कुळाची जमीन एकाच वारसला देता येते का? ।। जमीन विकल्याचा पुरावा कसा शोधावा? ।। मालमत्तेच्या गावा व्यतिरिक्त इतरत्र मृत्युपत्र करता येते का? ।। खरेदीखताला आव्हान द्यायची मुदत? ।। सातबारा आणि भूमापन क्षेत्रफळात फरक? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून !

पहिला प्रश्न आहे, कुळ कायदा अंतर्गत मिळालेली जमीन, ती व्यक्ती अनेक वारसां पैकी एखाद्याच वारसाला देऊ शकते का? किंवा त्याच्या लाभात हस्तांतरित करू शकते का? उत्तर:  एक लक्षात घेतले पाहिजे, की कुळ कायद्याअंतर्गत जमीन मिळते. म्हणजे नक्की काय होतं? तर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जमीन प्रत्यक्ष कसत असतं. तेव्हा कसेल त्याची जमीन. या तत्वानुसार आणि कूळ कायद्याच्या तरतुदीनुसार.

त्या जमीनीची मालकी त्या प्रत्यक्ष कसणाऱ्याला मिळते. सहाजिकच ज्याप्रकारे ती मालकी मिळते, हे आपण लक्षात घेतले तर ति जी मालकी आहे. किंवा ती जी मिळकत आहे ती स्वकष्टार्जित स्वरूपाची मिळकत आहे. असाच आपल्याला तर्क किंवा निष्कर्ष काढायला लागतो. सहाजिकच मालमत्तांमध्ये स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित हे दोन मुख्य प्रकार आहेत.

यापैकी स्वकष्टार्जित मालमत्तेचा काय करायचं? किंवा त्याचं विनीयोग किंवा हस्तांतरण कसं करायचं? याचे पूर्ण अधिकार त्या मालमत्तेच्या मालकाला असतात. जे वडिलोपार्जित मालमत्तेबाबत असू शकत नाही. कारण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कुटुंब मधील प्रत्येक सदस्याला त्याच्या जन्म झाल्याक्षणी अधिकार प्राप्त होतो.

मात्र स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये असे काही ही नसते. ज्या माणसाने एखादी मालमत्ता कमावलेली आहे. किंवा मिळवलेली आहे. ती व्यक्ती त्या मालमत्तेचा कसाही विनियोग किंवा हस्तांतरण करू शकते. त्याला कोणतेही कायदेशीर अडचण येत नाही. सहाजिकच कुळ कायदा अंतर्गत ज्या व्यक्तीला जमीन मिळालेली आहे.

ति जमीन एखाद्या व्यक्तीला देण्याचा पूर्ण अधिकार त्या व्यक्तीला आहे. मात्र हे जसजसं पुढे जाईल. उदाहरणार्थ समजा आ या व्यक्तीला कुळ कायद्यांतर्गत जमीन मिळाली. अ च निधन झालं. आणि वारस म्हणून ब आणि क ची जर नोंद झाली. तर ब आणि क करता ही जी जमीन आहे. ती वडिलोपार्जित असेल. स्वकष्टार्जित नाही. सहाजिकच स्वकष्टार्जित जमिनीबाबत अ ला जे अधिकार आहेत. तसे कोणत्याही अधिकार ब आणि क ला असणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

पुढचा प्रश्न आहे, जमीन विकल्याचा पुरावा कसा शोधावा? उत्तर: आता जमीन विकली म्हणजे त्या संदर्भात कोणतातरी करार निश्चितपणे झालेला असेल. आता एखाद्या कराराची माहिती जर आपल्याला शोधायचे असेल. तर त्याचे दोन मुख्य पर्याय आहेत. एक म्हणजे त्या जमीनीचा महसूल अभिलेख तपासायचा.

मुख्यतः फेरफार नोंदनी. कारण जेव्हा कोणतेही जमीन विकली जाते, आणि त्याचा हस्तांतरण होतं. आणि त्या हस्तांतरणाला नुसार महसूल अभिलेखात बदल करायची वेळ येते. तेव्हा एका स्वतंत्र फेरफार नोंदी द्वारे असे बदल करण्यात येत. सहाजिकच जी जमीन विकल्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्याचे जर आपण फेरफार बघितले. तर त्या फेरफार नोंदी मध्ये त्या विक्रीचा फेरफार तुम्हाला आढळेल.

आणि तो फेरफार एकदा सापडला की त्यातील माहिती आधारे त्या कराराची सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला मिळेल. पण समजा आपल्याला महसूल अभिलेखा शिवाय हे काम करायचं असेल. तर त्या मिळकतीची जी माहिती आहे. म्हणजे मग सर्वे क्रमांक असेल.

गट क्रमांक असेल. इत्यादी द्वारे तुम्ही त्या मिळकतीचा ऑनलाईन सर्च घेऊ शकता. आणि त्या सर्च द्वारे तुम्हाला त्या मिळकती संदर्भात काही नोंदणीकृत करार झालाय का? याची माहिती मिळू शकते. म्हणजे महसूल अभिलेख आणि नोंदणीकृत करारांचा शोध. या दोन गोष्टी च्या आधारे जमीन विकला ची माहिती किंवा पुरावा आपल्याला सापडू शकतो.

पुढचा प्रश्न आहे, मालमत्तेच्या गावा व्यतिरिक्त इतर गावी मृत्युपत्र नोंदणी करता येते का? उत्तर: आता मृत्यूपत्र नोंदनी कुठे कुठे करता येतं? तर ते मुख्यतः दोन ठिकाणी करता येते. एक सहाजिकच ज्या ठिकाणी मालमत्ता आहे तिथे. आणि दुसरं जिथे त्या व्यक्तीचा अधिकृत रहिवास आहे तिथं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीच्या नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा खूप ठिकाणी मालमत्ता असतील.

आणि त्याचं अधिकृत वास्तव्य जर मुंबईला असेल. तर त्या मालमत्ता संदर्भात त्याच्या गावा मधे किंवा त्याचं अधिकृत वास्तव्य ऑफिशियल रेसिडेन्सी जिथं आहे. म्हणजे मुंबईमध्ये त्याला मृत्युपत्राची नोंदणी करता येईल. हि सोय म्हणजे अधिकृत वास्तव्याच्या ठिकाणी करार नोंदणी किंवा मृत्युपत्र नोंदणी करण्याची सोय.

ही फक्त मृत्यूपत्राबाबत उपलब्ध आहे. बाकी कोणताही करार आपण आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी करू शकणार नाही. त्या करता जिथं मालमत्ता आहे. किंवा जिथं अनेक मालमत्ता पैकी एखादी मालमत्ता आहे. तिथे जाऊन आपल्याला ती नोंदनी करायला लागते.

पुढचा प्रश्न आहे. खरेदी खत याला आव्हान द्यायची मुदत किती? उत्तर: सर्वसाधारणतः कोणताही नोंदणीकृत कराराला जर आपल्याला काही आव्हाने द्यायचं असेल. तर त्या करता तीन वर्षांची मुदत आहे. पण हा जो मुदतीचा कायदा आहे. तो थोडासा फ्लेक्सिबल किंवा लवचिक आहे. म्हणजे आपल्याला दावा करण्याला कारण कधी घडलं. तिथून ती मुद्दत सुरु होते.

सहाजिकच आपल्याला त्या कराराची माहिती कधी मिळाली? त्या अनुषंगाने आपल्याला या तीन वर्षांची मुदत थोडीशी मागेपुढे करता येऊ शकते. ते वकिली कौशल्य आहे. आणि प्रत्येक प्रकरणाच्या एकंदर परिस्थिती आणि गुणवत्तेच्या अनुषंगाने या मुदतीच्या कायद्यामध्ये थोडीशी लवचिकता आपल्याला आणता येते. मात्र एका मर्यादेबाहेर ही लवचिकता आणण अगदी अशक्य नसलं तरी कठीण मात्र निश्चित आहे.

पुढचा प्रश्न आहे, समजा सातबारा आणि भूमापन जे अभिलेख असतं. त्या मधील क्षेत्रफळ या मध्ये जर तफावत असेल. तर काय? उत्तर: तर सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे. की जेव्हा आपण सातबारा असं म्हणतो. सातबारा आणि भूमिअभिलेख हे दोन्ही महसुली अभिलेख आहेत. ज्या मध्ये जमीन संदर्भात विविध माहिती जतन केलेली असते. मात्र जो भूमि अभिलेख विभाग आहे.

किंवा जे भूमी अभिलेख आहे. ते बहुतांश वेळा किंवा सगळ्याच वेळेला केव्हा न केव्हा जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून तयार करण्यात आलेल्या आहेत. सहाजिकच जेव्हा एखाद्या जमिनींची प्रत्यक्ष मोजणी करून, त्या आधारे तयार करण्यात आलेला अभिलेख असेल. आणि तो अभिलेख आणि सातबारा, या मध्ये जर तफावत असेल. तर सहाजिकच प्रत्यक्ष मोजणीच्या अनुषंगाने करण्यात आलेले क्षेत्रफळ.

हे निश्चितपणे वरचढ ठरेल. म्हणून जेव्हा सातबारा आणि मोजणी नंतर च क्षेत्रफळ यामध्ये तफावत येते. तेव्हा नवीन मोजनीच जे क्षेत्रफळ आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सातबारा मध्ये बदल करून घेता येतात. किंबहुना असे बदल करून घेणं हे आपल्या फायद्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *