नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
आज आपण एका अशा व्यक्ती बद्दल बोलतोय ज्या व्यक्तीनं वयाच्या एकविसाव्या वर्षीच पहिल्या प्रयत्नामध्ये आयएएसची परीक्षा पास करून जालना जिल्ह्यातल्या पहिला आयएएस अधिकारी बनण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे.तो आहे अन्सार शेख आणि आज आपण जाणून घेणार आहोत की जालना जिल्ह्यातल्या झोपडपट्टीमध्ये जन्मलेला हा मुलगा आयएएस अधिकारी कसा बनला. त्यांचा जन्म 1 जून 1995 ला झाला.
आधी सांगितल्याप्रमाणे झोपडपट्टीमध्ये जन्म झाला होता त्यामुळे घरची प्रचंड गरिबी होतीच,त्यांचे वडील रिक्षा चालवायचे आणि आई शेतमजूर म्हणून काम करायची आणि घरात अभ्यासाचे वातावरण आजिबातच नव्हत. त्याच्या वडिलांना लोक नेहमी म्हणायचे की त्याला शिकून काय करणार आहेस?त्याला कामाला लाव निदान चार पैसे चांगले कमावेल पण त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की, त्याला काढू नका तो अभ्यासामध्ये खूप चांगला आहे. तो तुमची गरीबी निश्चित दूर करेल.
त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत ठेवलं पण घरीसुद्धा वातावरण अजिबात चांगला नव्हत. त्याच्या दोन बहिणींची लग्न अधिक कमी वयात झाली आणि लग्नासाठी भरमसाठ हुंडासुद्धा मोठ्या प्रमाणात दिला गेला. त्याचप्रमाणे त्यांच्या आईला सुद्धा खरी खूप मारहाण होत असे.अन्सार यांच्या वडिलांनी तीन लग्न केली होती. पहीली पत्नी वारली, मग त्यांनी दुसरं लग्न केलं.
त्यानंतर त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांच्या आईला त्याच्या वडिलांकडून दारूच्या नशेमध्ये प्रचंड मारहाण झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये सुद्धा ठेवाव लागल आणि मग मुलाकडे पाहायला कोणीच नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तिसरं लग्न केलं, पण जेव्हा अन्सार शेख यांची खरी आई घरी बरी होऊन आले तेव्हा त्यांची सावत्र आई आणि त्याची खरी आहे त्यामध्ये प्रचंड भांडण होत असे आणि त्यामध्येसुद्धा अन्सार शेख यांची कात्रीमध्ये सापडल्यासारखी अवस्था होत असे.अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी दहावी केली. तेव्हा एमएससीआयटीचा क्लास लावायचे सुद्धा त्यांच्याजवळ पैसे नव्हते.
त्यामुळे काही काळ त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचे काम सुद्धा केलं. त्यानंतर त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण सुद्धा पूर्ण केलं. त्यांना बारावी मध्ये 91 टक्के मार्क मिळाले आणि मग त्यांनी ठरवलं की आपण बीएमध्ये पदवी घ्यायची आणि युपीएससीची परीक्षा द्यावी आणि म्हणून ते पुण्यातसुद्धा आले.ते जेव्हा पुणेमध्ये आले तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टी-शर्ट,दोन पॅन्ट,एक स्लीपर आणि एक पिशवी एवढ्याच गोष्टी होत्या बर पुण्यात नातेवाईक सुद्धा नव्हते.
त्यामुळे हॉस्टेलसाठी सुद्धा दारोदार भटकले.दररोज होस्टेल शोधायला ते सहा ते सात किलोमीटर पायी चालत असे. हॉस्टेल मिळाल्यावरती सुद्धा खूप तुटपुंजे पैशावर जगायचे. यूपीएससीच्या क्लास लावायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते.तेव्हा तिथल्या क्लासच्या मालकांनी त्यांना फीमध्ये सुट दिली आणि त्यांचा क्लास सुरू झाला.त्यानंतर ते दिवसाचे दहा ते पंधरा तास अभ्यास करायचे.
ते दिवस आठवले की अन्सार शेख असं म्हणतात की “जेव्हा तुमच्याकडे कुठलेच रिसोर्सेस नसतात ना,तेव्हा तुमची बुद्धिमत्ता हीच तुमचा सगळ्यात मोठा रिसोर्स असतो” त्यानंतर त्यांनी स्वतःला अभ्यासामध्ये बुडवूनच घेतल. त्यांनी यूपीएससीसाठी मागच्या वीस वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव केला आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून मग परीक्षा दिली आणि त्यानंतर मेन्सच्या पहिल्याच प्रयत्नात पास झाले आणि इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले.
त्यासाठी सुद्धा त्यांनी आकरा सरावाचे इंटरव्ह्यू दिले. जिथे सामान्य मुलं फक्त दोन तीन चार देतात, त्यांनी शंभरहून अधिक इंटरव्ह्यूमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव सुद्धा ऐकले आणि मगच इंटरव्यूला गेले. इंटरव्यूमध्ये सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आणि सगळी खरीखरी उत्तरं दिली आणि तो इंटरव्यू ते पाससुद्धा झाले. आणि आजच्या घडीला देशातील सगळ्यात तरुण आयएएस ऑफिसर सुद्धा झालेले आहेत.
अतिशय गरीबी,घरातच अतिशय वाईट वातावरण,कमी वयात सोसलेले अनेक वाईट प्रसंग या सगळ्यांना तोंड देऊन आपल्या शिक्षणावरचा नितांत प्रेमामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या प्रचंड व मेहनतीच्या जोरावर आज आयएएस झालेल्या अन्सार शेख यांना सलाम.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.