मातृवंदना योजना म्हणजे काय ? ।। मातृवंदना योजनेतून ५०००रु. चा लाभ कसा मिळवता येतो? ।। पात्रता, निकष, कागदपत्रे काय आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय

असा मिळवा मातृवंदना योजनेतून ५००० चा लाभ : माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना आहे. शासकीय नोकरदार महिला वगळता उर्वरित सर्व गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी या योजनेतून प्रत्येकी पाच हजारांचा लाभ दिला जातो.

पात्रतेचे निकष व अटी :  जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्या योजनेच्या निकषा नुसार अतिरिक्त लाभ देय राहील.  नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा बालक मृत जन्मल्यास त्या टप्प्यापु रताच लाभ एकदाच लागू राहील.  दारिद्र्य रेषेखालील व वरील लाभार्थीना ही योजना लागू राहील. वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या नोकरदार महिलांना योजना लागू नाही. गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंदणी करणे, लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड देणे, आधार कार्डशी जोडलेले बैंक खाते, प्राथमिक लसीकरण, जन्म नोंदणी दाखला.

तीन टप्प्यात पैसे मिळणार : पहिला हफ्ता १००० रुपये लाभार्थ्यांना गरोदरपणाची नोंद १०० दिवसांचे आत केल्यानंतर, दुसरा हफ्ता २००० रुपये गरोदरपणाच्या ६ महिन्यांत (१८०) किमान प्रसूतिपूर्व तपासणी केल्यानंतर, तिसरा हफ्ता २००० रुपये प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बीसीजी, ओपीव्ही, (झिरो डोस) यांची एक मात्रा तसेच पेंटाव्हालेंट, ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेतल्यानंतर लाभ मिळेल.

पहिला व दुसरा हफ्ता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : लाभार्थीच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, इतर ओळखपत्र. राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. माताबाल संरक्षक कार्डची झेरॉक्स.

तिसरा हफ्ता मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  लाभार्थीच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, इतर ओळखपत्र. राष्ट्रीयीकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. माताबाल संरक्षक कार्डची झेरॉक्स. बाळाच्या जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स.

लाभासाठी कोठे संपर्क करायचा? : या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महापालिकेचे रुग्णालय, आशा, अंगणवाडी कार्यकर्ता, आरोग्य सेविका किंवा शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क करावा.

ग्रामीण क्षेत्र: एएनएम (आरोग्य केंद्र सहाय्यक) पात्र लाभार्थीना विनाशूल्य विहित नमुना प्रपत्र (Matru Vandana Yojana Form) 1 अ चा अर्ज देऊन अर्ज स्विकारतील व तो अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तालुका अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. हा अर्ज भरण्याची जबाबदारी आरोग्य केंद्र सहाय्यकची असते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज तालुका अधिकाऱ्यांकडे जमा करतील. विहित संकेतस्थळावर तालुका अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी महिलेच्या अर्जाची माहिती भरण्यात येईल. राज्यस्तरावरुन संगणक प्रणालीद्वारे थेट लाभ अदा करण्यात येईल.

नगरपालिका क्षेत्र: प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र लाभार्थीना विनाशुल्क विहित नमुना प्रपत्र 1 अ चा अर्ज देऊन परिपूर्ण अ स्विकारेल. परिपूर्ण अर्ज हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. हेल्थ पोस्ट वैद्यकीय अधिकारी अर्जातील माहिती तपासून तो अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करतील.

PMMVY प्रधानमंत्री मातृ वंदना योजना Online अर्ज कसा करायचा?: प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा : सर्वप्रथम https://pmmvy-cas.nic.in वेबसाइटला भेट द्या. आपली पीएमएमव्हीवाय लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरुन पीएमएमव्हीवाय पोर्टलवर लॉगिन करा. पीएमएमव्हीवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी नोंदणी फॉर्ममध्ये (अर्ज फॉर्म १-A ) आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. फॉर्म ‘New Beneficiary’ टॅब अंतर्गत उपलब्ध आहे. सर्व सूचना PMMVY CAS यूजर मॅन्युअलमध्ये देण्यात आल्या आहेत. दुसर्‍या तिमाहीत दुसरा हप्ता घेण्यासाठी पुन्हा PMMVY CAS वेबसाइटवर लॉग इन करा आणि ‘Second Instalment’ टॅबवर क्लिक करा आणि फॉर्म १-B भरा.  मुलाच्या जन्माच्या नंतर आणि लसीकरणाच्या पहिल्या चक्र पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, PMMVY CAS पोर्टलवर लॉग इन करा आणि ‘Third Instalment’ टॅबवर क्लिक करा आणि फॉर्म १-C भरा.