शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची? ।। त्यात काय धोके असतात? ।। सेंसेक्स किंवा निफ्टी म्हणजे काय? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची? त्यात काय धोके असतात? ऑक्टोबर महिन्यात सेंसेक्स 62245 चे आजवरची सर्वोच्च पातळी गाठली होती. शेअर बाजारामध्ये असणारी तेजी किंवा घसरण याबद्दल चर्चा कायम सुरू असते. लक्ष्मीपूजनाला होणाऱ्या मुहुरत ट्रेडिंगची चर्चा सुद्धा सुरू असते. सेंसेक्स किंवा निफ्टी म्हणजे काय?

शेअर बाजार म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करतात? ती सुरक्षितता असते का? आणि त्यात जोखीम काय असते? याबद्दल जाणून घेऊया आजच्या लेखात. मुंबईतल्या एका वडाच्या झाडाखाली एकत्र येत व्यापाऱ्यांनी व्यापार करायला सुरुवात केली आणि इथेच शेअरबाजाराचा जन्म झाला. भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन बाजारांमध्ये मुख्य ट्रेडिंग होत

आणि या दोन बाजारा शिवाय भारतात चालू स्थिती चालू स्थितीतली आणखीन 17 शेअर बाजार आहेत. मुंबई शेअर बाजारा शेअर बाजारातला मुख्य निर्देशांक म्हणजे Sensex आणि राष्ट्रीय शेअर बाजारातला मुख्य निर्देशांक म्हणजे Nifty 50.

शेअर खरेदी विक्रीची वेळ : शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार 9:15AM ते 3:30PM सुरू असतो आणि या कालावधीतच शेअर्सची खरेदी-विक्री म्हणजे ट्रेडिंग होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे काही कंपन्यांचे शेअर्स विकत घेणे या शेअर्सचे भाव वाढले आणि तुम्ही तुमच्याकडे शेअर्स विकले तर तुम्हाला त्याचा फायदा होतो.

पण शेअरच्या किमती कमी होऊन तुम्हाला तोटाही होऊ शकतो. आता हे शेअर्स तुम्हाला घेण्यासाठी काय करावे लागेल. तुमच्याकडे एक डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि एक बँक खाते असावे लागेल. डीमॅट म्हणजे डी मटेरियल राईज. तिथे या खात्यामध्ये तुमच्या नावावर डिजिटल रुपातले शेअर्स नोंदवले जातात तर शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी एक ट्रेडिंग अकाउंट लागेल आणि पैशांच्या व्यवहारासाठी त्याला जोडलेला एक बँक खाते आवश्यक असेल.

आता तुम्ही शेअर्सची खरेदी-विक्री कशी करता याचेही काही प्रकार आहेत ते जाणून घेऊया : इंट्राडे ट्रेडिंग यामध्ये ट्रेडिंग म्हणजे शेअर्स विकत घ्यायचे आणि भाव वाढले तर अगदी त्याच दिवशी किंवा मग थोड्या काळानंतर विकून टाकायचे आणि नफा हातात घ्यायचा. तर दुसरा प्रकार म्हणजे गुंतवणुक long-term असेल या तुम्ही शेअर घेतात पण विकायची घाई नसते वर्ष किंवा काही वर्ष तुमच्या जवळ ठेवायचे तुमची तयारी असते.

मग कोणत्या कंपनीचे शेअर घ्यायचे तर यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्या? शेअर्स विकत घेताना? कंपनीची आतापर्यंतची कामगिरी पहा. सेबी ने दिलेले रेटिंग, तज्ञांची टेक्निकल आणि फंडामेंटल चार्टच्या आधारे केलेले विश्लेषण वाचा, याचा अभ्यास करा. कंपनीचे याआधीच्या वर्षाचे ताळेबंद, अहवाल, कंपनीचे उत्पादन आणि त्याला असणारी मागणी तपासून पहा.

तुम्हाला किती कालावधीसाठी शेअर द्यायचे आहेत, याचा विचार करा. ही कंपनी गेल्या काही काळात बातम्यांमध्ये होती का? कोणत्या करण्यासाठी ते तपासा. एकाच क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करू नका, त्या क्षेत्रात मोठी घडामोड झाल्यास सगळ्याच कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही सगळीच गुंतवणूक शेअर बाजारात करू नका. टिप्सवर फार विश्वास ठेवू नका. तज्ञांची वा ब्रोकर्सची मदत घ्या.

शेअर्स खरेदीची आणखीन एक उत्तम संधी इनिशियल पब्लिक ऑफरिंग किंवा IPO : एखाद्या कंपनीची शेअर बाजारात पहिल्यांदा नोंदणी होते तेव्हा IPO काढला जातो आणि तुम्ही बोली लावून हा शेअर खरेदी करण्याची इच्छा दर्शवू शकतात? आणि IPOमध्ये गुंतवणूक करून अनेकदा गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला आहे.

आणि अर्थात IPOची नीट माहिती करून घेतल्याशिवाय असा निर्णय घेऊन नका? तुम्ही केलेली गुंतवणूक किती काळासाठी होती म्हणजे एक वर्ष कमी कालावधी असेल तर शॉर्ट टम इन्वेस्टमेंट की त्यापेक्षा जास्त काळाची म्हणजे लॉंग टम इन्वेस्टमेंट होती यावरून तुमच्या शेअर बाजारातून मिळालेली उत्पन्नावर कर आकारला जातो.

शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आहे का? : प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीत काही प्रमाणात जोखीम असते आणि तसेच शेअर बाजारातल्या गुंतवणूक मध्येही आहेत. शेअर बाजारातल्या सगळ्या कंपन्यांवर सेबीची नजर असते आणि एका दिवसात एखादा शेअर 5% टक्क्यांनी वर किंवा खाली गेला तर त्या शेअरची खरेदी विक्री तात्काळ थांबविण्यात येते त्याला सर्किट असे म्हणतात. सगळे व्यवहार तपासल्यावरच पुन्हा व्यवहार सुरू करण्यात येते. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत हाच यामागचा हेतू आहे.

जोखीम काय असते ? : जोखीम अशी असते की कुठल्या समभागांमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा नंतर भविष्यामध्ये तो शेअर वर जाईल का खाली जाईल याची माहिती कोणालाच नसते. पण तो शेअर्स एकदम खाली जायला लागला आणि मग नंतर आपली गुंतवणूक कमी कमी व्हायला लागली तर शेअर बाजारांमधून घाबरून बाहेर पडतात .

त्यापेक्षा आपण आपल्या गुंतवणुकीला एक स्टॉप लॉस लावा म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक असो अथवा अल्पकालीन असो स्टॉप लॉस हा प्रत्येक गुंतवणुकीला असलाच पाहिजे कारण स्टॉप लॉस असेल तर निश्चितपणे तुमचा थोडासा तरी नुकसान झालं तर उरलेल्या भांडवला तून तुम्ही पुन्हा नव्याने शेअर बाजारात गुंतवणूक करून तुमचं गेलेल्या किंवा झालेले नुकसान भरून काढू शकता.

साडेपाच सहा हजार शेअर्स हे मार्केटमध्ये आहेत तेवढे आपल्याला अभ्यास करणे शक्य नाही पण जे सेंसेक्स किंवा निफ्टी हे आपले काही निर्देशांक आहे या निर्देशांकाच्या स्टॉक मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर निश्चितपणे तुम्हाला मिळणारा परतावा हा त्या निर्देशांकावरती त्याच्या चालीप्रमाणे निश्चित केला जातो. निर्देशांका वर गेला तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो आणि जर खाली आला तर नुकसान जरी झाला तरी ते परत काही कालावधी मध्ये भरून निघू शकतो. त्यामुळे इंडेक्स स्टॉक मध्ये गुंतवणूक करा आणि नेहमीच टॉप लॉस लावा.

याशिवाय सेबी गुंतवणूकदारांच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करत असते एखाद्या व्यवहाराविषयी तुमची गुंतवणूक म्हणून काही तक्रार असेल तर त्याची दाद तुम्हाला सेबीकडे मागता येते तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.