सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल? ।। ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो आज आपला विषय जरा वेगळा आहे आज आपण नित्याच्या विषयाला फाटा देत सामान्यवर्गाचा असा महत्वाचा विषय चर्चेसाठी घेत आहोत. आज आपण बघणार आहोत कि सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल. भारतात सोनं खरेदीचं प्रमाण मोठं आहे.

गुंतवणूक म्हणूनही सोनं खरेदी करण्यालाच जास्त पसंती दिली जाते. पण अनेकदा सर्वसामान्य व्यक्तींना सोनं खरेदीत फसवणुकीचाही सामना करावा लागतो. सोनं खरं आहे, की खोटं हे ओळखता न आल्यामुळे ही फसवणूक होते. सोन्यात अंगठी बनवत असताना बनविल्यानंतर touch काढून घ्या,

बरेच सराफ लोक हे फायद्यासाठी kdm मध्ये दागिने तय्यार करुन देतात ..त्यात सोन्याचे पैसे हे त्यात किती टक्के सोने आहे ( कॅरेट प्रमाणे 16/18/22/24 ) प्रमाणे घेत नाहीत. ते लमसम घेतात समजा उदाहरणार्थ. तुम्ही मंगळसूत्र बनवायला दिले आहे 3( 30 ग्राम) तोळे चे आणि त्यादिवसाचा सोन्याचा भाव हा 31500/- असेल

तर आपला प्रश्न सोनाराला हा असला पाहिजे की हा दागिना किती कॅरेट चा असेल ? आणि जसे 916 हॉलमार्क बनवायच्या असेल तर त्यात 91.60 % सोने असते इतर तांबे,चांदी, असते तर सोनाराने 31500 च्या 91.60% च सोन्याचा भाव लावला पाहिजे . जेव्हा दागिने तयार होतील तेव्हा त्यांच्या net weight सोन्याचे आणि gross weight नक्की पाहिजे असे सांगा

तसेच त्यांच्या कडून touch report नक्की घ्या 50/- रुपयात येतो .जेणे करून त्यात किती टक्के सोने आहे आणि किती कॅरेट सोने वापरले आहे ते कळेल, माझ्या कडे एक याजमान पुष्कराज, निलम करीत आले त्यांनी आपल्या जवळील मंगळसूत्र दिले ते त्यांना सोनाराने kadm मध्ये बनवुन दिले 6 वर्षांपासून ते वापरत होते,

बनविले त्यावेळेस 91% सोने वापरले आहे असे सांगितले आणि पैसे पण 91% घेतले सोन्याच्या भावा प्रमाणे परंतु मी tunch काढला त्यावेळेस ते फक्त 70 ते 75 टक्के सोने होते ..ही खुप मोठी फसवणूक आहे म्हणजे आजच्या तारखेला 21 % सोन्याचे 3 तोळे चे ( 31500 × 21% × 3 तोळे – 19845 /- ) अश्यांप्रकारे हे प्रकार चालु आहेत.

सध्या हॉलमार्क पद्धत शहरात जरी असली तर बरेच सोनार हे जास्त मजुरी सांगून kdm मध्ये बनवण्याचा plan करीत लूट करीत आहेत. गावातील सध्या अशिक्षित लोक तर सर्वात जास्त बळी पडत आहेत. मुंबई पुणे सारख्या शहरात सुसूक्षित वेल एज्युकेटेड लोक पण हा विचार करत नाही, हे दुर्दैव ।

लोकल ज्वेलर कडून खरेदी केली असता असे प्रकार नक्कीच घडतात, त्यामूळे सोने दागिने किंवा चोख सोने हे हॉलमार्क ज्वेलरी विक्रेत्या कडूनच खरेदी करावी. भले त्यांचा मजुरी चा दर लोकल ज्वेलर च्या तुलनेत जास्त जरी असला तरी रिप्लेस च्या वेळी चालूच्या दरा प्रमाणे दागिना माघारी घेतला जातो, त्यात कोणतीही वजावट घातली जात नाही.

काय आहे हॉलमार्क?: सोन्यावरील हॉलमार्क हे शुद्धतेचं एक प्रमाण आहे. सध्या हॉलमार्कची निवड ही ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोला हॉलमार्कचे प्रशासकीय अधिकार आहेत. हॉलमार्कच्या दागिन्यांवर बीआयएसची खूण पाहायला मिळेत.

परवानाधारक प्रयोगशाळेत सोन्याची शुद्धता तपासली आहे का ते बीएसआयमुळे समजतं. बीएसआयने १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट या तीन ग्रेडसाठी हॉलमार्क मानक निश्चित केले आहेत. तर आपण अशाप्रकारे जाणून घेतले कि सोई खरेदीमध्ये आपली कशी फसवणूक होऊ शकते त्यामुळे स्वतः जागरुक व्हा आणि इतरांना देखील हि माहिती पाठवून जागरूक बनवा!

2 thoughts on “सोने खरेदीमध्ये आजकाल कशा प्रकारे आपल्याला फसवले जाते आणि ते कसे टाळता येईल? ।। ग्राहक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या !

  1. राशी खडया विषयी पण माहीति दया

  2. सोन्याची हाव सोडून द्या. सोनं खरेदीमध्ये तुमचा कधीच फायदा होत नाही. फायदा फक्त सोनाराचाच होतो व होत असतो. आज तुमच्याकडे जर का ५० वर्षांपूर्वी खरेदी केलेले सोनें असेल तरच तुमचा रोखीने फायदा आहे. आज तुम्ही सोन घेतलं तर त्यात सोनाराच कमावतो व तुम्ही कायम नुकसानीत असता. त्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा…….. निश्चितपणे फायदा तुमचाच आहे.

Comments are closed.