Skip to content

Online News Feed

Local Coverage Global Perspective

  • शेती
  • शैक्षणिक
  • लोकप्रिय
  • अर्थकारण
  • प्रवास
  • बातम्या
  • मनोरंजन
  • आंतरराष्ट्रीय
  • क्रीडा
  • Privacy Policy
    • About Us
    • Contact Us
site mode button

नवीन लोकांनी शेअरमार्केट मध्ये सुरुवात कशी करावी?।। शेअर मार्केट मध्ये पहिले पाऊल कसे टाकावे?।। सुरुवात करण्याअगोदर ह्या ५ गोष्टी माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक
March 20, 2021admin

मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाही. कुठून सुरुवात करू? माझ्याकडे पैसे नाही, पण मला शेअर मार्केट शिकायचे आहे. काय करू? मी शेअर मार्केट मधून खरचं रोज पैसे कमवू शकतो का? शेअर मार्केट जुगार आहे का? हे खर आहे का? मित्रांनो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत.

शेअर मार्केट मध्ये खरंच रोज पैसे कमावता येतात का?: हो, तुम्ही खरच शेअर मार्केट मधून रोज पैसे कमवू शकता. अनेक लोक शेअरमार्केट मधून रोज पैसे कमवत आहेत,पण कधी? खाली दिलेल्या पाच मुद्द्यांची जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर, नवीन लोकांसाठी हि माहिती खूपच फायदेशीर होणार आहे.

शिवाय अनुभवी लोकांना आपण आतापर्यंत कुठे चुकत होतो हे सुद्धा समजणार आहे. कारण हे पाच मुद्दे शेअर मार्केटमध्ये तज्ञ असणाऱ्या सर्व लोकांशी बोलून बनवले आहे. त्यामुळे एकही मुद्दा चुकवु नका.

१)शेअर मार्केटचे सखोल ज्ञान संपादन करणे: साधा विचार करा, 20 हजाराची नोकरी करण्याकरिता आपल्याला पंधरा वर्षं ज्ञानसंपादन करावे लागते. पंधरा वर्षे अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला वीस हजाराची नोकरी मिळते. मग शेअर मार्केटमध्ये काहीही ज्ञान न घेता आपण कसे पैसे कमवू शकतो?

90% लोक ज्यांचे शेअर मार्केटमध्ये नुकसान होते याचे कारण म्हणजे हे लोक कोणतेही ज्ञान न घेता घाईगडबडीने शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचे प्रयत्न करतात आणि जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा ती इतर लोकांना सांगतात की शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे.

त्यामुळे पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की शेअर मार्केट जुगार आहे ते त्या लोकांसाठी ज्यांना कोणतेही ज्ञान न घेता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत. शेअर मार्केट चे जादूगार वारन बफेट रोज ६ ते ८ तास वाचन करायचे. ज्ञान संपादन करायचेत, त्यांचा सखोल अभ्यास होता,

म्हणून ते आज जगात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत म्हणून कोणतही ज्ञान न घेता तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या हाताने तुमचे नुकसान करून घेत आहात हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की शेअर मार्केट बद्दल ज्ञान घ्यायचे म्हणजे नक्की सुरुवात करायची कुठून?

तर, शेअरमार्केट बद्दल जर ज्ञान मिळवायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला शेअर मार्केटचा Index बद्दल माहिती असायला हवी. शेअर मार्केट मध्ये दोन Index आहेत. Sensex आणि Nifty. Sensex मध्ये तीस कंपन्या असतात त्यांची पूर्ण माहिती घ्या व Nifty मध्ये पन्नास कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा माहिती घ्या.

त्या माहितीमध्ये buy and sell, stop loss, Target, longer term, short term अशा अनेक विषयांची सखोल माहिती घ्यावी. अभ्यास करा. या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून मगच तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरा.

2)कुठल्याही फुकट मिळणाऱ्या टिप्स किंवा जाहिरातीवर विश्वास ठेवू नका: जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरता, तेव्हा तुम्हाला अनेक लोक टिप्स देतात, तुम्हाला बरेच जण कोणता शेअर विकत घ्यावा यासाठी सल्ले द्यायला तयार असतात. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की,

एखाद्याला जर गुंतवणुकीचे कॉल काढता येत असेल तर तो दुसऱ्याला सांगण्याआधी स्वतः गुंतवणूक करून श्रीमंत नाही का होणार? अशा लोकांचा उद्देश हा तुमच्याकडून पैसे उकळण्याचा आहे हे लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्हाला मोफत कॉल देतात व मग तुमच्याकडून पैसे काढून घेतात अशा मोफत व निरर्थक मिळणाऱ्या सल्यांना अजिबात बळी पडू नका.

पण तुम्हाला वाटतं एखादी व्यक्ती शेअर मार्केट मध्ये भरपूर दिवसापासून आहे .त्याला सर्व प्रकारचे गुंतवणुकीचे कॉल ही माहिती आहे. तर अशा व्यक्तीने तुम्हाला दिलेले कॉल तुम्ही एक दोन महिने पेपर ट्रेडिंग करून बघा. पेपर ट्रेडिंगचे कॉल 80 टक्के यशस्वी झाले तर त्याचे कॉल स्वीकारायला हरकत नाही.

3)तुम्हाला शेअर मार्केट मध्ये काय बनायचे आहे? इन्वेस्टर की ट्रेडर्स? हे आधी ठरवा: मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये लोक दोन प्रकारची कामे करतात. एक म्हणजे इन्वेस्टर आणि दोन म्हणजे ट्रेडर्स. इन्वेस्टर म्हणजे जे लोक दीर्घ कालावधीसाठी शेअर विकत घेतात. कारण त्यांचा उद्देश हाच असतो की त्यांना आपला गुंतवणूकीवर भरपूर पैसे कमवायचे असतात.

आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला काही वर्षांनी चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे हाच त्यांचा उद्देश असतो म्हणजे बँक मध्ये एफडी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा जर चांगल्या शेअरमध्ये पैसे गुंतवले तर त्याचे रिटर्न्स या सर्वांपेक्षा कितीतरी जास्त असतात.

दुसऱ्या प्रकारचे लोक ट्रेडर्स असतात. ते फार कमी कालावधीसाठी म्हणजे एक महिना, एक आठवडा, किंवा एका दिवसासाठी तेे शेअर मध्ये पैसे गुंतवतात. तुम्ही ट्रेडिंगमध्ये मार्जिन चा वापर करून कमी पैशांमध्ये जास्त शेअर्स विकत घेऊ शकता. इन्वेस्टमेंट मध्ये तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात.

पण ट्रेडिंग मध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. शेअर मार्केटमध्ये मोठे मोठे तज्ञ सांगतात की शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना ती इन्वेस्टमेंट पासूनच करायला पाहिजे. इन्वेस्टमेंट मध्ये तुम्ही पूर्ण पैसे देऊन शेअर विकत घेऊ शकता व तुम्हाला हवे तितक्या कालावधीसाठी ते शेअर तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता.

इन्वेस्टमेंट मध्ये चांगला अनुभव आल्यानंतर तुम्ही short term ट्रेनिंग करू शकता. त्यामध्ये तुम्ही positional or swing ट्रेनिंग करू शकता. या ट्रेनिंगचा कालावधी एक महिना किंवा एक आठवड्यापर्यंत असतो. वरील सर्व गोष्टींचा अनुभव आल्यानंतर इंटरनल ट्रेडिंग करायचं व त्याचा कालावधी हा फक्त एका दिवसाचा असतो.

मित्रांनो, बरेच लोक सुरुवात internal ट्रेडिंग पासून करतात. जी गोष्ट सर्वात शेवटी करायची त्याच गोष्टी पासून जर तुम्ही सुरुवात कराल तर कसे होईल? शेअर मार्केट मध्ये अनुभवी लोक काय सांगतात, या बद्दल ही माहिती दिली आहे. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला इन्वेस्टर म्हणून काम करायचे आहे की ट्रेडर बनायचे आहे.

४)पेपर ट्रेडिंग: मित्रांनो, तुम्ही जर ट्रेडर म्हणून काम करायचा विचार करत असाल तर तुम्हाला पेपर ट्रेडिंग करणे अनिवार्य आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे तुम्ही शोधलेल्या कंपन्या रोज लिहून काढणे व त्यांचे उद्दिष्ट सुद्धा रोज लिहून काढणे. आणि दिवसाच्या शेवटी बघणे की तुम्ही लावलेले किती उद्दिष्ट साध्य होतात.

जेव्हा तुम्ही काढलेले अंदाज हे 80 टक्के च्या वर जाते म्हणजेच तुम्ही काढलेल्या कंपन्यांचे उद्दिष्ट जेव्हा ८० टक्के साध्य होते तेव्हा तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तयार झाला आहात असे समजावे. अनुभवी लोक सांगतात, सुरुवातीला तुम्ही दोन ते तीन महिने पेपर ट्रेडिंग केली पाहिजे व सलग एक महिना तुमचे टार्गेट हे 80 टक्केच्या वर असले पाहिजे.

तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडर्स म्हणून उतरा. काही लोक आणखी एक पद्धत वापरतात. ती म्हणजे पहिले एक किंवा दोन महिने एक किंवा दोन शेअर्स ते विकत घेतात आणि ते विकतात आणि ते तपासून बघतात की आपला किती नफा होतोय आणि आपला तोटा किती होतोय.

एक किंवा दोन शेअर्स असल्यामुळे तोटा जास्त होत नाही आणि तुम्हाला खऱ्या मार्केटचा अनुभव मिळतो आणि इथे सुद्धा 80 टक्‍क्‍यांच्या वर तुमचे कॉल हिट व्हायला सुरुवात झाली की नंतर शेअर ची संख्या हळूहळू वाढवायची. मित्रांनो, शेअरची खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंटची गरज लागते. बरेच जण अँजेल डिमॅट अकाउंट वापरतात. इथे इन्वेस्टमेंट म्हणजेच डिलिव्हरी चार्जेस फ्री आहे. तुम्ही सुद्धा तुमचे अकाउंट येथे उघडू शकता.

5)संयम पाळणे: मित्रांनो, हा सर्वात शेवटचा मुद्दा असला तरी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. 95% लोक शेअर मार्केट मध्ये येतातच ह्या हेतूने की, मी इथे आल्यावर झटपट श्रीमंत होईल. मला येथे लवकर पैसे मिळाले पाहिजे आणि या झटपट पैसे मिळवण्याच्या नादात तोच त्यांचे खूप मोठे नुकसान होते.

तुमच्या मध्ये सुद्धा संयम ठेवायची वृत्ती नसेल तर तुमच्यासाठी शेअर मार्केट नाही कारण शेअर मार्केट मध्ये खूप संयम ठेवावा लागतो. जसे आपण शाळेत असताना आपल्याला वेगवेगळे विषय होते. जशी इतिहास, भूगोल, गणित तसेच शेअर मार्केट सुद्धा एक मोठा विषय आहे.

त्याचा चांगला अभ्यास करून मगच नफा कमावणे या गोष्टीला चांगला संयम लागतो. मित्रांनो, हे होते ते शेअर मार्केट बद्दल चे पाच महत्त्वाचे मुद्दे ते जर तुम्ही व्यवस्थित अमंलात आणले तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता. फक्त संयम पाळा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Tagged online share marketshare market liveshare market logoshare market newsshare market timeshare market todaysharemarket gameशेअर मार्केटशेअर मार्केट appशेअर मार्केट hindiशेअर मार्केट in hindiशेअर मार्केट liveशेअर मार्केट आजशेअर मार्केट कसे शिकायचेशेअर मार्केट टिप्सशेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावीशेअर मार्केट मराठीशेअर मार्केट मराठी पुस्तक pdfशेअर मार्केट माहितीशेअर मार्केट म्हणजे कायशेअर मार्केट लाईव्हशेअर मार्केट ॲपशेअर मार्केटिंगशेअरमार्केट मध्ये सुरुवात कशी करावी?शेयर बाजारशेयर मार्केटशेयर मार्केट मराठी

Post navigation

नवीन स्मार्टफोन घेताय? कुठल्या गोष्टींची काळजी आपण नवीन स्मार्टफोन घेताना घेतली पाहिजे?।। नवीन फोन घेण्याच्या फोन कंपन्यांनी लावलेल्या सवयीला आपण कुठल्या गोष्टींचा विचार करून थांबवू शकतो?।। याविषयी महत्वाची माहिती !
स्त्रियांनी घरच्या घरी करता येण्यासारखे ५ व्यवसाय।। कमी भांडवलात अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकणारे उद्योग ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

Related Posts

एखादी जागा विकल्यानंतर जर त्या जागेचे काही क्षेत्र रस्त्यामध्ये बाधित झाले किंवा संपादन झालं तर अशा परिस्थितीत काय होत? ।। ठराविक सहहिस्सेदरांच्या लाभत हक्कसोडपत्र करता येतं का?।। वर्ग दोनची जागा जर विक्री झाली असेल तर त्या मूळ मालकाचे वारस त्याला आव्हान देऊ शकतात का? ।। एखाद्या जमिनीची खाजगी मोजणी केली तर ती अवैध ठरते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

August 26, 2021admin

विधान परिषदेची निवडणूक पद्धती || पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक हि कशा प्रकारे केली जाते याबाबत अतिशय महत्वाची माहिती !

November 27, 2020November 27, 2020admin

कसत असलेल्या जमिनीचा मालक बेपत्ता असल्यास? ।। बोजा असताना न्यायालयीन वाटप होवू शकते का?।। शेतकरी नसतांना शेतजमीन खरेदी केल्याची तक्रार कशी करावी ?।। तुकडा बंदी नुसार किमान क्षेत्रफळ किती? ।। नोटरी कुलमुखत्यारपत्राद्वारा केलेले खरेदीखत वैध ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

May 21, 2021admin

आपल्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका !

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल !

  • ..म्हणून अजूनही म्हणावी तशी थंडी पडत नाहीये!! जाणून घ्या!! January 2, 2025
  • गर्भपाताचा कायदामध्ये कोणत्या देशाने केली घटनादुरुस्ती? जाणून घ्या!! January 2, 2025
  • बिटकॉईनचे जनक कोण? त्याची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या!! January 2, 2025
  • भारतात सर्वात जास्त चालणारे 10 बिझनेस कोणते? जाणून घ्या!! January 2, 2025
  • …म्हणून जंजिरा समुद्रातील एक रहस्यमय किल्ला मानला जातो!! January 2, 2025

Recent Comments

  • Purushottam Gadekar on जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • नानासो कोतवाल on आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • नानासो कोतवाल on आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का?।। एखाद्या जमिनीवर जर वहिवाट असेल तर त्याची मालकी मिळते का? ।। नवीन शर्त म्हणजे काय? ।। कॅव्हेट म्हणजे काय? ।। जमीनीला कूळ लागल्यावर त्याची मालकी कशी मिळवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !
  • Manish Dhepe on घटस्फोट आणि कायदा ।। घटस्फोट कोणत्या कारणांसाठी घेतला जाऊ शकतो? ।। केव्हा व कोण घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो।। घटस्फोटाचे प्रकार इत्यादी माहिती जाणून घ्या या लेखातून !
  • मिनाक्षी गुंड on वडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात ।। ७/१२ उताऱ्यावर वाटप नोंद कशी केली जाते ? ।। शेतकर्यांसाठी अतिशय मोलाची माहिती !

Archives

  • January 2025
  • November 2024
  • September 2024
  • August 2024
  • July 2024
  • June 2024
  • May 2024
  • April 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • February 2021
  • January 2021
  • December 2020
  • November 2020
  • October 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020

Categories

  • Uncategorized
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • कायदा
  • क्रीडा
  • प्रवास
  • बातम्या
  • मनोरंजन
  • लोकप्रिय
  • शेती
  • शैक्षणिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
© Copyright 2022 Online News Feed | Theme: News Portal by Mystery Themes.

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp चॅनेल ला फॉलो नक्की करा !