सगळ्या भारतीयांनी सलग ९० दिवस एकही विदेशी वस्तू खरेदी केली नाही तर खरंच १ डॉलरची किंमत १ रुपया होईल का? आणि खरंच असं झालं तर नेमके त्याचे परिणाम कसे होतील? असं होणं फायद्याचं आहे की तोट्याचं? हे सगळं उदाहरणांसह जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आर्थिक साक्षरते कडून आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाणाऱ्या चळवळीमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एक वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. असा एक मेसेज व्हायरल होतोय तो म्हणजे, जर भारतातल्या सर्व लोकांनी सलग 90 दिवस एकही विदेशी प्रॉडक्ट खरेदी केले नाही तर आपल्या एका डॉलरची किंमत एक रुपया होईल.

हा मेसेज व्हायरल होत असताना याच्या मागचं कोणतेही सत्य जाणून न घेता हा मेसेज पुढे फॉरवर्ड केला जातो. मग नेमकं हे खर आहे की खोटा आहे? हे बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो. आणि हाच प्रश्न आजच्या या विषयाच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण जाणून घेऊ जर असं काही झालं तर नेमकं काय होईल मग आपण कन्क्लूजन वर येऊ की काय नेमके वास्तव आहे. थोड्या वेळासाठी आपण गृहित धरू अस झालं तर नेमक काय? सगळ्यात त्याच मोठा परिणाम हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वर. तर ह्यांवर नेमके काय परिणाम होणार समजून घेऊ, इम्पोर्ट वर काय परिणाम होईल?

आता एक डॉलर एक रुपया झाला म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी डॉलर स्वस्त झाला, म्हणजे इम्पोर्ट स्वस्त झाला. आता समजा मी एक आय फोन विकत घेतो आणि त्याची किंमत पस्तीस हजार रुपये, आता सध्याच्या कंडिशन मध्ये झाले 70 डॉलर, 35 हजार रुपये जर डॉलर मध्ये कन्व्हर्ट केले, साध्या डॉलर सरासरी 70रु मानले तर $500 मध्ये आपल्याला मोबाईल विकत घेतला असता.

पण जर $1 रुपये झाला तर पाचशे रुपये मध्ये हा मोबाईल मला विकत घेता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी इम्पोर्ट अगदी सहज होईल, आणि सहज झाला तर इम्पोर्ट आपल्या देशाचा वाढेल. आणि कोणत्या देशाचा इम्पोर्ट वाढणं हे देशासाठी अतिशय घातक आहे, कारण आपल्या देशातील उत्पादित केलेला माल त्यावेळी तो 500रु उत्पादित झालेला नसेल.

त्यामुळे मग आपण इम्पोर्ट करु तर त्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा एकदम विपरीत परिणाम म्हणून इम्पोर्ट साठी एक डॉलर एक रुपये होणे हे अजिबातच चांगले नाही. आता आपण हीच केस एक्सपोर्टच्या बाबतीत पाहू, तो नेमका काय होईल आता आपण पाहतो की आपल्या देशात उत्पादित केलेल्या मालाला आपण जागतिक बाजारपेठेत विकतो डॉलरच्या प्रमाणात आपल्याला जी काही व्हॅल्यू भेटते ती खूप चांगली भेटते.

त्यामुळे आपण एक्सपोर्ट सातत्याने करत असतो. आता समजा आपण उदा. घेतलं तर भारतामधून फार्मासिटिकल प्रॉडक्ट खूप जास्त विकले जातात किंवा शेतीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे त्या विकल्या जातात. पण जर तिथे डॉलरची किंमत कमी झाली तर परत आपल्याला मिळणारी रक्कम खूप कमी असणार ती रक्कम जर कमी असणार आहे.

मग काय होईल नेमक? आपल्याला एक्सपोर्ट साठी पर्याय राहणार नाही कारण ते जे देश आहेत ते बाकीच्या देशा कडून सहज या गोष्टी घेऊ शकतील, आपल्याकडून का घेतात कारण आपल्याकडे त्या गोष्टी स्वस्त भेटतात. पण आपल्याला तिथे स्वस्त वाटनारी ही गोष्ट आपल्यासाठी खूप चांगला पैसा देते म्हणून आपण एक्स्पोर्ट करत असतो.

म्हणजे एक्स्पोर्ट ही आपल्या देशातला कमी होऊन जाईल. तिसरा महत्त्वाचा विषय अस जर काही झाल तर,एफ डी आय म्हणजे (फॉरेन डिरेक्टरी इन्व्हेस्टमेंट) त्याचा विपरीत परिणाम होईल. बाहेरच्या कंपन्यां किंवा बाहेरचे इन्वेस्टर आपल्या देशात गुंतवणूक का करतात, तर आपल्या देशामध्ये बिजनेस च्या ओपेरेशन कॉस्ट कमी आहेत.

कमी कशामुळे त्या देशाच्या तुलनेत आणि त्यामुळे इथे गुंतवायला प्राधान्य देतात पण आपण साधं उदा. घेतलं एखादा आपल्यातला साधा एम्प्लॉय आहे त्याची सॅलरी वीस हजार रुपये आहे, हेच आपण डॉलर मध्ये विचार केला तर साधारणपणे तीनशे डॉलर च्या आसपास ही रक्कम जातीये, आता एखाद्या विदेशी गुंतवणूकदार इथे 300$ एक एम्प्लॉय भेटतोय कदाचित त्यांना त्यांच्या देशांमध्ये ही किंमत पाच ते सहा हजार डॉलर मोजावे लागते म्हणून हे लोक इथे गुंतवणूक करतात.

जर एक डॉलर 1 रुपये झाला तर ही लोक एफ डी आय ची इन्व्हेस्टमेंट कडून घेतील.आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये विदेशी गुंतवणूक ही कमीत कमी व्हायला लागली तर त्याचे एकदम विपरीत परिणाम होतील. चौथा विषय आऊट सोर्सिंग भारताला आऊट सोर्सिंग च्या यांच्या माध्यमातून बरीच मोठमोठी कामं भेटत असतात.

आपण साध्या बीपीओ इंडस्ट्री उदा घ्या, इकडे परत लेबर कॉस्ट कमी आहे. एम्प्लॉय कॉस्ट कमी आहे. म्हणून आपल्याकडे हे सर्व जॉब येतात. पण जर 1$ 1₹ झाला तर त्यांच्या देशांमध्ये तीच कॉस्ट असणार आहे त्याच्या देशामध्ये. मग ते लोक तिथेच एम्प्लॉयमेंट करतील आपल्याकडे कशाला आऊट सोर्सिंग करतील.

इथले जॉब आपोआप निघून जातील. मग तो ही पर्याय आपल्याकडे राहणार नाही.असेच अनेक परिणाम या माध्यमातून होतील,आणि भावनिक मुद्दा पुढे गेलं की आपल्या देशातच आपण प्रॉडक्ट तयार करायचे आणि आपणास ते कंज्युम करायचे. पण हा विचार आपण केला तर बाकीचे देश काय विचार करतील.

त्यांचा ही विचार असेलच की, ठीक आहे तुम्ही तुमच्या देशांमध्ये उत्पादित करता आणि तुम्ही ते कंज्युम करत आहे पण या सगळ्या गोष्टी आहेत का की आपल्या देशात उत्पादित होतात. हे जर आपण साधं फूड ऑइल उदाहरण घेतलं तर फूड ऑइल मध्ये आपण फक्त 18% ऑइल प्रोड्युस करतो, आपल्याला 82% इम्पोर्टच करावं लागतय.

जर तुम्ही विचार करा आपल्याला बाकीचे देशांना विचार केला की आपण कोणाला विकत नाही येत आपण कोणाकडून विकत घेत नाहीत आणि ती लोक पण हाच विचार करतील. आणि फूड ऑइल त्याच्यामध्ये जे इराण विरान तिकडचे जे देश आहे त्यांनी फूड ऑइल देणं भारताला बंद केलं तर भारतामध्ये फूड ऑइल येणाच बंद होईल आणि ते बंद झालं तर तुम्ही विचारू शकता काय काय परिणाम होऊ शकतात.

आपल्याला रस्त्यावर धावणं अवघड होऊन जाईल फक्त हाच विषय नाहीये, ट्रॅव्हलिंग तर वेगळ्या कंपन्या बंद पडेल म्हणजे आपल्या देशामध्ये हाहाकार माजेल, जर ही अशी परिस्थिती असेल तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही असं होणं शक्य आहे का ह्या सगळ्या गोष्टी होत असतील.

तर ही गोष्ट आपण जाणून घेऊ की असं कधीही शक्य होणार नाही कि एक डॉलर हा एक रुपया मध्ये रुपांतरीत झालेला एक डॉलर ची काय किंमत आहे साधारणपणे सत्तर रुपये आसपास $ ची किंमत आहे $ कमी झाला किंवा जास्त झाला 70₹ पेक्षा खूप ज्यास्त झाला किंवा खूप कमी झाला ही अर्थव्यवस्थेसाठी दोन्ही ही धोकादायक आहे.

त्यामुळे असा कोणत्याही भ्रममध्ये आपण राहू नये आणि अशा पद्धतीचे मेसेज येतात तर अशा पद्धतिच्या मेसेज ची शहानिशा करूनच हा मेसेज पुढे पाठवले पाहिजे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.