‘रिटेल मार्केट किंग डी मार्ट’ संस्थापक राधाकिशन दमानी यांची यशोगाथा ।। डी मार्ट चा शून्य ते आज एक लाख ६० हजार कोटी चा प्रवास !!

अर्थकारण लोकप्रिय

भारतीय गृहिणी ही काटकसरीने घर चालवण्यामध्ये अग्रेसर आहेत, कितीही श्रीमंत घरची स्त्री असली तरी थोडं ना थोडं काटकसर करतेच, आणि भारतीय गृहिणी हीच सवय ओळखून त्यांच्या साठी बचतीचे दुकान उघडले आहे एका व्यावसायिकाने. त्यांचं नाव आहे राधाकिशन दमानी, आणि त्या दुकानाच्या साखळी च नाव आहे डी मार्ट. राधाकिशन यांच्या वडिलांचा बॉल बेअरिंग चा व्यवसाय होता.

वाणिज्य शाखेतून पदवी घेत असताना हे काही आपल्याला जमणार नाही हे राधाकिशन यांच्या लक्षात आलं, म्हणून शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली व तिथे ही त्यांचं मन लागेना. अशातच एक दुदैवी घटना घडली, राधाकिशन यांच्या वडिलांचा आकस्मित मृत्यू झाला, आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला, बॉल बेअरिंग चा व्यवसाय बंद करावा लागला.

ना शिक्षण ना कसला व्यवसाय आता पुढे करायचं तरी काय हा प्रश्न राधाकिशन यांच्या पूढे उभा राहिला. त्यांचा एक भाऊ शेअर बाजारात ब्रोकर होता, राधाकिशन यांनी त्याला मदत करायला सुरुवात केली पण त्यातलं फार कळत नसल्यामुळे त्यांना ते ही नीट जमत नव्हते, सुरुवात कुठे करायची आणि शेवट कुठे करायचा हे त्यांना कळेना, म्हणून त्यांनी आधी काही दिवस फक्त हा व्यवसाय कसा चालतो हे पाहिलं, ट्रेडिंग करताना कळपाच्या मागे धावायचं नाही.

हळू हळू त्यांचे शेअर बाजाराचे अंदाज खरे ठरू लागले, आणि अल्पावधीतच शेअर बाजाराचे अचूक अंदाज वर्तवणारे भारतीय वॉरेन बफे असे राधाकिशन यांची प्रतिमा तयार झाली. नव्वद च्या दशकात शेअर बाजारातील घोटाळ्याने सगळ्या भारताला  झळ पोचली पण राधाकिशन यांच्या अंदाजामुळे आणि रणनीती मुळे त्यांच्या गुंतवणूकदार यांची पुंजी सुरक्षित राहिली. आता तर राधाकिशन दमानी यांना शेअर बाजाराचे वॉरेन बफेट असे नाव मिळाले आहे.

नाव आणि पैसा दोन्ही सुरळीत चालू असताना अचानक त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि ते रिटेल व्यवसायात उतरले आणि डी मार्ट चा जन्म झाला. त्यांनी मुंबई मधील नेरुळ इथे ५००० चौ. फूट जागा अपना बाजार ची एक शाखा चालवण्यास घेतली. त्यानंतर त्यांनी आणखी एक शाखा विकत घेतली आणि दोन वर्षात त्यांनी पूर्ण अपना बाजारच विकत घेतला आणि डी मार्ट ची रचना केली. सुरुवातीचे काही दिवस अध्ययनात गेले.

ग्राहकांची मानसिकता समजून घेऊन त्याप्रमाणे दुकानाची रचना, बिलिंग प्रणाली, आणि पुरावठादारांचा विश्वास त्यांनी मिळवला. ते स्वतः वासी च्या MPSC बाजारात गेले, तेथील खाउक व्यापाऱ्यांसोबत बोलून वस्तूंचे भाव माहीत करून घेतले. २००७ अहमदाबाद, बरोडा, पुणे, सांगली, सोलापूर इथे नवीन दुकाने सुरु केली. ही दुकाने सुरू करताना क्षेत्रफळाप्रमाणे त्याची रचना केली गेली, ७००० ते १०००० चौ फूट क्षेत्रफळासाठी एक्सप्रेस फॉरमॅट, ३०००० ते ३५००० क्षेत्रफळ असेल तर हायपर मार्केट, आणि १,००,००० वरील क्षेत्रफळासाठी सुपर मार्केट अशी रचना केली.

या जागा पाहताना जिथे वाहनांची जास्त रहदारी आहे अशा जागा निवडण्यात आल्या. त्यांनी सुरुवातीपासून ग्राहक, पुरवठादार, आणि कर्मचारी यांची काळजी घेतली. मध्यमवर्गीय ग्राहक लक्षकेंद्रित नजरेसमोर ठेवला. एकाच छताखाली सर्व गृहोपयोगी वस्तू मिळतील याची काळजी घेतली. डी मार्ट ने स्वतः च्या जागा विकत घेतल्या त्यामुळे भाड्याचे पैसे वाचले. हाच पैसा डी मार्ट ने विशेष सूट देऊन ग्राहकांकडे वळवला.

त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात डी मार्ट मध्ये जाऊ लागले. पुरावठादारकडून ते मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात त्यामुळे त्यांना त्यामध्ये बराच फायदा मिळतो. पुरवठा दाराला एकवीस व्या दिवशी पैसे मिळतील याचा विश्वास मिळवून दिला त्यामुळे खात्रीचे पुरवठादार जुळले. त्यामुळेच डी मार्ट मध्ये वस्तूंची कमी कधीच जाणवत नाही. कमी किमतीत खरेदी करायची, साठवण करायची, आणि कमी किमतीला विकायची हे डी मार्ट च साधं सरळ सूत्र आहे.

कर्मचारी हे देखील डी मार्ट चे आधारस्तंभ आहेत कारण की अगदी दहावी नापास व्यक्तीला देखील इथे नोकरी मिळते, त्यांना प्रशिक्षण दिलं जात आणि कामाच पूर्ण स्वातंत्र्य दिल जात त्यामुळे कर्मचाऱ्यांची कामाची क्षमता ही जास्त आहे. २००६ -०७ मध्ये डी मार्ट महसूल फक्त २६० कोटी रुपये होता, तो २०१२-१३ मध्ये ३३३४ कोटी रुपये झाला. तर एप्रिल २०१८ मध्ये तो एक लाख कोटींच्या घरात पोहचला. याच किमयेने डी मार्ट ने भारताचा तिसरा रिटेल ब्रँड म्हणून नावलौकिक मिळवला. आता सध्या २०२० मध्ये डी मार्ट ची मार्केट व्हॅल्यू आहे तब्बल एक लाख ६० हजार कोटी.

यातही अभिमानाची गोष्ट अशी की फ्युचर ग्रुप ची १७०० दुकाने आहेत तर त्यांची उलाढाल ४०,०००कोटी रुपये इतकी आहे, रिलान्स रिटेलची ३८३७ इतकी दुकाने आहेत तर उलाढाल ६९,००० कोटी रुपये आहे, डी मार्ट ची फक्त १७४ दुकाने आहेत तर उलाढाल या सर्वांच्या मनाने जास्त आहे, त्यामुळेच डी  मार्ट पासून एक किलोमीटर च्या आसपास कोणतही रिटेल दुकान सुरु होत नाही कारण डी मार्ट इतक्या स्वस्त दरात वस्तू विकतात की समोरच दुकान सुरू होण्यापूर्वी च ते बंद होत. अशा प्रकारे रामकीशन दमानी यांनी भारतीय ग्राहकांची अचूक नस ओळखून डी मार्ट चा व्यवसाय केला आणि कोटीची कमाई केली.