे, म्हणजे या महाराष्ट्रात कागदपत्रांवर आईचं नाव होतं पण त्यासाठी एक वेगळाच कॉलम होता.

पण आता नाव लिहिण्याचे स्वरूप बदलण्यात आले आहे. अर्थातच महिला सन्मानाचा विषय असल्याने या निर्णयाचा सगळ्यांनी स्वागत केलं. पण शासकीय कागदपत्रांवर आईच नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले त्या मध्ये कोण-कोणत्या कागदपत्रांचा समावेश आहे याचाही उल्लेख सरकारच्या या जीआरमध्ये करण्यात आला आहे.

त्यानुसार जन्माचा दाखला, शाळेत प्रवेश करतांना भरायचा अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जमिनीचा सातबारा आणि प्रॉपर्टीची सर्व कागदपत्र, शासकीय आणि निमशासकीय कागदपत्रे, शिधापत्रिका वाटप म्हणजेच रेशन कार्ड, मृत्यूचा दाखला या सगळ्या कागदपत्रांवर वडिलांचे नाव आधी आईच नाव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तर ही सगळी कागदपत्रे तुम्हाला नव्याने काढावी लागणार का? तर याबद्दलही शासनाने काढलेल्या जीआर मध्ये माहिती देण्यात आली की, त्यात त्यांनी म्हटले की आता आधी स्वतःचे नाव, स्वतःच्या नावानंतर आईचे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव लिहिणे बंधनकारक करण्यात येत आहे. पण आज शासन निर्णय घेतो आहे तो 1 मे 2024 नंतर जन्म झालेल्या व्यक्तींनाच लागू होईल, म्हणजेच तुमच्या जवळ आता सगळी कागदपत्र आहे. तुम्हाला बदलावी लागणार नाही.

कारण 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या बालकांना हा निर्णय लागू होतो. मात्र कागदपत्रे तर बदलावी लागणार नाही, मग लग्न झालेल्या महिलेने तिचं नाव कसं लिहायचं? या बद्दल जीआरमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यांनी असे म्हटले की, आधी लग्न झालेल्या महिला नाव लिहीत असतं हीच पद्धत कायम ठेवण्यात आलेली आहे.

मात्र, प्रॉपर्टीचा कागदपत्रांमध्ये तुम्हाला तुमचं लग्न आधीच नाव काय ठेवायचं असेल तर ती सुद्धा मुभा देण्यात आली आहे, अर्थात महिलांनी कोणता नाव लावायचे? लग्नाआधीच की लग्ना नंतर तिच्या पतीचं नाव लावायचा की नाही हा प्रश्न आहे आणि 2014 ला झालेल्या महिला धोरणामध्ये तिचा वडिलांचे किंवा नवऱ्याचं नाव लावण्याचा ऑप्शन तिला दिलेलं होतं. त्यामुळे कोणाचं नाव वापरायचा हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.

पण अपवादात्मक प्रकरणात जे आईचं नाव लावू शकत नाही किंवा आई-वडिलांचा दोघांचे नाव लावू शकत नाही किंवा वडिलांचे नाव देऊ शकत नाहीत तर अशा व्यक्तींना सुद्धा या प्रकरणात या निर्णया मधून सूट देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखातून मिळाली का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!