नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
‘मरावे परी किर्तीरुपी उरावे’ असं समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. संपुर्ण मानवी जीवनाच्या कर्माचे सार अगदी या छोट्या ओळीतून समर्थ रामदासांनी विषद केलं आहे. जन्माला आल्यानंतर प्रत्येकजण जगतोच, पण जीवन जगतानाच असं जगलं पाहिजे की लोकांनी आपल्या मृत्यूनंतरही त्याची वाहवा करायला हवी.
आपलं जिवंत असतानाच केलेलं कर्म हे आपल्याला मृत्यूनंतरही लोकांच्या आठवणींमध्ये अमर ठेवण्यासाठी मदत करत असतं. आपल्या देशात अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांनी त्याग, संघर्ष, धोरणीपणा यांच्या जोरावर दिगंत अशी किर्ती मिळवली. त्यांच्या मृत्यूनंतर कितीतरी युगं लोटली तरी त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जात असतं.
सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे ती पंखुरी श्रीवास्तव या नावाची. पंखुरी श्रीवास्तव या नावाचं कौतुक तर होत आहेच पण त्यासोबतच एक करुण कहानीही जोडली गेली आहे. 32 वर्षीय पंखुरीने नुकताच जगाचा निरोप घेतला. तिचं इतक्या कमी वयात जाणं अनेकांना धक्का देणारं आहे.
वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी हार्ट अटॅकने पंखुरीला या जगातून नेलं. तुम्हाला वाटेल पंखुरीची चर्चा या लेखामध्ये करण्याचं कारण काय ? आपल्या उण्यापु-या 32 वर्षांच्या आयुष्यात पंखुरीने स्टार्ट अप उद्योगांच्या क्षेत्रात खास ओळख बनवली होती.
2012 मध्ये ग्रॅबहाऊस या कंपनीची स्थापना केली होती. केवळ 20 हजार रुपयांच्या भांडवलावर तिने हा व्यवसाय सुरु केला होता. स्वत:ला घर शोधताना आलेल्या अडचणींचा इतरांना सहन करावा लागू नये यासाठी पंखुरीने या स्टार्ट अपची सुरुवात केली होती. या कंपनीची लोकप्रियता इतकी वाढली की एका टप्प्यावर त्याचा टर्नओव्हर जवळपास 720 कोटींपर्यंत पोहोचला.
पंखुरीच्या या यशाचं कौतुक होत असतानाच तिने आणखी एक प्लॅटफॉर्म लाँच केला. ‘पंखुरी’ असं तिच्या नव्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे. महिलांवर फोकस असलेल्या या प्लॅटफॉर्मने लाईव्ह इंटरअॅक्टीव्ह कोर्स, एक्सपर्ट चॅट आणि स्कील डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेतला होता. तिच्या या प्लॅटफॉर्मने कॅपिटल इंडियाच्या एक्सेलेरेटर प्रोग्राम, सर्ज, आणि इंडिया कोटिअॅंट आणि टॉरस या वेंचर्सच्या माध्यमातून 3.2 कोटींची कमाईही केली होती.
इतक्या कमी वयात यशाच्या इतक्या पाय-या चढत असतानाच पंखुरीला अनेक नवीन वाटाही खुणावत होत्या. पण अचानक तिच्या मृत्यूने या स्वप्नांवर पाणी फेरलं. तिच्या जाण्याने स्टार्ट अप उद्योगाची प्रेरणा हरवल्याचं म्हटलं जात आहे. अनेक उद्योगपतींनीही पंखुरीच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत तिच्या जाण्यामुळे हुशार महिला उद्योजकाला देश मुकला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.