मृत्यू नोंद प्रमाणपत्र/मृत्यू प्रमाणपत्र कसे काढावे, व का काढावे या विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो मृत्यु प्रमाणपत्र बऱ्याच ठिकाणी मागितले जाते, जसे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल आणि त्याच्या पुराव्यासाठी, मृत्यु प्रमाणपत्र वारसा हक्क प्रस्थापित करण्याकरिता,
विम्याची रक्कम मिळवण्याकरता, शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम त्या व्यक्तीच्या वारसांना मिळविण्यासाठी, एखाद्या विधवा स्त्रीला शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर तिला तिच्या पतीचा मृत्यू दाखला मागितला जातो.
आणि अशा बऱ्याच ठिकाणी मृत्यू दाखला मागितला जातो. चला तर मग बघूया एखाद्या मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मोबाइलवरून ऑनलाईन कसे काढले जाते. तर तुम्हाला आता google chrome ओपन करून टाईप करायचा आहे आपले सरकार.
आपले सरकार टाईप केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्याला 3 डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करून खाली यायचे आहे व डेस्कटॉप site सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसेल आपले सरकार त्यावर जायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली यायचे आहे.
तुम्ही या संकेतस्ताळावर नवीन असाल तर तुम्हाला इथे नवीन अकाउंट ओपन करावा लागेन. अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला तुमचं username पासवर्ड captcha टाकून लॉग इन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईट ची जी भाषा आहे ती मराठी मध्ये करून घ्यायची आहे. उजव्या बाजूला मराठी भाषेचा ऑपशन आहे.
त्यावर क्लिक करून मराठी भाषा करायची. भाषा सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तीन रेषा दिसेल त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली येऊन ग्रामविकार व पंचायत राज विभाग यावर क्लिक करायचे त्यानंतर खाली यायचं आहे तिथे मृत्यू नोंद दाखला या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
आणि पुढे जा या ऑपशन वर क्लिक करायचे. त्यानंतर एक पेज ओपन होईल तिथे परत मृत्यू नोंद दाखला या ऑपशन वर क्लिक करायचे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्या व्यक्तीचा ज्या जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेला असणार आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा व त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे.
मृत्यू व्यक्तीचं नाव या ऑपशन खाली मृत्यू व्यक्तीचे नाव टाकायचे आहे. नंतर मृत्यूची तारीख टाकायची आहे त्यासाठी वर्ष महिना सिलेक्ट करायचा. मित्रांनो इथे तुम्हाला मृत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक उपलब्ध असल्यास टाकायचा आहे. व त्यानंतर समावेश करा या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्ही बघू शकता तुमचा अर्ज यशस्वी रित्या जतन करण्यात आलेला आहे. तुम्हाला अर्ज क्रमांक दिसेल त्यानंतर ok या ऑपशन वर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला payment करण्यासाठी एक पेज ओपन होईल त्यात खाली यायचे आहे आणि तुम्हाला २३.६० रक्कम भरायची आहे आणि पुष्टी करा या ऑपशन वर क्लिक करायचे.
त्यानंतर payment साठी पेज ओपन होईल त्यात तुम्हाला विविध ऑपशन दाखवतील ऑनलाईन वालेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड, IMPS, UPI ज्याने तुम्हला पेमेंट करायचा आहे. आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वर क्लिक करूया. त्यानंतर उजव्या बाजूला एक ऑपशन दाखवत आहे ऑल बँक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, त्यावर क्लिक करूया.
त्यानंतर payment डिटेल्स येतील. प्रोसेड तो payment करूया. Payment केल्यानंतर तुम्हाला जो कालावधी दिला जाणार आहे, पाच दिवस, दहा दिवस तर त्या तारखेला तुम्हाला इथं परत लॉग इन करायचं आहे username पासवर्ड टाकून. लॉग इन झाल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता
एक ऑपशन ‘तुमच्या अर्जाचा आढावा’ तिथे खाली येऊन तुमच्या अर्जाच्या क्रमांका समोर उजव्या बाजूला आल्यावर प्रमाणपत्र डाउनलोड करा हा ऑपशन दिसेल. त्यावर तुम्हाला दिलेल्या कालावधी नंतर त्या ऑपशन वर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे.
हे प्रमाणपत्र पूर्ण प्रमाणित असणार आहे यावर तुम्हाला कोणाचीही सही घ्यायची गरज नसणार आहे. तर अश्या प्रकारे तुम्ही घरबसल्या मृत्यू दाखला/मृत्यू नोंद प्रमाणपत्र काढू शकता. आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा !
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
मंजुळा पाडुरंग जाधव
Deth 17/2/2007 nasik
मृत्यू प्रमाणपञ
मु पो अनुराबाद था मलकापुर जिस बुलढाणा
Babi Kabale