स्टॅम्प पेपरची मुदत कधी संपते का? जाणून घ्या स्टॅम्प पेपरच्या वापराबाबत महत्वपूर्ण माहिती.

कायदा लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण कोणत्या न कोणत्या कामासाठी स्टॅम्प पेपर खरेदी केला असेलच, तो वापरला देखील असेल. शंभर, दोनशे, हजार, दोन हजार अश्या विविध रकमांचे स्टॅम्प पेपर आपण आपल्या कामाच्या आवश्यकतेनुसार खरेदी करून त्याचा वापर करतो. परंतु काही वेळा असं होतं की, आपण एखाद्या विशिष्ट कामासाठी स्टॅम्प पेपर खरेदी करतो पण पुढे काही कारणास्तव ते कामच रद्द होते आणि तो स्टॅम्प पेपर आपल्याजवळ तसाच पडून राहतो. 100रु , 200 रूपयांचा स्टॅम्प पेपर असेल तर आपण सहसा त्याबाबत जास्त विचार करत बसत नाही. परंतु 500 रु, 1000 रु किंवा त्यापेक्षा अधिक रकमांचे स्टॅम्प पेपर आपल्याजवळ पडून असतील तर नक्कीच आपण थोडी चिंता करू. अश्या परिस्थितीमध्ये स्टॅम्प पेपरच्या वापराची काही काल मर्यादा असेल आणि त्या दरम्यान आपण त्याचा वापर केला नाही तर मग झाले ना नुकसान? तर नाही. तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

आज आपण आपल्या लेखामधून स्टॅम्प पेपरच्या वापराबद्दल, त्याच्या वैधतेबद्दल माहिती घेणार आहोत. सोबतच सुप्रीम कोर्टाने आपल्या न्यायनिवाड्यात याबाबत काय संगितले आहे हे देखील जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा, आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.

स्टॅम्प पेपरचे 2 प्रकार आहेत :

आपल्या सर्वांना माहीत असेलच की स्टॅम्प पेपरचे 2 प्रकार आहेत,

1) ज्युडिशियल स्टॅम्प : दिवाणी न्यायालय किंवा इतर न्यायालयांमद्धे वापरण्यात येणार्‍या स्टॅम्प पेपरला ज्युडिशियल स्टॅम्प असे म्हणतात, या स्टॅम्प पेपरचा वापर न्यायालयामध्ये कोर्ट फी भरण्यासाठी वगैरे केला जातो. हे स्टॅम्प न्यायालयाबाहेर कोणत्याही कामासाठी वापरण्यात येत नाही, यांचा वापर फक्त न्यायालयामध्येच होतो.

2) नॉन-ज्युडीशियल स्टॅम्प : न्यायालयाव्यतिरिक्त वापरण्यात येणारे स्टॅम्प पेपर म्हणजे नॉन-ज्युडीशियल स्टॅम्प. आपण एखादे खरेदी खत, रेंट अग्रिमेंट ई. करण्यासाठी जे स्टॅम्प पेपर वापरतो ते गैरन्यायिक स्टॅम्प पेपर असतात. यांचा वापर व्यवहारात बर्‍याच कामांसाठी होतो. आजचा आपला हा लेख देखील याच स्टॅम्प पेपर संदर्भात आहे.

एखादा करार करण्यासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर :

एखाद्या 100 रुपयांच्या नॉन-ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर एखादा करार करण्यात आला असेल तर तो करार कधी पर्यंत वैध असतो? जर करार 200 रु किंवा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर केल्यास तो जास्त काळ वैध राहतो का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात गोंधळ करतात. त्याचे एका वाक्यात उत्तर म्हणजे, तो करार हा त्या स्टॅम्प पेपर मध्ये नमूद केलेल्या काळापर्यंत वैध असतो. जर स्टॅम्प पेपर मध्ये कोणताही कार्यकाळ नमूद केलेला नसेल तर तो कायमस्वरूपी वैध असतो.

स्टॅम्प पेपरची वैधता : 

भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार, गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरच्या वैधतेची वेळ कुठेही नमूद केलेली नाही, त्यामुळे त्याच्या वैधतेची वेळ निश्चित केलेली नाही आणि तो 6 महिन्यांनंतरही वापरला जाऊ शकते आणि त्यावर लिहिलेली गोष्ट कायदेशीर असेल.

भारतीय मुद्रांक कायदा 1899 च्या कलम 52 मध्ये फक्त अशी तरतूद आहे की खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत कोणताही स्टॅम्प पेपर वापरला गेला नसेल आणि वापरात नसेल किंवा वापरण्यायोग्य नसेल तर अशा स्टॅम्प पेपरला कलेक्टर स्टॅम्प पेपर म्हणून घोषित केले जाईल. तो स्टॅम्प पेपर परत करून आपण आपली रक्कम परत मिळवू शकतो.

स्टॅम्प पेपर खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतरही गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरमध्ये एखादा करार केला गेला असेल, तर तो करार वैध असेल. म्हणजेच नॉन-ज्युडीशियल स्टॅम्पचा खरेदीच्या 6 महिन्यांनंतर देखील एखादा दस्त बनवण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खरेदी केलाला स्टॅम्प पेपर 6 महिन्यांनी एक्स्पयार झाला म्हणून फेकून देण्याची चूक करू नका.

Thiruvengadam Pillai v Navaneethammal and Anr (2008) :

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की भारतीय मुद्रांक कायदा, 1899 कुठेही स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी कोणतीही कालबाह्यता तारीख निर्धारित करत नाही. कलम 54 फक्त अशी तरतूद करते की ज्या व्यक्तीकडे स्टॅम्प पेपर आहे ज्यासाठी त्याचा तात्काळ वापर होत नाही (जे खराब झालेले नाही किंवा अयोग्य किंवा निरुपयोगी आहे), तो असा स्टॅम्प पेपर 6 महिन्यांच्या आत जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करून त्याच्या किमतीचा परतावा मागू शकतो.

कलम 54 मध्ये विहित केलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीची अट केवळ न वापरलेल्या स्टॅम्प पेपरच्या किमतीचा परतावा मिळविण्यासाठी आहे, स्टॅम्प पेपरच्या वापरासाठी नाही.

कलम 54 नुसार ज्या व्यक्तीने स्टॅम्प पेपर खरेदी केला आहे, त्याने सहा महिन्यांच्या आत वापरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, अंमलबजावणीच्या प्रस्तावित तारखेच्या सहा महिन्यांपेक्षा जास्त अगोदर खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपरचा वापर दस्तऐवजासाठी होण्यास कोणताही अडथळा नाही.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.