स्त्रियांनी घरच्या घरी करता येण्यासारखे ५ व्यवसाय।। कमी भांडवलात अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकणारे उद्योग ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

स्त्रियांसाठी घरातून करण्यात येण्यासारखे अत्यंत कमी भांडवलामध्ये चालू होणारे पाच व्यवसाय आज आपण बघणार आहोत. तुम्ही शॉर्ट कट मध्ये पैसे कमवाच्या शोधात असाल तर सुरवातीलाच तुमची माफी मागून सांगतो ही माहिती तुमच्यासाठी नाहीये.

कारण प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते तसेच या व्यवसायाला सुद्धा मेहनत लागणार आहे. पण जर मनापासून मेहनत करायची तयारी असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळतेच मिळते. चला तर मग बघूयात.

पहिला व्यवसाय आहे बेकरी प्रॉडक्ट्स: मित्रांनो माझी एक आत्तेबहीण आहे. जेंव्हापासून लॉकडाऊन चालू झाले तेव्हापासून तिने घरीच केक बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तिला भिती वाटत होती की मला जमेल की नाही म्हणून पण तिच्या नवऱ्याने तिचा विश्वास वाढवला.

आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे ओव्हन सुद्धा नाहीये तरी सुद्धा तिने करायचे ठरवले. आधी काही प्रयोग करून पाहिले जेव्हा विश्वास आला तेव्हा तिने तिच्या व्हाट्सअप ग्रुप वर केकची मार्केटिंग करायला सुरुवात केली. हळूहळू ऑर्डर्स येऊ लागल्या सुरुवातीला दिवसाला एक नंतर दोन, तीन आणि आता तिला दिवसाला पाच पेक्षा जास्त ऑर्डर येतात.

कधी कधी तिला काही ऑर्डर कॅन्सल सुद्धा करावे लागतात. एवढा जबरदस्त प्रतिसाद तिला मिळत आहे. कोरोना मुळे लोक शक्यतो दुकानामधून गोष्टी आणायच्या टाळत आहे. पण लोकांचे वाढदिवस, मदर्स डे, फादर्स डे, ब्रदर्स डे, सिस्टर्स डे अशा अनेक गोष्टी साजरा करायची प्रथा आता आपल्या भारतात आली आहे.

आणि प्रत्येक समारंभाला केक हवाच असतो. त्यामुळे मित्रांनो सध्या तुम्ही बेकरी चे प्रॉडक्ट जसे की केक, चॉकलेट, नानकटाई, बिस्किट, चिप्स घरी बनवून त्याचा व्यवसाय चालू केला तर तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. या सगळ्या पदार्थांची रेसिपी युट्युब वर उपलब्ध आहे.

दुसरा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनेल: तुमच्या मध्ये जर काही चांगली कला आहे. तशी की तुम्हाला चांगले जेवन बनवता येतं, डान्स चांगला येतो, तुम्ही कविता चांगली करता, तुम्ही चांगले लिहिता किंवा मुलांवर संस्कार कसे करायचे अशा कोणत्याही विषयांमध्ये तुम्ही एक्स्पर्ट असाल तर तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनेल चालू केले पाहिजे.

सध्या युट्युब वर लोक त्यांची प्रतिभा दाखवून लाखो रुपये कमवत आहे. नुकतेच मी पाहिले कि सत्तर वर्षांच्या आजींनी त्यांचा कुकिंग चॅनेल चालू केला आहे. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. युट्युब चॅनेल वर पैसे यायला थोडा वेळ लागतो, पण एकदा चालू झाले की तुम्ही अनेक मार्गाने यूट्यूब चैनल वर पैसे कमवू शकता. युट्युब चॅनल ओपन करण्यासाठी काही पैसे लागत नाही.

तिसरा आहे टिफिन सर्विस किंवा चटकदार पदार्थांचा व्यवसाय: सध्या कोरोनामुळे हॉटेल मध्ये जायला किंवा बाहेरून जेवण मागवायला लोक घाबरत आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा टिफिन व्यवसाय चालू करू शकता. आमच्या सोसायटी मध्ये एक ताई आहे.

त्यांनी अशीच टिफिन सर्विस चालू केली आहे. त्यामध्ये त्यांनी ५ ते ६ असे मोजकेच मेनू ठेवले आहे. जसे की इडली चटणी, नूडल्स, व्हेज बिर्याणी, पिझ्झा वगैरे वगैरे. त्या ताई त्यांच्या टिफिन सर्विस ची मार्केटिंग रोज आमच्या सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर करत असतात. आणि रोज त्यांचे चार ते पाच ऑर्डर फिक्स्ड असतात.

त्या सांगतात सुट्टीच्या दिवशी तर त्यांना बसायला सुद्धा वेळ नसतो एवढ्या ऑर्डर असतात. मित्रांनो ही उदाहरणे मी का देतोय तर हे व्यवसाय चालत आहे. हे मी स्वतः डोळ्यांनी बघतो आहे. आता आमच्या सोसायटी मध्ये बऱ्याच वृद्ध जोड्या आहे किंवा काही बॅचलर आहे ज्यांना जेवण बनवायला जमत नाही.

अशा लोकांना सुद्धा त्या ताई मंथली मेस ची सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या चाळीमध्ये, कॉलोनी मध्ये, सोसायटीमध्ये अशी टिफिन सर्विस चालू करू शकता. सुरुवातीला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर मार्केटिंग करा. एकदा तुमचे नाव झाले की माऊथ पब्लिसिटी मुळे भरपूर ऑर्डर यायला सुरुवात होते.

चौथे आहे शेअर मार्केट: शेअर मार्केट म्हंटलं कि लोकांना वाटत जुगार आहे. पण लोकांना माहिती नाही कि तो जुगार केंव्हा होतो. जेंव्हा तुम्ही कोणतेही ज्ञान ना घेता शेअर मार्केट मध्ये उतरता आणि शेअर मार्केट मध्ये फक्त्त ट्रेडिंग मधेच पैसा कमावता येतो असे अजिबात नाही.

तुम्ही गुंतवणूकीच्या हिशेबने सुद्धा शेअर मार्केट कडे चांगला पर्याय म्हणून बघू शकता. म्हणजे तुम्ही शेअर मार्केट चा अभ्यास करून कोण कोणत्या कंपनी च्या शेअर मध्ये पैसे गुंतवायचे इतका अभ्यास जरी तुम्ही केला तरी गुंतवणूकीच्या दृष्टीने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

पण तुमच्या मध्ये जिद्द आणि मेहनत करायची तयारी आहे तर शेअर मार्केटचे ज्ञान घेऊन रोज तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर डिमॅट अकाउंट ची गरज लागते डिमॅट अकाउंट मधून तुम्ही शेअर्सची खरेदी-विक्री करू शकता.

मी जे स्वतः डिमॅट अकाउंट वापरतो ते आहे एंजल ब्रोकिंग डिमॅट अकाउंट. कारण इथे डिमॅट अकाउंट ओपन करणे अगदी फ्री आहे. बाकी कुठलेही ब्रोकिंग कंपनीमध्ये तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. इथे डिलिव्हरी फ्री आहे.

आणि ट्रेडिंगसाठी सुद्धा खूप कमी ब्रोकरेज आकारले जाते. तुम्हाला एंजल अकाउंट ओपन करायचे असेल तर ऑफिसिअल साइट वर जाऊन स्वतःची माहिती भरा. आणि आवश्यक ते डॉक्युमेंट अपलोड करा. एक किंवा दोन तासांमध्ये तुमच्या अकाउंट ओपन होईल. शेअर मार्केटमध्ये तुम्ही अत्यंत कमी पैशांमध्ये म्हणजे अगदी पाचशे रुपये असून सुद्धा सुरुवात करू शकता.

पाचवा आहे ऑनलाइन बिजनेस: भविष्यकाळ हा ऑनलाइनचा असणार आहे. आताच तुम्ही निरीक्षण केले असेल तर लॉकडाऊनच्या काळात सुद्धा पूर्ण जग बऱ्यापैकी चालू होते, ते कशामुळे? ऑनलाइन व्यवस्थेमुळे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय तुम्ही ऑनलाईन चालू करू शकता.

जसे की साडी, ड्रेस मटेरियल, मेकअपचे सामान, लहान मुलांचे कपडे, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू. अशा अनेक गोष्टी तुम्ही ऑनलाईन विकू शकता मार्केटिंगसाठी एक फेसबुक पेज बनवा इंस्टाग्राम पेज बनवा , तुमच्या फेसबुकच्या मित्रमैत्रीणींना ते लाईक करायला सांगा.

त्याच्यावर तुमच्याकडची प्रॉडक्टची मार्केटिंग करा. तुम्ही तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप मध्ये, तुमच्या पुढची मार्केटिंग करू शकता. माझे अनेक मित्र आणि नातेवाईक यांनी हा व्यवसाय चालू केला आहे. आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. काय असते आपल्याला सुरवातीला भीती वाटते.

मला प्रतिसाद मिळेल का? अनेक जण हा व्यवसाय करणारे आहे, अशा शंका कुशंका मनामध्ये येता पण माझे म्हणणे आहे आधी तुम्ही प्रयत्न तर करून बघा. हे जे सर्व व्यवसाय मी सांगितले आहे त्याला खूप कमी भांडवल लागणार आहे. म्हणजे अपयश जरी आले तरी तुमचे काहीच जास्त नुकसान होणार नाही.

पण विचार करा जर तुम्हाला कोणते व्यवसायामध्ये चांगले यश मिळाले तर त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती फायदा होईल. मला आशा आहे की या व्यवसायाच्या कल्पना तुम्हाला आवडल्या असतील. तुम्हाला अजून दुसऱ्या काही विषयानुरूप माहिती हवी असेल तर ते फेसबुक कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.