70 हजार तरुणांना नोकरी देणारा साताऱ्याचा पठ्ठ्या – हणमंतराव गायकवाड ।। BVG संस्थापक, शेतकऱ्यांसाठी जैविक औषधे निर्माते असे बहुआयामी व्यक्तिमत्व !!

अर्थकारण बातम्या लोकप्रिय

हणमंतराव गायकवाड यांचा जन्म रहिमतपूर येथील कोरेगाव येथे झाला, तिथल्या एक छोट्याश्या गावात राहत असताना वडिलांची दोन एकर शेती होती. घरी वीज नव्हती, त्यामुळे अगदी सहावीत जाई पर्यंत ज्यांच्या घरी वीज असते तेच लोक श्रीमंत आणि हुशार असतात असं त्यांचा समज होता, परंतु जेव्हा सहावी ला असताना स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्यांचा हा समज थोडा दूर झाला, आपला मुलगा हुशार आहे म्हणून त्यांचे वडील त्यांना फुगेवाडी पुणेला घेऊन आले.

परंतु इथे आल्यापासून त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडू लागली, महिन्यातील आठदिवस, पंधरा दिवस, तर कधी तीन आठवडे ते ससून ला भरती राहू लागले. त्यासाठी आईच कानातले, मंगळसूत्र पाच टक्के व्याजदराने गहाण ठेवावं लागलं. तेव्हाच त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं, ते सांगतात की त्यांचे वडील त्यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पुण्यातील व्याख्यानांना आवर्जून घेऊन जात असत.

एकदा त्यांनी स्वामी विवेकानंद यांचं व्याख्यान ऐकलं आणि ठरवलं की हे आपले आदर्श आहेत. आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्यानंतर एकदा शिवाजी महाराजांवरील भाषण ऐकलं आणि ठरवल की हे आपले दुसरे आदर्श. दहावी ला चांगले गुण मिळाले तेव्हा त्यांनी त्यांच्या प्राचार्यांना विचारलं की पुढे काय करायच, त्यांनी हनुमंत यांना डिप्लोमा करण्याचा सल्ला दिला. सर्व मूल इलेक्ट्रॉनिक्स करायचे म्हणून यांनी पण तेच केलं.

प्रथम वर्षात ७४%मार्क पडले, द्वितीय वर्षात ७२%मार्क पडले. पण दुर्दैवाने द्वितीय वर्षात असताना वडिलांचं निधन झालं. त्यांना IAS ऑफिसर व्हायचं होत, तस त्यांनी आईला सांगितलं, त्यांचे आजी आजोबा गावावरून त्यांच्याकडे राहायला आले. दहा बाय दहा च्या खोलीत सगळे राहू लागले, त्यांचे वडील हे एकटेच होते, त्यामुळे काका वगैरे यांचा पाठिंबा मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांना औरंगाबाद मधील गव्हर्नमेंट कॉलेज ला प्रवेश मिळत होता परंतु आईने पुण्याबाहेर जाण्यास नकार दिला.

आणि त्यांनी घरापासून २१ किलोमीटर अंतरावरील कॉलेज ला प्रवेश घेतला, तिथे ते रोज सायकल ने जाण येणकरत असत. १९९१ साली वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी एक संस्था काढायचं ठरवलं त्यांच नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठाण. त्याचा लोगो तयार करायचा होता, त्यांनी भारताचा नकाशा काढला त्यामागे सूर्य काढला आणि समोर एक पणती काढली व हे सगळं रजिस्ट्रेशन साठी पाठवून दिल, दोन वर्षाने १९९३साली त्यांना त्यांची संमती मिळाली.

१९९४ मध्ये त्यांचं इंजिनीअरिंग पूर्ण झालं आणि टाटा मोटर्स मध्ये नोकरी ला लागले. आधीचे काही दिवस रोटेशनल शिफ्ट वर काम केल्यावर त्यांना पर्चेसिंग डिपार्टमेंट ला शिफ्ट केलं गेलं, तिथे वायरिंग हारनेस डिपार्टमेंट त्यांना देण्यात आलं. तेव्हा टाटा इस्टेट नावाची गाडी होती जी फारसी चालली नाही, जीच जवळपास अडीच कोटी च स्क्रॅप मटेरियल पडलं होतं, त्यांनी त्यांच्या साहेबांना विचारून त्याचा परत वापर करण्याची परवानगी घेतली.

त्यावेळी त्यांना आठ हजार पगार होता आणि त्यांनी कंपनीचे अडीच कोटी वाचवले. तेव्हा त्यांचे उपाध्यक्ष यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांचं कौतुक केलं, व त्यांना विचारलं की त्यांच्या कंपनीकडून काय अपेक्षा आहेत, हनुमंत यांना त्यांचे गावाकडचे मित्र नेहमी नोकरी बद्दल विचारत होते. म्हणून त्यांनी त्या मुलांसाठी नोकरी ची मागणी केली, त्यांच्या म्हणण्यावरून गावातील आठ मुलांना २२ मे १९९७ ला  कंपनी मध्ये काम मिळालं.

उमेश म्हणून त्यांचे मित्र होते जे की त्यांचे शाळेपासून चे चांगले मित्र होते, आणि स्वतःच्या आवाजाने पुढच्या व्यक्तीला दबावात ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. अशा व्यक्तीला जर कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले तर चांगले राहील अस त्यांना वाटल, तेव्हा उमेश हे एका बँकेत मॅनेजर होते, हनुमंत यांनी ही गोष्ट उमेश यांच्या कानावर घातली, जानेवारी १९९७ साली संध्याकाळी ते भेटले व हनुमंत यांना त्यांनी बँकेचा राजीनामा दिल्याचं सांगितले.

अशा विश्वासू लोकांची त्यांना गरज होती. इंडिका प्लांट मध्ये त्यांनी काम चालू केल. त्यामध्ये त्यांना पहिल्या वर्षी आठ लाख, दुसऱ्या वर्षी तीस लाख तर तिसऱ्या वर्षी सत्तर लाख रुपयांची उलाढाल केली. तुम्हाला व्यवसायात काहीतरी चांगलं करायचं असेल तर जगाच्या पुढे विचार करायला पाहिजे असं ते सांगतात. १९९९साली त्यांचं लग्न झालं. आणि त्यांनंतर त्यांनी राजीनामा देऊन पूर्णवेळ व्यवसाय करण्याचं ठरवल. पुण्याबाहेर जाऊन काहीतरी करावं असं त्यांना वाटत होत.

२००१ साली त्यांनी बंगलोर ला BVG ची काम चालू केल, नंतर मग चेन्नई, हैदराबाद अशी काम मिळाली. 2003 साली त्यांना कामात एक मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर दिल्ली ला संसदेच्या इमारतीच काम होत, तेव्हा तेथील काही लोकांनी BVG च नाव सुचवलं, त्यांना साधन विकत घ्यायची नव्हती, त्यामुळे असे लोक पाहिजे होते जे हे संसदेच सगळं काम करुन देतील, तेथील श्रीनिवासन साहेबांना हे भेटले आणि ते काम BVG ला मिळालं. संसदेवर झालेल्या हल्ल्यात बाहेरील फरशी काळी झाली होती.

यानंतर २००७साली मुख्य संसदेच काम मिळालं. BVG ला हॉल च काम मिळालं नव्हतं. बाहेरील फरशी जेव्हा लाल झाली मात्र आतमध्ये हॉल ला तशीच घाण दिसत होती, तेव्हा लोकांनी विचारपूस करायला सुरवात केली की आत एवढ घाण आहे नि बाहेर कस काय स्वच्छ? आणि म्हणून शेवटी हॉल च काम देखील यांनाच मिळालं. त्यानंतर प्रधानमंत्री च्या घराचं काम मिळालं. अस करत करत पंतप्रधानां च ऑफिस मग मंत्रालय अशी सगळी काम BVG ला मिळत गेली.

प्रायव्हेट सेक्टर मध्ये देखील BVG ने बरीच प्रगती केली, टाटा मोटर्स ने त्यांना जमशेदपूर ला जाऊन काम करण्यासाठी विचारलं, त्यांनी हे ही केलं. आधी आऊट सोर्सिंग च मग, लॅण्ड स्कपिंग, इलेक्टिकल फिटींग, अशी सगळी काम चालू केली, म्हणता म्हणता हुंदाई, अशोक लेलँड, बजाज अशा सर्व कंपन्यांच काम मिळालं. २००१ सालीच शिरडी संस्थान च काम मिळालं होतं. तसेच तिरुपती, पंढरपूर, आळंदी. यापैकी काही काम स्वखर्चाने ते करतात.

लंडन च्या एक कंपनी कडून कॉन्ट्रॅक्ट मिळवून रुग्णवाहिका बनवण्याचं काम bvg ला मिळालं, पण ते तीन वर्षासाठी होत, ते काम BVG ने पाच महिण्यात पूर्ण केलं, यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहे, अनेकांना वेळेवर अवयव मिळाले, अनेक मुलं ही रुग्णवाहिकेतच जन्माला आली. BVG ने एक APP लाँच केलं ज्यामध्ये हेल्प बटन दाबल्यावर दहा सेकंदात तुम्हाला कंपनी कडून फोन येतो व तुम्ही जिथे आहेत ते ठिकाण त्यांना कळत ज्यावरून तुम्हाला लगेच वैद्यकीय सेवा मिळू शकते.

त्याच बरोबर डायल १०० ची सेवा देखील BVG नेच चालू केली,ज्यामुळे कोणतीही घटना घडल्यास फक्त 100 हा नंबर लावला की 10 ते 15 मिनिटात पोलीस तिथे पोचतात. मध्य प्रदेश हे ही सेवा चालू करणार पहिलं राज्य ठरलं. अशाच प्रकारे अनेक राज्यांमध्ये त्यांनी रुग्णवाहिका आणि इतर सेवा पुरवून कंपनी च नाव शिखरावर पोचवले आहे.