चॉकलेटसाठी हट्ट करण्याच्या वयात या मुलीने लिहिलं आहे तिचं पहिलं पुस्तक, वाचा सविस्तर

लोकप्रिय

तुमच्या आमच्या लहानपणी आपण सगळेचजण हट्ट करतो. लहानपणी आपण सगळ्यांनीच खेळणं, खाणं, टि व्ही पाहणं आणि लोळणं यातच घालवलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का चॉकलेटसाठी हट्ट करण्याच्या वयात एका मुलीने स्वत:चं एक पुस्तक लिहिलं आहे.

इशिता कात्याल असं या बाल लेखिकेचं नाव आहे. 2005 मध्ये जन्म झालेल्या इशिता ‘सिमरन्स डायरी’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे.
इशिता कुणी स्पेशल नाही किंवा कोणत्याही मोठ्या बॅकग्राऊंड असलेल्या घरातून आली नाही. आपल्या आसपास असलेल्या सामान्य मुलांसारखीच इशिताही तुम्हाला वाटेल. पण तिच्यातील टॅलेंटमुळे ती आज आंतरराष्ट्रीय चेहरा बनली आहे.

Ishita Katyal - Neeyamo

टेड टॉक्स या आंतरराष्ट्रीय मंचाची ती ओपनिंग स्पीकरही बनली आहे. यावेळी केलेल्या भाषणात तिने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. मुलांना वाट्णारी भिती त्यांच्यातील असुरक्षितता याबाबत चर्चा केली आहे. टेड टॉक्स या प्लॅटफॉर्मवर बोलणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय आहे. इशिताने सिमरन डायरी हे पुस्तक तिच्या उन्हाळी सुट्टीमध्ये पुर्ण केलं.

एका लहान मुलीच्या आनंदी, दु:खी आणि मजेदार आठवणी तिने या पुस्तकात लिहिल्या आहेत. लेखिका व्हायचं हे इशिताचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.

कोणतीही स्वप्न पुर्ण करण्यासाठी वयाची अट नाही असं म्हणत तिने लेखनाला सुरुवात केली. सिमरनच्या व्यक्तिरेखेतून इशिताने जणू लहानग्यांचं भावविश्वच उभं केलं. तिच्या या प्रयत्नांचा परिपाक म्हणजेच तिचं पहिलं वहिलं पुस्तक आहे.