साताऱ्यात हनीट्रॅप, डॉक्टरला अडकवले जाळ्यात || अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये याकरता नक्की वाचा !

साताऱ्यात हनीट्रॅप, डॉक्टरला अडकवले जाळ्यात || अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये याकरता नक्की वाचा !

आजच्या या डिजिटल युगात पैसे कमावण्याचे अनेक मार्ग तयार झाले आहेत यात काही चांगले आहेत तर काही वाईट तर काही अगदीच अश्शील आहेत.अनेक या डिजिटल जाळ्यात अडकतात आणि सर्वस्व गमावून बसतात. यात कोणीही अडकू शकत,अगदी तुम्ही सुद्धा म्हणूनच पुढील माहिती ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली.हे होतं हनी ट्रॅप.साताऱ्यातील एक नामांकित डॉक्टरांना या हानी ट्रॅप मध्ये अडकवले गेले आणि त्यांच्याकडे थोडीथोडकी नव्हे तर चक्क 60 लाख रुपयांची मागणी केली गेली.ही घटना कशी हे सविस्तर पणे आपण जाणून घेऊ. या डॉक्टरांकडे एकदा एक महिला उपचारासाठी आली असता तिने डॉक्टरांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला.

कधी ही तात्काळ वैद्यकीय सल्ला किंवा इतर वैद्यकीय मदत लागली तर त्या महिलेला फोन करता यावा या कारणासाठी डॉक्टरांनी तिला स्वतः चा मोबाईल नंबर दिला. काही दिवसातच ती महिला डॉक्टरांना मेसेज करू लागली. ह्यांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तरीही ती महिला सारखे मेसेज करत होती. शेवटी डॉक्टरांना मोह आवरता आला नाही आणि त्यांनी ही तिला परत मेसेज केला. झालं असं करता करता दोघांमध्ये बोलणं वाढू लागलं.

सुरुवातीला सकाळ संध्याकाळ येणारे मेसेज आता दिवसरात्र सुरू होते.लवकरच मेसेज च पुढचं पाऊल म्हणजे विडिओ कॉल ला सुरुवात झाली. दोघेही एकमेकांशी तासंतास विडिओ कॉल वर बोलू लागले. त्या महिलेला सावज सापडलं.ते तिच्या जाळ्यात अडकलं आहे हे पाहून तिने पुढचं पाऊल उचललं. विडिओ कॉल वर डॉक्टरांसमोर ही महिला विवस्त्र होऊ लागली व डॉक्टरांना देखील तसेच करण्यास सांगू लागली. डॉक्टर तिच्या मोहाला बाळी पडले आणि त्यांनी ही स्वतःला तिच्या समोर विवस्त्र केले.

आता या महिलेचा डाव यशस्वी झाला होता. आता या महिलेने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली ,डॉक्टरांना केलेल्या मेसेजेस पासून ते विडिओ कॉल पर्यंत सर्व पुरावे तीने गोळा केले आणि डॉक्टरांना धमकवायला सुरू केले. मला 60लाख रुपये द्या नाहीतर मी तुमची बदनामी करेल तुम्हाला धुळीला मिळवेल ,तुमचे हॉस्पिटल बंद पाडेल अश्या धमक्या ती देऊ लागली.

हे ऐकून डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे हे त्यांना सुचेना.त्यांनी केलेल्या एका चुकीचा त्यांना खूप पच्छताप होऊ लागला.त्या महिलेने तिच्या सोबत आणखी एका महिलेला सहभागी करून घेतले.काहीतरी करून यातून आपली सुटका व्हावी म्हणून त्यांनी त्या महिलांना 12लाख रुपये दिले. त्या महिलांनी त्या पैशाने दागिने खरेदी केले. व पैसे संपताच परत डॉक्टरांना पैशाची मागणी केली.

आता मात्र डॉक्टरांचे धाबे दणाणले.या महिलांची पैशाची भूक कधीच संपणार नाही हे त्यांच्या चांगलंच लक्षात आलं होतं आणि म्हणुनच त्यांनी आता पोलीस ठाणे गाठलं. आपल्या सोबत जे झालं ते इतर कुणासोबत होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.पोलिसांना त्यांनी संपुर्ण कहाणी सांगितली.पोलिसांनी ट्रॅप रचून त्या महिलांना पैसे घेण्यासाठी बोलवण्यास सांगितलं ,त्या महिला अलगद त्या ट्रॅप मध्ये अडकल्या आणि पोलिसांनी त्यांना पकडलं.

अशा प्रकारे हा हानी ट्रॅप पोलिसांनी पकडला आणि डॉक्टरांची त्यातून सुटका झाली.पण हे असं पुन्हा इतर कुणाशी ही होऊ शकत त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.असा कोणताही प्रकार तुमच्याशी किंवा इतर कुणाशी घडत असल्यास त्वरित पोलिसांना त्याची माहिती द्या आणि होणारा अनर्थ टाळा.

admin

error: Content is protected !!