ATM द्वारे स्वतःची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा लेख नक्की वाचा आणि इतरांना देखील माहिती पोहचवा ।। तुमचेही होऊ शकते लाखोंचे नुकसान !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

तुम्ही देखील ATM कार्ड वापरात असणारच, तर या ATM द्वारे आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे नक्की जाणून घ्या आणि आपल्या सर्व जवळच्या व्यक्तींना देखील हा लेख पाठवून सतर्क करा ! एटीएम कार्ड मुळे कधीही आणि कुठेही पैसे काढणे तसेच वेग वेगळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन करणे सहज शक्य होते.

परंतु याच एटीएम कार्डची माहिती चोरून, आपले बँक खाते रिकामे केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले एटीएम कार्डचा वापर सुरक्षितपणे करणे अत्यावश्यक आहे. सुरक्षित एटीएम कार्ड कसे वापरायचे? याविषयीचे पंधरा टिप्स आज आपण बघणार आहोत.

चला तर मग बघुयात सुरक्षित एटीएम कार्ड वापराविषयी टीप नंबर एक, ए टी एम मध्ये आपण ज्या ठिकाणी एटीएम कार्ड, मशीन मध्ये टाकतो. त्या ठिकाणी कार्ड क्लोनिंगचा एखादा डिवाइस लावलेला असू शकतो, यामध्ये तुमच्या एटीएम ची सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते. त्यामुळे जिथे आपण कार्ड इन्सर्ट करतो अशा ठिकाणी अशा प्रकारचा डिवाइस लावलेला नाही ना? याची खात्री करून नंतरच आपली एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकावे.

टीप नंबर दोन, एटीएम चा पिन टाकण्यासाठी असलेल्या कीबोर्डच्या वर एक छोटासा कॅमेरा लावलेला असू शकतो. या कॅमेऱ्यामध्ये तुमचा पिन नंबर रेकॉर्ड केला जातो. परंतु आपण जर पिन टाकताना कि बोर्ड ला हाताने झाकून पिन कोड टाकल्यास, आपला पिन सुरक्षित राहण्यास मदत होते.

टिप नंबर तीन. ज्या ठिकाणी पैसे बाहेर येतात, त्या ठिकाणी चोर एखादा ट्रे लावून ठेवतात. व आपले पैसे या ट्रे मध्ये जाऊन पडतात. पैसे बाहेर आले नाही असे वाटून आपण एटीएम च्या बाहेर निघून गेल्यावर, हे चोरटे ते पैसे काढून घेतात. तर अशा वेळी आपण पैसे कट झाले असल्यास मशीन न सोडता तेथे काही ट्रे वैगेरे लावलेला आहेका हे बघावे आणि आपल्या बँकेला अशा व्यवहाराची लगेच माहिती कळवावी.

टीप नंबर चार. एटीएमच्या रांगेत हातात एटीएम घेऊन उभे राहू नका. चोरटे एटीएम ची माहिती पाहत असतात. आपला नंबर आल्यावरच एटीएम कार्ड खिशातून बाहेर काढा. कारण अशा माहितीचा वापर करून चोरटे ATM चा गैरवापर करू शकतात.

टीप नंबर पाच. शक्यतो सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असलेल्या एटीएम मधूनच पैसे काढा.कारण सुरक्षारक्षक असलेल्या ठिकाणी चोरटे ट्रे लावणे, क्लोनिंग मशीन लावणे किंवा अन्य गैरप्रकार करण्याचा धोका हा कमी असतो. आणि आपणही अशा ठिकाणी काही चुकीचे घडल्यास सुरक्षारक्षकांची मदत घेऊ शकतो.

टीप नंबर सहा. ऑनलाइन व्यवहार करताना थेट एटीएमची माहिती भरून व्यवहार करण्याऐवजी, किंवा एटीएम स्वाईप करण्याऐवजी, पेटीएम, गुगल पे, फोन पे, या सारख्या पेमेंट ॲप्स चा वापर करावा. कारण अशावेळी तुमचे कार्ड डिटेल्स सेव्ह होण्याची शक्यता नसते आणि पुढील व्यवहाराला तुम्ही तुमचा दुसरा UPI id बनवून देखील व्यवहार करू शकतात.

टीप नंबर सात. एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला त्या व्यवहाराची पावती हवी का? असा ऑप्शन असतो. त्यावेळी पावती हवी हाच ऑप्शन निवडावा. कारण आपल्याला पैसे मिळाले नाही. तर तक्रार करण्यासाठी हीच पावती कामी येते. आणि पुढील कोणत्याही तक्रारीसाठी या पावतीचा उपयोग आपल्या सुरक्षित व्यवहारासाठी होऊ शकतो.

टीप नंबर आट. काही कारणास्तव आपल्याला पैसे कट झाल्याचा मेसेज आला. परंतु पैसे मिळाले नाही. तर त्या व्यवहाराची पावती तशीच एटीएम आयडी, व्यवहार केल्याची वेळ लिहून ठेवा. आणि आलेला मेसेज स्वतः जपून ठेवा आणि आपल्या बँकेला अशा व्यवहाराची माहिती शक्य तितक्या लवकर कळवा जेणेकरून पुढील संभाव्य वाढीव धोक्यापासून आपण वाचू शकतो.

टीप नंबर नऊ. आपल्या एटीएम च्या पाठीमागे असलेला सी.व्ही.व्ही नंबर ऑनलाइन व्यवहारासाठी फार महत्त्वाचा असतो. तो सहजासहजी कोणाला दिसु नये, म्हणुन तो अशाप्रकारे पुसून टाकू शकता. किंवा अशा प्रकारे जपून ठेवा कि तो तुम्ही सोडून अन्य व्यक्तीला दिसता काम नये. हा नंबर त्या ठिकाणी उमटलेला असतो. तो आपल्याला हवा तेव्हा पाहता येतो.

टीप नंबर दहा. आपण प्रवासात असाल, तर अनोळखी, कमी गर्दी असलेल्या हॉटेल. किंवा दुकानात आपले एटीएम कार्ड स्वॅप करू नका. तिथे एटीएमची माहिती चोरली जाण्याची शक्यता असते. अलीकडच्याच काळात असे अनेक हॉटेल्स समोर आले आहेत कि ज्यात ग्राहकांचे कार्ड डिटेल्स सेवा करून कार्ड क्लोन करून कार्ड्स चा गैरवापर झाला आहे. आजच्या अत्याधुनिक जगात कार्ड क्लोन करणे म्हणावे तितके अवघड राहिलेले नाही त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

टीप नंबर अकरा. कधी कधी फोनवर बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून, एटीएमची माहिती विचारली जाते. जसे कि तुमचा कार्ड क्रमांक, सी व्ही व्ही क्रमांक, पिन क्रमांक इ. बँकेकडून कधीच फोनवर याची माहिती विचारली जात नाही. तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि त्यासाठी तुमचे कार्ड डिटेल्स मागितले जातात तर अशा प्रलोभनांना बळी न पडता आपली माहिती गोपनीय ठेवा.

टीप नंबर बारा. तुमच्या एटीएम वर असलेले टोल फ्री नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. तुमचे एटीएम कार्ड हरवले किंवा तुमच्या परस्पर ATM मधून पैसे काढण्याचा मेसेज तुम्हाला आला. तर या नंबर वर कॉल करून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करता येईल. काही वेळा असे क्रमांक लवकर न सापडल्यामुळे देखील आपला मोठा तोटा होऊ शकतो.

टीप नंबर तेरा. तुम्ही एटीएम चा पिन नंबर अजून पर्यंत बदललेला नसेल, तर कमीत कमी सहा महिन्यातून एकदा तरी एटीएम चा पिन नंबर बदलणे गरजेचे आहे. हा पीन नंबर आपण एटीएममध्ये जाऊन सहज बदलू शकतो. कारण आपण तोच पिन जास्त दिवस वापरला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.

टीप नंबर चौदा. तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असताना, एटीएमची माहिती भरून पेमेंट करणार असाल, तर आपल्या संगणकावर चांगल्या प्रतीचे अँटीव्हायरस असनं फार गरजेचा आहे. तसेच शक्य असल्यास डिजिटल कि बोर्ड चा वापर आपले पिन आणि इतर डिटेल्स टाकताना करावा जेणेकरून कि लॉगर सारख्या सॉफ्टवेअर्स मध्ये आपली माहिती चोरली जाऊ नये.

टीप नंबर पंधरा. आपली एटीएम कार्ड ज्या बँकेचे आहे, शक्यतो त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढा. म्हणजे काही अडचण आल्यास आपल्याला तक्रार करणे सोपे होते. यात तक्रार निवारणासाठी कालावधी देखील कमी लागतो आणि बँकेला दुसऱ्या बँकेवर अवलंबून राहावे लागत नसल्यामुळे आपला प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होऊ शकतो.

तर वरील लेखात आपण ए टी एम वापरताना कुठल्या १५ गोष्टींची काळजी घ्यावी ह्याबद्दल माहिती घेतली. वरील यादी सोडून तुम्हाला देखील अन्य काही मुद्दा माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण एकमेकांना साथ देऊन आर्थिक साक्षर आणि सुरक्षित वाढविण्यास हातभार लावू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.