महसूल विभागाच्या आपली चावडी या डिजिटल चावडी बद्दल माहिती ।। गावातील जमिनीचे जे काही फेरफार होतात ते बघण्याचा राजमार्ग जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आपली चावडी बाबत. मित्रांनो चावडी वाचन हा शब्द तुम्ही या आधी सुद्धा ऐकला असेल. गावातली तलाठी, गावामध्ये जी फेरफार व्हायची किंवा फेरफार ची जी नोटीस असायची ही गावांमध्ये चावडी द्वारे वाचून दाखवायचा.

तर आता महसूल विभागाने ही जी चावडी आहे हे आता डिजिटल स्वरूपामध्ये महसूल विभागाच्या वेबसाईटवर ती त्यांनी आणलेली आहे. यालाच आपण डिजिटल नोटीस बोर्ड असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आज आपण या मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. की आपल्या गावातील जी चावडी आहे.

ही ऑनलाईन मोबाईल वरती आपण कशा रीतीने चेक करायची? यामध्ये तुम्ही, तुमच्या गावा मध्ये, जे काही फेरफार होतात. जमिनीचे बाबतीतली ते तुम्ही मोबाईल वर ते आता बघू शकता. जसं की बोजा कमी करणे असेल. किंवा खरेदी खत असेल. तर या संदर्भातली माहिती किंवा नोटीस आता तुम्ही मोबाईल वर, तुम्ही या महसूल विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही आता बघू शकता.

चावडी द्वारे 3 प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळतात: आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत. सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १. नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात.

२.फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.

३.मोजणीची नोटीस: यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव, ज्या गट क्रमांकावर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक, मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक दिलेला असतो. यानंतर शेतजमिनीचे लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली असते.

तर चला मित्रांनो बघूया आपली चावडी, याबाबत सविस्तर माहिती. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर असेल या क्रोम ब्राऊझर वरती क्लिक करून तुम्ही या क्रोम ब्राऊझरला ओपन करायचय. क्रोम ब्राऊझर ओपण केल्यानंतर तुमच्यासमोर एक गुगलचा पेज ओपन होईल. तर या ठिकाणी टाईप करायचं आहे. https://bhulekh.mahabhumi.gov.in/ आणि सर्च करायचं आहे.

सर्च केल्यानंतर वरति या पेजला तुम्ही स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला वेबसाईट दिसेल. तर आता या वेबसाईटला आपण ओपण करूया. या वेबसाइट ला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज या ठिकाणी दिसून येईल. तर या पेज ला तुम्ही स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्या नंतर तुम्हाला आपली चावडी ऑप्शन दिसेल.

तर या आपली चावडी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. आपली चावडी वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज ओपन होईल. महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी. आणि खाली इंग्रजीमध्ये तुम्हाला दिसते डिजिटल नोटीस बोर्ड. तर या ठिकाणी या पेज ला परत स्क्रोल केल्यानंतर. तुम्हाला याठिकाणी जिल्हा निवडा असा हा ऑप्शन येतोय.

त्याच्याखाली जिल्हा म्हणून ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून, तुमचा जो जिल्हा असेल, तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करून तुम्ही निवडू शकता. त्यानंतर खाली तालुक्याचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय. या तालुक्याच्या ऑप्शनवर क्लिक करून. तुमचा जो तालुका असेल, तर तो तालुका तुम्ही त्या ठिकाणी स्क्रोल करून निवडायचे आहे.

तालुका निवडल्या नंतर, मित्रांनो खाली गाव म्हणून तुम्हाला हा एक ऑप्शन दिसेल. तर त्या समोर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे गाव असेल. ते गाव तुम्हाला निवडायचे. त्यानंतर खाली हा जो ऑप्शन तुम्हाला दिसेल ‘आपली चावडी पहा’ यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.

आपली चावडी पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर तुम्ही जे गाव सिलेक्ट केलं होतं. त्या गावची चावडी डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्यासमोर याठिकाणी ओपण होईल. तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला फेरफार नंबर म्हणून हा कॉलम दिसेल. आणि त्याच्यामध्ये फेरफार क्रमांक तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर फेरफाराचं जो प्रकार आहे.

तो प्रकार सुद्धा तुम्हाला समोरचं कॉलम मध्ये दिसून येईल. जसं की खरेदी, त्याच्यानंतर हक्कसोडपत्र, रिलीज डीड, त्याच्यानंतर बोजा कमी करणे. त्याच्या नंतर पुढच्या कॉलम मध्ये फेरफार चा दिनांक तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर हरकत नोंदवण्याची जी शेवटची तारीख आहे. ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल.

त्याच्या नंतरच्या कॉलम मध्ये तुम्हाला सर्वे गट क्रमांक हा सुद्धा तुम्हाला दिसून येईल. तर आता यातला खरेदीचा फेरफार जो आहे. तो बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी, साईडला वाहन म्हणून हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज याठिकाणी ओपन होईल तर त्यात गावाचं नाव दिलेलं असेल तालुक्याचं नाव दिलेलं असेल आणि गावचे फेरफार याचं नोंदवहीत केल्याप्रमाणे, जमीनीतील अधिकाऱ्यांच्या संबंधित नोंद करण्यात आली आहे.

म्हणजे जी काही नोटीस आहे. फेरफार बाबतची, ती तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. याच्यामध्ये पहिल्या पहिले कॉलम मध्ये तुम्हाला फेरफाराची नोंदवही तील नोंदीचा अनुक्रमांक किंवा तारीख दिसून येईल. त्यानंतर संपादन केलेल्या अधिकाऱ्याचे स्वरूप, त्या नंतर ज्यातील अधिकार संपादन करण्यात आले आहे.

तो गट क्रमांक सुद्धा तुम्हाला पुढच्या कॉलमध्ये दिलेला दिसून येईल. त्यांनंतर संपूर्ण नोटीस दिलेली असेल. आणि खाली तलाठी सही व शिक्का म्हणून दिलेलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही, फेरफार बाबतची जी डिजिटल स्वरूपाचे नोटीस आहे. ती तुम्ही या ठिकाणी तुम्ही वाचू शकता.

आता आपण आधीचे जे पेज होते ते पुन्हा ओपन करू. तर या ठिकाणी तुम्ही साईडला बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ‘नोटीस पहा’. खाली फेरफाराची नोटीस दिसेल. त्यानंतर ‘फेरफाराची स्थिती’. तर हे सुद्धा दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील.

तर आता फेरफाराची स्थिती यावर क्लिक करून फेरफाराची सद्यस्थिती, या वरती क्लिक करून फेरफार ची स्थिती वर क्लिक केल्यानंतर जो फेरफार तुम्ही तलाठ्या कडे करण्यासाठी अर्ज केलेला असेल तर त्याची स्थिती काय आहे? तो कम्पलिट झालेला आहे की त्यावर प्रोसेस चालू आहे. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर या ठिकाणी तुम्हाला फेरफार याची माहिती.

म्हणून हा चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर लवकरच येत आहे या ऑप्शन खाली म्हणजे महा भूलेख च्या या संकेतस्थळावरती, मोजणी ची नोटीस, निवडणुकीचे नोटीस ,ग्राम सभेची नोटीस, सर्वसाधारण नोटीस आणि ग्राम आदर्श तक्ता. इत्यादी या ज्या सुविधा आहे या सुद्धा लवकरच या वेबसाईटवर येणार आहे.

(वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे)

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.