वाहतुकीचे असे नियम कि जे प्रत्येक वाहनचालक तसेच सामान्य लोकांना माहित असायलाच हवेत ।। हक्क, कायदे, आणि तरतुदी !!

प्रवास लोकप्रिय शैक्षणिक

ट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील. पुन्हा कधीच पोलिसांना घाबरणार नाही. आपल्या पैकी बहुतांश जणांकडे दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेलच आणि नसली तरी कधी ना कधी कुणा नातेवाईक किंवा मित्रांची गाडी तर तुम्ही चालवली असेल

आणि गाडी चालवताना ट्राफिक पोलिसांनी एकदा तरी तुम्हाला पकडलं असेलच. आणि म्हणूनच त्यासारसंदर्भात असलेले नियम आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. सर्वात आधी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे वाहतुकीचे नियम हे आपल्या फायद्या साठी आणि सुरक्षिततेसाठी च बनवले आहेत.

आणि म्हणूनच ते पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. 1.प्रत्येक ट्राफिक पोलीस हे गणवेशात असणे आवश्यक आहे. त्यावर त्यांचा बक्कल नंबर आणि नाव असायला हवे. जर त्यांच्याकडे ते नसेल तर तुम्ही त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवण्यासाठी सांगू शकता.

जर त्यांनी तस केलं नाही तर तुम्ही तुमच्या गाडीची कागदपत्रे त्यांना देण्यास नकार देऊ शकता. 2.ज्या ट्राफिक पोलिसांनी तुम्हाला अडकले आहे त्यांच्या कडे दंडाचे पावती पुस्तक किंवा इ चलन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय ते तुमच्याकडुन दंड वसूल करू शकत नाहीत.

3.ट्राफिक पोलिसांनी तुमची गाडी अडवल्यास, गाडी सावकाश बाजूला घ्या, गाडी ची चावी काढून स्वतः जवळ ठेवा आणि मग कागदपत्रे दाखवा. लक्षात ठेवा तुम्हाला फक्त कागदपत्रे दाखवायची आहेत. ट्राफिक पोलिसांच्या स्वाधीन करायची नाहीत. नेहमी लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणे बंधनकारक आहे.

4.तुम्ही ट्राफिक पोलिसांना सहकार्य करायला हवं तसेच त्यांनी देखील तुमच्याशी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. त्यांच्याशी हुज्जत घालणे प्रामुख्याने टाळावे. जर समजा काही चूक झालीच तर ती त्यांना नीट समजावून सांगा कदाचित ते तुम्हाला सोडू ही शकतात.

5.ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीच्या चाव्या बाहेर काढून घेऊ शकत नाहीत ते तुमच्याशी कोणतेही गैरवर्तन करू शकत नाहीत. 6.जर रस्त्याच्या कडेला आपलीगाडी उभी आहे तर जोपर्यंत आपण गाडीत आहात तोपर्यंत क्रेन आपली गाडी उचलू शकत नाही.

आपली गाडी चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या जागी पार्क केली असेल तरच आपली गाडी उचलता येते. वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल ट्राफिक पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले तर 24 तासाच्या आत दंडाधिकार्यापूढे हजर करणे आवश्यक आहे.

7.तुम्ही जर लाल लाईट असताना गाडी सिग्नलवरून नेली, नो पार्किंग मध्ये गाडी चालवली, सीट बेल्ट न लावता गाडी चालवली, वेगमर्यादा ओलांडली, गाडी चालवताना धूम्रपान केलं किंवा फोनवर बोललात, लायसन्स नसताना गाडी चालवणे, RTO रजिस्ट्रेशन नसताना गाडी चालवणे, वैध इन्शुरन्स किंवा पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट नसणे ह्या सर्व गोष्टी मात्र गुन्हा ठरू शकतात.

8.जर तुम्ही लायसन्स नसताना किंवा परवाना नसताना गाडी चालवत असाल तर ट्राफिक पोलीस तुमची गाडी ताब्यात घेऊ शकतात. गाडीचे रजिस्ट्रेशन नसताना गाडी चालवत असाल तरी देखील पोलीस तुमची गाडी ताब्यात घेऊ शकतात. 9.वैध पावतीशिवाय पोलीस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकत नाही.

जर तुम्ही लायसन्स नसताना गाडी चालवली, किंवा दारू पिऊन गाडी चालवली, किंवा मोबाईल वर बोललात मर्यादेपेक्षा जास्त वजन गाडीत वाहून नेले, तर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द ही केले जाऊ शकते. 10.जर तुमची गाडी पोलिसांनी एखाद्या गुन्ह्याखाली जप्त केली असेल तर पुढील 24 तासात तुम्हाला न्यायालयात चौकशी साठी हजर राहणे बंधनकारक आहे.

11.जर ट्राफिक पोलीस तुम्हाला त्रास देत असतील किंवा तुमचा छळ करत असतील त्याबद्दल तुम्ही संबंधित पोलीस ठाण्यात त्यांच्या गैरवर्तनाबद्दल लेखी तक्रार करू शकतात. आपण दंड भरला याचा अर्थ असा नाही तुम्ही त्यांच्या विरुध्द तक्रार करण्याचा हक्क गमावला आहे.

आपला दंड भरून आपणही पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करू शकता. 12.तसेही आपण ट्राफिक पोलिसांशी आदराने वागले पाहिजे नाहीतर ते कारवाईत आणखी एका अपराधाची नोंद करू शकतात. सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात,

वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “वाहतुकीचे असे नियम कि जे प्रत्येक वाहनचालक तसेच सामान्य लोकांना माहित असायलाच हवेत ।। हक्क, कायदे, आणि तरतुदी !!

Comments are closed.