लस म्हणजे काय? ती कशी तयार होते? पहिली लस कधी निर्माण झाली? याचीच माहिती आज आपण घेणार आहोत !

लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो  सध्या जगभर कोरोनाच संकट आहे, त्यासाठी अनेक शास्त्रज्ञ लस शोधत आहेत, पण लस ही नक्की काय असते? ती कशी तयार होते? पहिली लस कधी निर्माण झाली? याची बऱ्याच जणांना माहिती नसेल. आणि याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. लस म्हणजे काय? ‌लस म्हणजे त्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले जंतू असतात ते शरीरामध्ये टोचले जातात.

त्यामुळे काय होत? त्या रोगाची निर्मिती होत नाही आणि त्याच्या शरीरात त्या व्याधीला किंवा रोगाला सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, म्हणजेच लस. ‌लसीची निर्मिती कशी झाली? 200-250 वर्षांपूर्वी जगभरात देवी या रोगाने थैमान घातले होते. यामध्ये सर्व अंगावर फोड येत व त्यातून पू  निघत असे. या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नव्हते.

त्यामुळे मृत्यू चे प्रमाण वाढत होते, तसेच हा आजार संपर्गातून होत असल्याने जास्त पसरत होता. आयुर्वेदिक शास्त्रात त्यावर उपाय शोधण्यात आले. चीन च्या वैद्यक शास्त्रात त्यावर उपाय शोधण्यात आले. पण उपाय काही सापडत नव्हता. गावातील लोक लहानबालकांना याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवीच्या रोग्याच्या कपड्यात नवजात बालकाला ठेवत असत.

त्यामुळे काय व्हायचं तर त्या मुलाच्या शरीरात या रोगाविरुद्ध लढण्याची ताकद, रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असे, व तो देवी या आजारापासून वाचत असे. परंतु यामुळे देवीचा आजार पूर्णपणे नष्ट होणार नव्हता त्या बालकाला तो परत होणारच नाही असं कोणी ठामपणे सांगू शकत नव्हते किंवा अशातच एडवर्ड जेंडर नावाचा एक शात्रज्ञ आला.

त्याचा अस लक्षात आलं की ज्या गवळणी आहेत त्यांना देवीच्या रोग्याच्या संपर्कात राहून देखील हा आजार होत नाही आहे.त्याने जेव्हा निरीक्षण केले तेव्हा त्याला कळले की या गवळणींच्या हाताला फोड आले आहेत, जो की गाईंमुळे होणाऱ्या आजारातील च भाग होता, याला cow pox म्हणत असत. पण ज्यांच्या हाताला तसे फोड होते त्यांना देवी हा आजार होत नव्हता.

म्हणून एडवर्ड ने त्या महिलांच्या फोडातील द्रव्य काढले व एका 13 वर्षीय बालकाच्या शरीरात टोचले, त्यानंतर झालं काय तर त्या मुलाला 2-3 दिवसांनी फणफणून ताप आला. पण नंतर तो पूर्ण पणे बरा झाला आणि देवीच्या आजाराच्या रोग्याच्या संपर्कात येऊन देखील त्याला देवीचा आजार झाला नाही. आणि एडवर्ड यांना खात्री झाली की त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला.

तर अशा प्रकारे पहिली लस तयार झाली. त्याच्या मानवी चाचण्या घेतल्या गेल्या. ज्याला ज्याला ही लस दिल्या गेली त्याला पुन्हा देवीचा आजार झाला नाही. त्यावेळी WHO चे जवळपास दीड लाख कर्मचारी यावर काम करत होते. WHO ने सगळीकडे या लसीचे वितरण केले. हळू हळू देवीचे रुग्ण कमी झाले, काही वर्षांनी तर सरकार ने देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा ही  चालू केली.

एकेकाळी थैमान घातलेला हा रोग आता संपुष्टात आला होता. त्याच्या नंतर देवीच्या संशोधनासाठी जर त्याचे द्रव्य साठवून ठेवले असतील तर सर्व शास्त्रज्ञांनी ते नष्ट करावेत असे आदेश WHO ने दिले आणि सर्वानी ते पाळले. अशाप्रकारे ही पहिली लस तयार झाली त्यामागची ही रंजक कहाणी. त्यानंतर मग पोलिओ, BCG अशा अनेक लसीची निर्मिती करण्यात आली, हिपॅटॅटस B च्या लसीची निर्मिती करण्यात आली. आणि जगभरामध्ये थैमान घालणारे अनेक रोग लसीकरणामुळे आटोक्यात येण्यास सुरुवात झाली.

आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, कोरोना जगभर थैमान घालतोय आणि त्याची लस शोधण्यासाठी अनेक देश अनेक शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करत आहेत. याला कुठे तरी यशही मिळताना दिसत आहे, ऑक्सफर्ड विद्यापीठाने सांगितले आहे की त्यांनी तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी सूरू असून त्याला यश मिळताना त्यांना दिसत आहे.

त्यात आनंदाची बाब म्हणजे त्यांनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया सोबत करार केला आहे, यात होणाऱ्या उत्पादनांपैकी 50% उत्पादन हे ते भारताला देणार आहेत, यामुळे लवकरच जगभर थैमान घातलेल्या अनेकांचे जीव घेतलेल्या कोरोनाचा देखील अंत होईल आ दिसत आहेत. भारत बायोटेक ने सुद्धा covaxin नावची लस बनवली आहे त्याच्याही  मानवी चाचण्या सुरू आहेत, व लवकरच ते बाजारात येईल अशी आशा आपण बाळगुया.