तुमचंही आर्थिक नियोजन वारंवार बिघडतंय ? वापरा या टिप्स

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

जीवन जगताना साक्षर असणे सध्यातरी काळाची गरज झालेली आहे.या बाबतीत एका प्रख्यात व्यक्तीचे वाक्य मला आठवले आणि ते म्हणजे ” Do not save what is left after spending but spend what is left after saving”.

आर्थिक जगतातील इतिहास घडवणाऱ्या आणि 62 बिलियन अमेरिकन डॉलर संपत्ती असलेले बर्क शेअर हाथवे कंपनीचे चेअरमन आणि सीईओ असलेल्या वॉरेन बफेट यांचे वरील वाक्य आहे. या ओळीचा मराठीत अर्थ होतो की” खर्च केल्यानंतर जे काही वाचले आहे ते वाचवू नका तर वाचल्यानंतर जे वाचले असेल तेच खर्च करा” .

What is the Importance of Saving Money | IDFC FIRST Bank

व्यक्ती गरीब असो की श्रीमंत बचत सर्वांसाठीच आवश्यक असते .प्रत्येकाकडे येणाऱ्या पैशापेक्षा खर्च जास्त होताना दिसतो. म्हणून मराठी मध्ये एक म्हण आहे,” पैसा मुंगीच्या पावलाने येतो आणि हत्तीच्या पावलाने निघून जातो” येणारी आवक आणि होणारा खर्च याचा जर ताळमेळ बसत नसेल किंवा ताळमेळ बिघडला की कर्जबाजारीपणा आणि इतर अडचणी आपोआपच वाढत असतात. आज मी तुम्हाला बचतीचे राज मार्ग सांगणार आहे.

1. आर्थिक उद्दिष्टे किंवा ध्येय निश्चित करून त्याचे नियोजन करणे- 

तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे आर्थिक उद्दिष्टे. तुम्हाला कोणत्या वेळेपर्यंत किती बचत करायची कोणत्या कामासाठी आणि किती कालावधी नंतर तुम्हाला किती रक्कम गरजेचे आहे हे ठरवून घ्या.त्यामध्ये अल्प,मध्यम,दीर्घ कालावधी ठरवून घ्या.

2.खर्चाची नोंद आणि आर्थिक नियमांचे पालन-

ध्येय निश्चित झाल्यानंतर तुम्हाला जसा सध्या खर्च करता तसाच एक महिना खर्च करा, परंतु या खर्चाचा सर्व हिशोब नोट करून ठेवा आणि महिना संपल्यानंतर त्या खर्चातून आवश्यक आणि अनावश्यक खर्च कोणता त्याचे वर्गीकरण करा आणि त्यानंतर आवश्यक खर्चच तुम्ही कराल हे ठरवून घ्या.

Saving 50% of Your Income

3. खर्चाचे मासिक बजेट करून ठेवा- 

महत्त्वाचा खर्च जो तुम्ही बाजूला काढला त्या खर्चाचे महिन्याचे कडक बजेट लावून ठेवा. अर्थात त्या बजेटच्या बाहेर शक्यतो जाऊच नका.त्यामध्ये घर खर्च आणि अन्न खर्च यावर 30%, जीवनशैलीसाठी 30%, बचतीसाठी 20 % आणि कर्जाचे हप्ते यासाठी 20 % असे आपण वर्गवारी करू शकता. यामध्ये व्यक्तिपरत्वे किंवा गरजेनुसार तुम्ही बदल करू शकता, परंतु मासिक बजेट हा करावाच.

4. खर्चापेक्षा बचत जास्त करण्याचा प्रयत्न करा –

बचतीचे सूत्र आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत. कमावलेल्या पैशातून खर्च केलेला पैसा सोडून उरलेली म्हणजे बचत.म्हणून बुफेत सांगतात की,आधी बचत करा आणि उर्वरित खर्च करा. याचसोबत अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा.लक्षात ठेवा खर्च कमी म्हणजे सुद्धा बचतच.

5. गुंतवणूक सुरु करा-

बचत केलेले पैसे तुमच्या ज्ञानानुसार बचत करा.बचत करताना लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की इतर करतात म्हणून आपणही त्याच ठिकाणी गुंतवणूक करू नये.ज्या गोष्टीचे स्वतःला परिपूर्ण ज्ञान असेल तिथेच बचत करावी.तुम्हाला पुढील पाच किंवा दहा वर्षात तुमच्या नियोजनानुसार बचत करता आली पाहिजे.बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

13 Easy Ways to Save Money

6. खर्चाच्या सवयी वर लक्ष केंद्रित करणे-
नकळतच अशी सवय अनेकांना असते, मित्र किंवा शेजाऱ्यांनी केली परंतु आवश्यक नसलेली खर्च आपण करतो का ? याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे.

7. खर्चाची प्राथमिकता-

आपण पाहिलेच की खर्चाची एक यादी करायची, यादी पूर्ण झाल्यानंतर यादीतील सगळ्यात वरच्या खर्चासाठी निश्चित पैसे बाजूला ठेवून सगळ्यात खालच्या खर्चाकडे लक्ष देऊन हा खर्च खरच गरजेचे आहे का ?याचा विचार करायला पाहिजे.
या सर्व गोष्टी करताना यामध्ये तुमच्या संपूर्ण परीवारा सोबत चर्चा करायला हवी कारण बचत करताना यामध्ये संपूर्ण परिवाराची गरज असणार आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.