कोणत्या कंपनीचा कोणता मेडिक्लेम प्लान विकत घ्यावा? योग्य निर्णय घेण्याकरता कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

आज बाजारामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्या मेडिक्लेम पॉलिसी देतात. जस की उदाहरण घ्यायचं झालं तर, एचडीएफसी, अर्गो, स्टार हेल्थ इन्शुरनस, टाटा एआयजी, केअर मेडिकल, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, आयसीआयसीआय, अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या कंपन्या मेडिक्लेम पॉलिसी लोकांना देतात.

आता ह्या सर्वांमधून आपण कोणती कंपनी निवडायची, कोणत्या कंपनीचा प्लान निवडायचा, तशी काही मोठी किंवा कठीण गोष्ट नाही. सर्व प्रथम तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागात कोणते हॉस्पिटल आहेत, त्या हॉस्पिटलची एक लिस्ट बनवा. आणि त्या हॉस्पिटल्स मध्ये कोणत्या कंपन्या कॅशलेस फॅसिलिटी देत आहेत, त्या कंपन्या तुम्ही मेडिक्लेम घेण्यासाठी निवडा.

ज्या कंपन्या तुमच्या विभागातील तुमच्या एरियातील जी जवळची हॉस्पिटल आहेत, जी मोठी हॉस्पिटल आहेत त्या मध्ये कॅशलेस फॅसिलिटी देत असतील तर त्याच कंपनीचा मेडिक्लेम तुम्ही निवडू शकता. आता एकदा का कंपनी निवडली की त्यानंतर आपल्याला बघावं लागत की कंपनीतल्या कोणता मेडिक्लेम प्लान आपल्याला निवडायचा आहे. कारण एक कंपनी अनेक प्रकारचे मेडिक्लेम प्लान (provide) करते, पुरवते.

मग त्यातला योग्य प्लान निवडणे हे देखील तितकच गरजेच आहे, जितकं गरजेच आहे योग्य कंपनी निवडणे. आता तुम्ही कंपनी निवडलीत की त्या कंपनीचे कोणकोणते प्लान बाजारामध्ये मिळत आहेत. किंवा ती कंपनी कोणकोणते मेडिकल प्लान देते याची तुम्हाला चौकशी करावी लागेल. त्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन इंटरनेट वर मिळू शकते.

मग त्या प्रत्येक प्लान मध्ये कोणता प्लान चांगला आहे, कोणता प्लान तुम्हाला कमीतकमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त सुविधा देते आहे हे तुम्हाला पहायचं आहे. प्लानची निवड करताना तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तुम्ही फक्त स्वतः साठी वैयक्तिक (individual) मेडिक्लेम घेवू शकता. किंवा तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी फॅमिली फॉटर प्लान घेवू शकता.

मग तुम्हाला आधी ठरवावं लागेल की तुम्हाला वैयक्तिक(individual) प्लान घायचा आहे की फॅमिली प्लान घ्यायचं आहे. पण अस सुचविण्यात येत की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या फॅमिली प्लान घ्यावा. जेणेकरून एकाच पॉलिसी मध्ये सर्व जन कव्हर होतील. तुम्ही ज्या प्लान विषयी माहिती घेतली आहे, त्या प्लानची तुलना करताना तुम्ही त्यातले मुद्दे पडताळून पाहिले पाहिजे.

काही बेसिक गोष्टी पहायच्या झाल्या तर आपण बघतो की त्या प्लान मध्ये आपल्याला किती रुपयांचा कव्हर मिळत आहे आणि त्यासाठी आपल्याला किती प्रीमियम आपल्याला भरावा लागत आहे. त्याचबरोबर तो प्लान आपल्याला actual रूम रेंट देतो आहे की त्याला काही कॅपिंग आहे.

तसेच त्या प्लान मध्ये आयसीओ फी एक्झॅक्टली पूर्ण मिळते आहे की त्याला देखील काही कॅपिंग आहे. त्या प्लान मध्ये आयुर्वेदिक बेनिफिट आहेत का, त्या प्लान मध्ये वेटीग पिरियड किती आहे, त्या प्लान मध्ये इनिशीयल वेटींग पिरियड किती आहे, तसेच एखादा पीइडी (pre existing disease) असेल तर त्यासाठी वेटींग पिरियड किती आहे,

आणि जनरल वेटींग पिरियड किती आहे. प्लान आपल्याला किती एनसीबी दरवर्षी देतो. त्या प्लान मध्ये आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट चे व्हाउचर दरवर्षी मिळत आहेत का नाही. हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पडताळून पहायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या शेवटच्या निष्कर्ष पर्यंत पोहचू शकता

की आपण निवडलेल्या कंपनीचा कोणता प्लान आता आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही ज्या विभागात राहता तिथे कोणते मेडिकल कंपनी आहेत, आणि तेथील हॉस्पिटल मध्ये कोणकोणते मेडिक्लेम कंपनीची सुविधा आहेत हे सर्व पडताळून पाहणे आवश्यक आहे. हे सर्व पाहून तुम्ही मेडिकल प्लान घेवू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.