कुळाची जमीन एकाच वारसला देता येते का? ।। जमीन विकल्याचा पुरावा कसा शोधावा? ।। मालमत्तेच्या गावा व्यतिरिक्त इतरत्र मृत्युपत्र करता येते का? ।। खरेदीखताला आव्हान द्यायची मुदत? ।। सातबारा आणि भूमापन क्षेत्रफळात फरक? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे, कुळ कायदा अंतर्गत मिळालेली जमीन, ती व्यक्ती अनेक वारसां पैकी एखाद्याच वारसाला देऊ शकते का? किंवा त्याच्या लाभात हस्तांतरित करू शकते का? उत्तर:  एक लक्षात घेतले पाहिजे, की कुळ कायद्याअंतर्गत जमीन मिळते. म्हणजे नक्की काय होतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जमीन प्रत्यक्ष कसत असतं. तेव्हा कसेल त्याची जमीन. या […]

Continue Reading

बेदखल कुळ म्‍हणजे काय?।। कुळ कायदा आणि बेदखल कुळांच्या पुनर्स्थापनेकरता कुळ कायद्यात केलेल्या सुधारित २००६ च्या कायद्याची माहिती जाणून घ्या !

बेदखल कुळ म्‍हणजे काय? उत्तर: महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, २०११ च्‍या कलम १४ अन्‍वये कुळांच्‍या कसुरीमुळे कुळवहिवाट समाप्‍त करण्‍याची तरतूद आहे. कुळांचा कसूर म्‍हणजे: अ)कोणत्‍याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्‍या त्‍या वर्षांच्‍या ३१ मे पूर्वी न भरणे. ब)जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल असे कृत्‍य जाणूनबुजून करणे. क)जाणूनबुजून महाराष्‍ट्र कुळवहिवाट व […]

Continue Reading