रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून 10 गोष्टी नक्की शिका ।। ह्या १० गोष्टींमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होणार हे नक्की !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून 10 गोष्टी नक्की शिका. जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी पुस्तक ही अतिशय महत्त्वाचा आधार आहे. पुस्तकामुळे समाज, व्यवसाय, आणि देश कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतोय हे आपल्याला कळत. असं म्हणतात “वाचाल तर वाचाल.” तर पुस्तक ही वाचायलाच पाहिजे.

उद्योजकाने तर पुस्तकं वाचली पाहिजेत. प्रसिद्ध बिझनेसमन आणि उद्योजकांचा आत्मचरित्र त्यांनी संबंधित विषयावर केलेल्या लेखनामुळे, तुमच्यात त्यांच्यासारखी कुशाग्र आणि प्रगल्भता सुद्धा येऊ शकते. त्यामुळे बिसनेस मध्ये नाविन्य पणा आणि प्रेरणेसठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे “वाचाल तर वाचाल” ही गोष्ट मात्र मनात पूर्णपणे बिंबवली पाहिजे. आता आपल्याला वाटेल की दोनशे-तीनशे पानी पुस्तक कोण वाचणार? आम्हाला कामातून वेळच मिळत नाही.

तर पुस्तक हातात घेतल्या घेतल्या काही लोक सांगतात की आम्हाला झोप येते. तर काही लोक बोलतात की (book is not my cup ऑफ tea).साधारण पुस्तकाला लोक घाबरतात. आणि म्हणूनच पुस्तकाचं अंतरंग उलगडून सांगणार, संबंधित पुस्तकात लेखकाने काय सांगितलं आहे, तसच या पुस्तकातून आपल्याला नक्की काय घ्यायच आहे, या सर्व बाबी आज आपण पाहणार आहोत.

रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकात नक्की काय आहे हे आपण समजून घेवूयात. रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून कोणत्या 10 गोष्टी शिकायच्या आणि त्यांचा अभ्यास कसा करायचा ह्याची माहिती घेणार आहोत. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याला वेगळ्या स्तरावर घेवून जाण्यास हे पुस्तक फायदेशीर आहे.

अमेरिका स्थित लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी या रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकाच लेखन केलेलं आहे. या पुस्तकात पर्सनल फायनान्स, आंतरप्रेनोर्शिप, बिझनेस, इंवेस्टिंग, इकॉनॉमिक्स, या बाबी त्यांनी अतिशय साध्या शब्दात मांडल्या आहेत. हे पुस्तक आतापर्यंत 51 भाषा मधे अनुवादित केलेले असून या पुस्तकाचे आतापर्यंत 32 मिलियन प्रती विकल्या गेल्या आहेत. प्रत्येक प्रोफेशनल माणसाला आज या पुस्तका बद्दल माहिती आहे.

लेखकाला यात सांगायचं आहे की श्रीमंत किंवा यशस्वी लोक जे आपल्या मुलांना पैशाबद्दल ज्ञान देतात. तसच ज्ञान मध्यवर्गीय पालक त्यांच्या मुलांना सांगत नाहीत. आणि तेच सांगण्यासाठी लेखकाने हे पुस्तक लिहिलंय. की जेणेकरून मध्यमवर्गीय लोकांना सुध्दा कळलं पाहिजे की साधारणत: फिनान्सियल लिटरसी म्हणजे काय प्रकार आहे. आता आपण त्या कोणत्या 10 बाबी आहेत ज्या आपण शिकल्या पाहिजे हे पाहुयात.

शिकवण १ : सगळ्यात आधी पुस्तकात सांगितले आहे (लर्न टु लिस्टन) सर्वप्रथम दुसऱ्याचं ऐकायला शिका. बिझनेस, कंपनी, कॉलेज, कुठेही असाल सर्वप्रथम समोरच्या माणसाचा आपण ऐकत नाही किंवा अर्धवट ऐकतो. त्यामुळे काही भलतेच गोष्टी होतात. पण यात आपलाच नुकसान होत. कधी कधी आपल्याला वाटत की आपला मुद्दा योग्य आहे म्हणून आपण समोरच्याला बोलू देतच नाही. पण जरी तुमचा मुद्दा योग्य असेल तरी सर्वप्रथम समोरच्याचे सर्वप्रथम ऐका. आणि नंतर तुमच मत मांडा. बेस्ट आहे की लोकांना ऐकायला सुरुवात करा.

शिकवण २ (pay yourself first) म्हणजे थोड स्वार्थी बना : जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त पैसा कमवायचा असेल तर आपल ध्येय सर्वांगीण विकासाबाबत थोड स्वार्थी बना. आपल काम आणि शिक्षण यावर जास्त भर द्या. अशावेळेस अन्य बाबींचा विचार करू नका. असे रॉबर्ट कीयोसाकी सांगतात. स्वतःची ग्रोथ ही झालीच पाहिजे.

शिकवण 3 (buy luxuries last) चैनीच्या वस्तू सर्वात शेवटी घ्या : तुमच्या उमेदीच्या काळात चैनीच्या वस्तूवर पैसे गुंतवू नका. यावेळेस शिक्षण, कोर्सेस, यावर जास्त भर द्या. चैनीच्या वस्तू शाश्वत नाहीत. पण तुम्ही घेतलेले ज्ञान अमूल्य आहे. जर तुम्ही ज्ञानग्रहण केलं तर तुम्ही या चैनीच्या वस्तू सहज विकत घेऊ शकता. एक वाक्य असं आहे की (you are learning before earning). तुम्ही जेवढे शिकता तेवढेच कमवता.

शिकवण ४ (Reduce expenses and liabilities)अवाजवी खर्च करू नका : सध्या शॉपिंग आणि ऑनलाईन ऑर्डर यावर बराच खर्च होतो. यावर आवर घाला तसेच कार, कपडे, आणि चैनीच्या वस्तू या लायबिलिटी आहेत यावर जास्त पैसे खर्च करु नका. ब्रँडेड गोष्टींचा अट्टहास करू नका. कारण की त्याशिवाय सुद्धा तुम्हाला चांगल्या वस्तू सहज घेऊ शकता येतात.

शिकवण ५ (aim for more valuable assets) सेविंग्ज करण्यासाठी प्लॅन करा : इंवेस्टमेंट, रिटायरमेंट प्लॅनिंग करा, सेविंगस वर भर द्या, या गुंतवलेले पैसे दुप्पट तिप्पट सुद्धा होतात. तुम्ही खूप हुशारीने यात पैसे गुंतवले तर तुमचे काम चांगला होऊ शकत.

शिकवण ६ (be in control over your emotions) तुमच्या भावणांवर आवर घाला : बिझनेस किंवा कॉर्पोरेट लाईफ मध्ये तुमच्या भावनांना कोणताच वाव नसतो. तुम्ही तुमच्या भावनांचं प्रदर्शन केल्यास तुम्ही मागे पडू शकता. म्हणून जीवनात भावनांना आवर घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बिजनेस जजबाती हो के मत करो.

शिकवण ७ (वर्क to learn, don’t work to earn) तर साधारण जीवनात उमेदीच्या काळात आणि नंतरही शिकण्यावर जास्तीत जास्त भर द्या : पैसे जास्त मिळत आहेत म्हणून तुम्ही नोकरी जॉईन करू नका. त्यातून तुमची प्रोफाईल कशी डेव्हलप होते बिल्ड होते त्याचा जास्त विचार करा. तुमच्या करियर व फ्युचर प्रोस्पेक्ट्स याचा जास्त विचार केला पाहिजे.

शिकवण ८ (Read a lot) महत्त्वाचा मुद्दा पुस्तक वाचा : तुमची हुशारी तुम्ही वाचलेल्या पुस्तकांवरून कळते. सोबत अमाप ज्ञानाचा संग्रह म्हणून पुस्तक वाचन अतिशय अतिशय गरजेचे आहे. जर तुम्हाला पुस्तक वाचण्याचा कंटाळा असेल तर सध्या अनेक पुस्तकं ऑडिओ स्वरूपात सुद्धा मिळतात. ती ऐका त्याचबरोबर न्यूज पेपर, तुमच्या आवडीच्या आणि कामाच्या विषयी काहीतरी कुठेतरी वाचतच रहा. आज इंटरनेट आहे, गुगल आहे, जास्त इन्फॉर्मेशन लोकांना मिळू शकते. पण फोकस इन्फॉर्मेशन घ्या.

शिकवण ९ (Reinvestment excess cash generated by assets) तुमच्या एसेट्स मधून मिळालेल्या पैशांची पुन्हा गुंतवणूक करा : असे पैसे खर्च करण्यापेक्षा गुंतवणूक करण केव्हाही चांगंल. अनेक लोक पॉलिसी, फ्लॅट्स, बिझनेस प्रोफिदेंट फंड, मधून मिळालेल्या पैशाची पुन्हा पुन्हा गुंतवणूक करतात. तुम्ही सुद्धा अशी गुंतवणूक करू शकतात. आणि तुमची फिनांशियल कॅपॅसिटी आणखी सुधारावी म्हणून प्रयत्न करू शकतात.

शिकवण १० (Surround yourself with people smarter than you)आपल्या आजूबाजूला हुशार माणसांची संगत ठेवा : रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातील हा अतिशय सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्यापेक्षा स्मार्ट आणि हुशार लोकांसोबत रहा. अशा लोकांचा ज्ञान आणि अनुभव मोठा असतो. त्यातून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखे आहे.

म्हणूनच आपल्या अवतीभवती आपल्या पेक्षा हुशार लोक असुद्यात. हे अतिशय गरजेचे आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की “यूवर नेटवर्क डिसाईड युवर नेटवर्थ” तुमच्या आजूबाजूला जशी मनसे आहेत तसेच तुम्ही बनता. रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा वापर करा आणि तुमचा बिझनेस आणि तुमची लाईफ डेव्हलप करा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.