मार्केट डाऊन ट्रेन्डमध्ये असताना गुंतवणूक कशी करायची? कशाप्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवायचा? जर अगोदरच आपल्या पोर्टफोलिओ मध्ये काही स्टॉक असतील तर त्यांना सेल करायचं का? ते कधी करायचे? करायचे नसतील तर कशा प्रकारे आपण त्यांना होल्ड करू शकतो. एवरेजींग करू शकतो का? कुठले स्टॉक निवडायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

सर्वात पहिला पॉईंट. तुमच्याकडे जे काही स्टॉक आहेत, त्याचे कॉलिटी चेक करा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण मार्केट क्रॅश होणार म्हणून पोर्टफोलिओ सेल करणार का? जे काही होल्डिंग असेल, ते सगळे झिरो करून टाकणार का? याचे उत्तर ठरेल, तुम्ही कोणते स्टॉक बाय केले व कधी केले. यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असते. समजा मार्च २०२० मध्ये काही स्टॉक लॉंग साठी तुम्ही बाय केले असतील याचा टाईम साठी बाय केले असेल,

ज्याचं टाईम हॉराईझन असेल पाच वर्ष किंवा दहा वर्ष किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त. आज तो स्टॉक तुम्हाला दोनशे-तीनशे किंवा चारशे टक्के रिटन देतोय. बिझनेस मॉडेल त्याचा खूप चांगला असेल. तर असा कॉलिटी स्टॉक सेल करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही. पण जर तो स्टॉक चांगल्या क्वालिटीचे नसेल, तर क्वालिटी मध्ये बरेच पॅरामीटर्स आपल्याला बघावे लागतील. त्या मधील सर्वात महत्त्वाचा महत्वाचा पॅरामिटर ज्या वर आपला फोकस असला पाहिजे. तो म्हणजे त्या कंपनीचा असलेला बिझनेस मॉडेल.

ते बिझनेस मॉडेल भविष्यात ग्रुम होईल का? त्या बिजनेस ला खूप चांगली पुढेही डिमांड असेल का? सोबतच त्याची ईंट्रेंसीक व्हॅल्यू कुठली असेल? हे आपल्याला पाहावं लागेल. आता पुन्हा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की ईंट्रेंसीक व्हॅल्यू म्हणजे काय? ईंट्रेंसीक व्हॅल्यू ला कसं बाय करायचं? सोप्या भाषेत ईंट्रेंसीक व्हॅल्यू म्हणजे योग्य किंमत. आता ही योग्य किंमत आपण कशी ठरवायची? याचा थोडासा कॅल्क्युलेशन करावा लागतो.

जर तुम्ही लो क्वॉलिटी स्टॅक बाय केला असेल. आणि हाय प्राईज ला बाय केले असेल तर त्या मधून एक्झिट घेणे कधीही तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण मार्केट जर डाऊन ट्रेन्डमध्ये असेल. किंवा जर तो स्टॉक डाऊन ट्रेन्डमध्ये जात असेल. आणि त्याची कॉलिटी सुद्धा चांगली नसेल. तर मात्र त्यातून बाहेर पडणं हे तुमच्या फायद्याचे ठरेल. कदाचित बरेच लोक पेनिस्टॉक मध्ये इंन्वेस्ट करतात. दहा हजार गुंतवा एक कोटी याचे बणतील.

अशा अनेक अफवा तुम्ही पाहिल्या असतील. आणि ते पाहूनच तुम्ही त्याच्या मध्ये गुंतवणूक करता. आज दहा रुपयाचा स्टॉक आहे. उद्या हा दहा हजाराचा बनेल. वर्षांनी, दोन वर्षांनी, पाच वर्षांनी हा मल्टिवैगर बनेल. हे पाहून तुम्ही त्याच्यामध्ये इन्वेस्ट करताना, तुम्ही पाहिलेलं असतं कॉलिटी, न पाहिलेली असते त्या कंपनीचे ईंट्रेंसीक व्हॅल्यू.

कोणताही विचार न करता सिम्प्ली न्युज बघता. कुठे ही लिहिलेलं आर्टिकल वाचता. किंवा कोणीतरी सांगतो म्हणून तुम्ही त्याच्या मध्ये गुंतवणूक करता. आणि तिकडेच तुमची फसवणूक होते. म्हणून क्वॉलिटी स्टॉक निवडणं खूप गरजेचा आहे. आणि तो निवडलेला स्टॉक होल्ड करणे त्याहूनही महत्त्वाचं.

दुसरा पॉईंट आहे लोकलिटी स्टॉक मध्ये अवरेजींग करत बसने. आपला पोर्टफोलिओ मध्ये काही खराब कॉलिटी स्टॉक असतील. व ते डाउन ट्रेन्ड मुळे खूपच खाली जाताना आपल्याला दिसत असणार. त्यामुळे आपण काय करतो? अवरेजींग करायला सुरुवात करतो. समजा एखाद्या स्टॉक ची प्राईज शंभर रुपये आहे.

तो घसरतो आणि त्याची प्राईज अंशी रुपये झाली. अंशी रुपयाला आपण अजून काही कॉन्टिटी बाय करतो. परत तो सत्तर रुपये वर येतो. परत आपण अजून कॉन्टिटी बाय करतो. आपण त्याचा एवरेजींग करत बसतो. ना त्याची आपण ईंन्ट्रेंसीक व्हॅल्यू पाहिलेली असते, ना त्या कंपनीचे फ्युचर आपल्याला दिसत असत. विनाकारण आपण बाय केले म्हणून त्याला एवरेजींग करत बसायचे. एवरेजींग केल्यामुळे थोडीशी प्राईस वाढेल आणि आपण त्यातून बाहेर पडू.

लॉस मध्ये बाहेर पडायचं नाही. हाच एक उद्देश असतो. पण तोच आपल्याला मोठ्या लॉस मध्ये घेऊन जातो. आता अवरेजींग करणं किंवा लोकलिटी स्टॉक हे फक्त छोट्याच कंपन्या असतात असं नाही. म्हणजेच पेनी स्टॉक असतील असे ही नाही. ही गोष्ट मोठ्या कंपन्यांसोबत सुद्धा घडू शकते. आता मोठ्या कंपन्या लार्ज स्टॉक कंपनी, लो क्वालिटी कंपनीज् आपण म्हणू शकत नाही. पण त्यांचे जे प्रोडक्ट आहे. सध्याची त्यांची सिच्युएशन आहे.

किंवा मार्केटला टॅकल करण्याची त्यांची जी आत्ताची पद्धत आहे, ती योग्य नाही. त्यामुळे त्याची प्राईज खूप चांगली वाढत नाही. आता आपण काही स्टॉक चांगले परफोर्म करणारे पण पाहणार आहोत. आणि काही स्टॉक कन्सोलेडेट होणारे किंवा मागच्या वर्षीपेक्षा ही आत्ता सध्या एवढे मार्केट वर असून सुद्धा, कमी रिटन देणारे स्टॅक पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला समजेल ऍक्च्युली तुम्हाला कुठल्या स्टॉक मध्ये इन्वेस्ट करायला हवं.

सर्वात पहिला एक उदाहरण आपण पाहतो विप्रो चे. २६० रुपये अवरेज प्राईज होती. मागच्या वर्षी २०२० जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत. पण मार्चमध्ये कोरोनाची सिच्युएशन सुरू झाली. आणि मार्केट डाऊन झालं. १६० रुपयाचा लो त्याने घातला होता. म्हणजेच ३९% मार्केट करेक्ट झालं होतं. स्टॉक ची प्राईज घसरले होते. २६० रुपये ला तुम्ही गुंतवणूक केली असेल तर डायरेक्ट त्या स्टॉक ची प्राइज १६० रुपये झाली होती.

पण जुलै महिन्यापर्यंत त्याने रीकवर करायला सुरुवात केली. आणि २६० रुपये च्या लेवल पर्यंत येऊन पोहोचला. जवळपास पाच सहा महिन्यातच त्याने ओल्ड पोझिशन गेन केली. पण तिथून या स्टॅक ची प्राईज पुन्हा वाढायला लागली. आणि तो पोहोचला ४७७ रुपये. जर तुम्ही १६० रुपये ला त्यामध्ये गुंतवणूक केलेली असते. तर तुम्हाला आज त्याचे ४७७ रुपये मिळाले असते. किंवा २९८% राईस पाहायला मिळाला असता.

आपण दोन टक्के, चार टक्के, दहा टक्क्यांची अपेक्षा ठेवतो. पण इकडे बघू शकता २९८ टक्केपर्यंत तुमची कमाई होऊ शकली असती. जर तुम्ही मार्चमध्ये त्याच्यामध्ये इन्वेस्टमेंट केली असती तर. आता एक स्टॉक आहे त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली लोकं ट्रेंड करतात. इन्वेस्ट करतात. त्याचे नाव आहे रिलायन्स. रिलायन्स जानेवारीमध्ये प्राइस होती सोळाशे दहा रुपये. आणि मार्चमध्ये त्याची प्राईज ड्रॉप होऊन ८७५ पर्यंत पोहोचली. म्हणजे ४६% हा स्टॉक ड्रॉप झाला होता. ४६ टक्के ला जर परत याच्यामध्ये इन्वेस्टमेंट कोणी केली असती.

म्हणजेच ८७५, ८८०, ९०० रुपये च्या लेवल ला जर कोणी इन्वेस्टमेंट केले असते, तर आज त्याला दोनशे सत्तर टक्के रीटर्न मिळाले असते. कारण हा स्टॉक २३६० रुपये ला जाऊन, पुन्हा खाली आला आहे. ईन ऍन एव्हरेज आपण दोनशे टक्के तरी याच्यातून मिळवू शकलो असतो. खूप चांगले रिटर्न त्याला मानले जातात. जर तुम्ही या स्टॅक मध्ये सोळाशे च्या लेवल पासून एन्ट्री केली असती. मार्च च्या आधीच तरीसुद्धा आज तुम्हाला इन ऍन एवरेज पन्नास ते शंभर टक्के रीटर्न पाहायला मिळाले असते.

म्हणून कॉलिटी स्टॅक निवडनं आणि ज्या स्टॉक मध्ये फ्युचर चांगला आहे असा स्टॉक निवडणं गरजेचं असतं. त्याच्या पुढचा स्टॉक आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. जानेवारी २०२० मध्ये किंवा फेब्रुवारी, मार्च च्या अगोदर जर तुम्ही बघितलं. तर समजेल दोनशे रुपयाची प्राईज होती. आणि ती प्राईज ड्रॉप होऊन डायरेक्ट सिक्सटी फाईव्ह, पासष्ट वर पोहोचली. ६७.५ टक्के नी याच्या मध्ये ड्रॉप झाला. जवळपास ७० टक्के हा स्टॉक खाली पडला होता. पण तिथून पुढे याची खूप चांगली ग्रोथ झाली.

आणि हा स्टॉक आता साडे तीनशे पर्यंत पोहोचला. म्हणजेच ५३८ टक्के रिटन याच्यातून पाहायला मिळाले. आता याच्या पुढे एक इंटरेस्टिंग उदाहरण तुम्हाला देतो. त्याचं नाव आहे एल अँड टी. एल अँड टी तर प्रत्येकाला माहिती आहे. आणि याच्या मध्ये खूप सार्‍या लोकांचे इन्व्हेस्टमेंट आहे. खूप चांगला आणि कॉलिटी स्टॉक हा मानला जातो. आणि मी सुद्धा माणतो. पण याच्यामधे काय झालं? कोरोनाच्या आधीची सिच्युएशन काय होती? नोव्हेंबर ऑगस्ट २०१९ मध्ये हा सोळाशे रुपये पर्यंत स्टॉक होता. तिथून याची घसरण सुरू झाली. मार्च मध्ये ६७० रुपये पर्यंत येऊन घसरला.

५८ टक्क्यांनी हा ड्रॉप झाला होता. पण तिथून मात्र हा डायरेक्ट पंधराशे नव्वद रुपये ला पोहोचला. २३७ टक्के रीटर्न याच्यातून तुम्हाला मिळू शकले असते. पण अजून थोडसं लॉजिक जर तुम्ही वापरला तर तुम्हाला समजेल. सोळाशे रुपयाला ज्यांनी हा बाय केला असेल कोरणा च्या आधी, त्यांचे काय? आज ही स्टॉक त्याच लेव्हलला आहे. किंवा त्यापेक्षाही कमी लेव्हलला आहे. म्हणजेच सोळाशे रुपयापेक्षा आपली व्हॅल्यू आज मायनस मध्ये दिसते. जेकी अराऊंड दोन वर्षे याला कालावधी होत आला.

दोन वर्षांनी सुद्धा जर आपल्याला पॉझिटिव रिटन्स मिळत नसतील, तर आपण त्याच्यामध्ये इन्वेस्ट करून काय फायदा? म्हणजेच सोळाशे रुपये ला ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले त्या सोळाशे रुपयाच्या लेव्हल ला आपण इंट्रेंसीक व्हॅल्यू ला धरून ती लेवल आहे. असे आपण म्हणू शकत नाही. नक्कीच तो इंट्रेंसीक लेवल पेक्षा खूप जास्त प्राईस ला हा स्टॉक ट्रेड करत होता. मूव्ह करत होता. म्हणून त्या लेवल ला बाय करणं तोट्याचे ठरू शकला असतं.

तिसरा पॉईंट आहे. इन्वेस्ट ऑन एव्हरी डीप: एखादा स्टॉक निवडल्यानंतर त्याची इंट्रेंसीक व्हॅल्यू काढली. समजा त्याची प्राईज इंट्रेंसीक लेवल ला आल्यानंतर, आपण सगळे गुंतवणूक त्याच्यामध्ये केले. हे बरोबर आहे का? हंड्रेड पर्सेंट नाही. स्टॉक जसं जसा खाली येईल तशी आपल्याला गुंतवणूक करायला हवी. एक्झाम्पल एक्स वाय झेड स्टॉक ची किंमत आहे आठशे रुपये. यामध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीला ३० टक्के करा.

परत तो स्टॉक मोमेंट करेल. कदाचित तो आठशे वीस रुपये पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि पुन्हा तो वरून खाली येईल. आणि ७८० रुपया वर येईल. तेव्हा तुम्ही परत ३१% इन्वेस्ट करू शकता. अशा प्रकारे चार ते पाच टप्प्यांमध्ये त्याच्यामुळे गुंतवणूक करायला हवी. आता तुम्ही म्हणाल योग्य डीप कशी ओळखायची? त्यासाठी खूप मोठं रॉकेट सायन्स बिलकुल नाहीए. स्टॉक मार्केट चा एखाद्या स्टॉक चा एक्झॅक्ट किंवा बॉटम कोणी सांगू शकत नाही.

म्हणून आपण प्रत्येक डीप ला ईनवेस्ट करणार आहोत. इन्वेस्टमेंट कुठे करायची? हे ठरवण्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स चा आपण वापर करू शकतो. सपोर्ट लेबल कुठली आहे? रेजिस्टन्स लेव्हल कुठली आहे? थोडं समजून घेऊन त्याच्या मध्ये गुंतवणूक करायला हवं. प्रत्येक ड्रॉप ला आपण थोडी थोडी गुंतवणूक करू शकतो. आता हे आपण थोडंसं प्रॅक्टिकली चार्ट वर पाहणार आहोत. ज्याच्यामधून तुम्हाला समजेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा बघायचा असतो?

आता आपण टाटा मोटर्स च एक्झाम्पल बघतोय. आता याच्या मध्ये बघितलं तर एक कंटीन्यूअस डाऊन येताना दिसतोय. आणि सलग हा स्टॉक खाली येतोय. आणि एका ठराविक लेवल नंतर तो कंसोलिडेट होतोय. किंवा त्या रेंज मध्ये मुमेंट करतोय. ही रेंज किती रुपयाची आहे? ६४ रुपयापासून अष्टाहत्तर ८० रुपयांपर्यंत. आता ही रेंज तर आपल्याला कळाली. पण याच्यामध्ये आपल्याला काय करावे लागेल.

सिंपली एक तासाची टाईम फ्रेम युज करावे लागेल. हा टोटल मुमेंट जर तुम्ही बघितला, तो मोमेंट जसं मी बोललो होतो तुम्हाला. लो लेवल पासून हाय लेव्हलपर्यंत ६४ रुपयापासून अष्टयात्तर, एकोण अंशी, ८० रुपयापर्यंत. ही टोटल मुमेंट वीस तारखेपासून पुढच्या महिन्याच्या २८, २९ तारखेपर्यंत, म्हणजे एक महिन्या पेक्षा जास्त मार्केट याच रेंजमध्ये मुमेंट करत होते. यावरून समजतं की इथून मार्केट पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे.

ऑलरेडी हा स्टॉक खूप ड्रॉप झालेला आहे. आता मार्च मधून हा स्टॉक कंटिन्यू ड्रॉप होत होता. आणि २४ तारखेला, २४ मार्चला, २३ मार्चला हा एक लो लेवल बनवतो. आणि ही लेवल आहे ६४ रुपयांची. या लेवल ला आपण एक बाईंग करू शकतो. पुन्हा स्टॉक वरच्या दिशेने जाताना दिसला. ७६ रुपयांपर्यंत पोचला. पुन्हा तो तिथून खाली येऊन एका लेव्हल ला स्टॉप घेतो. पुन्हा ६४ च्या लेवल ला आला. आणि या लेवल ला पुन्हा एक आपण बाईंग करू शकतो. अशा प्रकारे ज्या ज्या वेळी लो मोमेंट होईल त्या त्या वेळी आपण बाय करू शकतो.

मग हा स्टॅक वर गेला. ८१ रुपयाला. ८१ रुपये वरून पुन्हा खाली आला. ७२ रुपये च्या लेवल ला. ७२ रुपये च्या लेवल ला आपण बाय करू शकतो. ६४ पासून ७२ पर्यंत कंटीन्यूअसली आपण बाईंगची पोझिशन बनवत जाऊ शकतो. अवरेजींग करू शकतो. गोष्ट लक्षात घ्या ६४ रुपयापासून ७२ किंवा ७४ रुपया पर्यंत आपण बाईंग केलं. तर या दहा रुपयाच्या गॅप मध्ये आपण फ्रिक्वेंटली बाय करतोय. आणि याचं एवरेज एक येऊ शकतं सत्तर रुपयाचा. समजा तुम्ही सत्तर रुपयाला बाय केला आणि ३२० रुपये ला सेल केला. भले ही तुम्ही सेल आता लगेच करणार नाही.

याला होल्ड करणार आहात. तो पुढचा भाग आहे. पण अराऊंड सत्तर रुपयाचा स्टॉक ३०० रुपये पर्यंत पोहोचला. मी नो डाउट तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही ६४ रुपये ला बाय करायला हवं. किंवा ६५ रुपये ला करावं. हे इम्पॉसिबल आहे. कदाचित लक बाय चान्स या गोष्टी होऊ शकतात. पण परफेक्टली प्रत्येक वेळी तसंच होईल असं नसतं. म्हणून आपण मॅक्सीमम एवरेजींग करतो. सत्तर रुपये च्या जागी ७५, ८० रुपयाला तुमचं एवरेजींग होईल. काही फरक पडत नाही. ती सुद्धा बेस्ट प्राईज आहे. पण आज या स्टॉक ची प्राइज तुम्ही बघू शकता. एवढ्या चांगल्या लेवलचा प्रॉफिट आपण मिळवू शकतो.

चौथा आणि शेवटचा पॉईंट याच्यामधे एक आहे. आपल्याकडे कॅश अवेलेबल असायला हवी. तेही नेहमी असं मार्केट जेव्हा क्रॅश होतं त्यावेळीच आपल्याकडे कॅश नसते. मॅक्सीमम काय होतं? मार्केट जेव्हा अप ट्रेन्डमध्ये जातं तेव्हा प्रत्येक ठिकाणी पहायला मिळतंय. याने एवढे कमवले. त्याने तेवढे कमावले. त्याचा पोर्टफोलिओ डबल झाला. ट्रिपल झाला. फोर टाईम झाला. टेन टाईम झाला. पण मार्केट त्यावेळी पीक वर असतं. आणि तेव्हा आपल्याला जाग येते. आपण इंन्वेस्ट करायला सुरुवात करतो. जेव्हा सेन्सेक्स ५० हजारांवर पोचला.

५१ हजारावर पोहोचला. सगळीकडे न्यूज होती. सेलिब्रेशन सुरू होतं. त्यावेळी आपल्याला कळाले की मार्केट मधून खूप जास्त रिटर्न मिळतात. आणि आपण इंन्वेस्ट करायला सुरुवात केली. पण खरी गुंतवणूक आपण करायला हवी होती को’रो’नोच्या काळामध्ये. पण आत्ता सुद्धा ती संधी आहे. कदाचित केस वाढत आहे. मार्केट अजून क्रॅश होऊ शकतं. अमाऊंट तयार ठेवा. हीच योग्य वेळ आहे इन्वेस्ट करण्याची. म्हणून योग्य वेळी इंन्वेस्ट करणे खूप गरजेचे आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.