नमस्कार मित्रांनो आज आपण शेतीविषयक 42 योजनांची माहिती तेही थेट तुमच्या व्हाट्सअप वर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी बऱ्याच वेळा एकाच पिकावर अवलंबून राहतात तसेच वेगवेगळ्या कारणामुळे पिकांमध्ये घट येते यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा वाढून शेतकरी आत्महत्याचे प्रमाण देखील वाढत आहे.
कृषी तंत्रज्ञान विस्तारात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कृषी विभागाला मर्यादा येत आहेत मात्र यावर पर्याय म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी पुढाकार घेत कृषी योजनांविषयी ची माहिती एका मोबाईल टच वर उपलब्ध करून दिली आहे, सोशल मीडियाचा वापर करत यवतमाळ जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या संकल्पनेतून शेतीविषयक योजनांची माहिती एका क्लिकवर.
उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्हाट्सअप वर ‘योजना’ किंवा ‘स्कीम’ असे टाईप करून पाठवल्यास तब्बल 42 शेतीविषयक योजनांची माहिती तुमच्या व्हाट्सअप वर पाठवण्यात येते, तब्बल 42 योजनांच्या प्रसारासाठी त्यांनी मोबाईलचा अभिनव पद्धतीने उपयोग केला आहे. यामध्ये मृद व जलसंधारणासह.
पाणलोट विकास, वसुंधरा, राष्ट्रीय फळबाग अभियान, कृषी अभियांत्रिकी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, वनशेती, शेततळे, मिनी राईस अशा वेगवेगळ्या 42 योजनांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची अमरावती विभागीय उपायुक्त त्यांच्याकडून देखील दखल घेण्यात आली आहे.
याची कार्यपद्धती ही खाली दिल्याप्रमाणे आहे: आपल्या व्हाट्सअप वरून 9404396119 या नंबर वर मराठीमध्ये ‘योजना’ किंवा ‘स्कीम’ असे लिहून पाठवल्यास लगेच योजना संदर्भात लागणारे कागदपत्रे दस्तऐवज या संबंधीची माहिती आपल्या व्हाट्सअप वर उपलब्ध होते ज्याची माहिती हवी आहे त्याचा कोड परत त्याच क्रमांकावर व्हाट्सअप करावा लागतो.
उदाहरणार्थ, ज्या योजनेच्या माहितीसाठी संबंधित माहिती हवी आहे त्या योजने समोरील शब्द टाईप करून 9404396119 या नंबरवर व्हाट्सअप करा जसे की सूक्ष्म सिंचन योजनेची माहिती पाहिजे असेल तर pmksy टाईप करा यानंतर या योजने विषयी ची संपूर्ण माहिती तुमच्या व्हाट्सअप वर उपलब्ध होईल.
अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने सर्व शेतीविषयक योजनांची माहिती आता आपल्या मोबाईल वर उपलब्ध होत आहे.याचा सर्वानी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. खालील योजना ह्या उपलब्ध आहेत: १.मा. बाळासहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( SMART) (अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबर २०२०) २.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.
३.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत फळबाग लागवड. ४.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड. ५.फळपीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३. ६.प्रधानमंत्री पिक विमा – रबी हंगाम सन २०२०-२१ (मुदत -१५ डिसेंबर २०२०). ७.कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा (कर्जाच्या व्याजावर ३ टक्के सवलत)
८.प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उन्नयन योजना. ९.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना. १०.हरभरा व गहू बियाणे साठी अनुदान ( ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम २०२०-२१). ११.शेतीशाळा / पोकरा अंतर्गत शेतीशाळा. १२.डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन (सेंद्रिय शेती). १३.नवीन विहीर (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत.
१४.बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना. १५.शेततळे (पोकरा अंतर्गत). १६.ठीबक व तुषार सिंचन – (प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत) /(पोकरा अंतर्गत). १७.ट्रॅक्टर व इतर औजारे- (उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहीम SMAM अंतर्गत) / रा फ अ अंतर्गत. १८.सामुदायिक शेततळे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)/सामुदायिक शेततळे (पोकरा अंतर्गत).
१९.शेततळे अस्तरीकरण (रा फ अ अंतर्गत)/शेततळे अस्तरीकरण (पोकरा अंतर्गत). २०.पंप संच व पाईप लाईन साठी अनुदान/पंप संच व पाईप (पोकरा अंतर्गत). २१.रेशीम उद्योग (रेशीम संचालनालय मार्फत योजना)/रेशीम उद्योग (पोकरा अंतर्गत) २२.मधुमक्षिका पालन (रा. फ. अ. अंतर्गत)/मधुमक्षिका पालन (पोकरा अंतर्गत) २३.अळिंबी उत्पादन प्रकल्प (रा फ अ अंतर्गत).
२४.हरितगृह (रा फ अ अंतर्गत)/हरितगृह (पोकरा अंतर्गत). २५.शेडनेट (रा फ अ अंतर्गत)/शेडनेट हाऊस (पोकरा अंतर्गत). २६.मिनी दाल मिल. २७.बीज प्रक्रिया युनिट (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत). २८.गोदाम बांधकाम (रा अ सु अ कडधान्य अंतर्गत). २९.शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट यांना प्रकल्प उभारणी साठी मिळणारे अर्थसहाय्य (पोकरा अंतर्गत).
३०.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ३१.प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ३२.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. ३३.आत्मा अंतर्गत बचत गटांची नोंदणी. ३४.अभ्यास दौरा. ३५.आत्मा अंतर्गत अभ्यास दौरे – जिल्हा अंतर्गत/राज्यांतर्गत/आंतर राज्य. ३६.कृषि व संलग्न क्षेत्राची प्रात्यक्षिके (आत्मा अंतर्गत). ३७.आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण- जिल्हांतर्गत/ राज्यांतर्गत/आंतरराज्य. ३८.मिनी राईस मिल.
३९.एकात्मिक किड / रोग व्यवस्थापन. ४०.हरितगृह व शेडनेट मधील भाजीपाला व फुले लागवड राफअ अंतर्गत / (पोकरा अंतर्गत). ४१.संकलन प्रतवारी व पॅकिंग केंद्र (राफअ अंतर्गत). ४२. स्थायी / फिरते विक्री केंद्र (रा फ अ अंतर्गत). ४३.वातावरण नियंत्रित रिटेल बाजार (रा फ अ अंतर्गत). ४४.अपनी मंडी / ग्रामीण बाजार (रा फ अ अंतर्गत). ४५.रायपनिंग चेंबर (रा फ अ अंतर्गत). ४६.प्राथमिक प्रक्रिया केंद्र (रा फ अ अंतर्गत). ४७.शीतवाहन (रा फ अ अंतर्गत)
४८.नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळी आधुनिकीकरण (रा फ अ अंतर्गत). ४९.शीतगृह (नवीन, विस्तारीकरण, आधुनिकीकरण) (रा फ अ अंतर्गत). ५०.पूर्वशीतकरण केंद्र (रा फ अ अंतर्गत) – स्थायी/फिरते. ५१.एकात्मिक अन्नद्रव व्यवस्थापन. ५२.शीत खोली (स्टेजिंग) (रा फ अ अंतर्गत). ५३.एकात्मिक पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत). ५४.जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (रा फ अ अंतर्गत). ५५.प्लॅस्टिक मल्चिंग (रा फ अ अंतर्गत). ५६.कांदा चाळ (रा फ अ अंतर्गत).
५७.प्लॅस्टिक टनेल (रा फ अ अंतर्गत). ५८.हळद रोपवाटिका स्थापन करणे (रा फ अ अंतर्गत). ५९.पक्षी रोधक / गारपीट रोधक जाळी (रा फ अ अंतर्गत). ६०.पॅक हाऊस (रा फ अ अंतर्गत). ६१.नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा). ६२.नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत समाविष्ट गावांची यादी. ६३.विहीर पुनर्भरण (पोकरा अंतर्गत). ६४.गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट (पोकरा अंतर्गत).
६५.गोड्या पाण्यातील मत्स्यपालन (पोकरा अंतर्गत). ६६.परसबागेतील कुक्कुटपालन (पोकरा अंतर्गत). ६७.बंदिस्त शेळीपालन (पोकारा अंतर्गत). ६८.वृक्ष लागवड (वनशेती) (पोकरा अंतर्गत) / राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत. ६९.खाजगी रोपवाटिका परवाना. ७०.बियाणे खते कीटकनाशके विक्री परवाने.
७१.पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प. ७२.शेतकरी मासिक ७३.माती नमुने तपासणी. ७४. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना. ७५.कृषी विषयक पुरस्कार ७६.गट शेती. ७७.आत्मा. परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रिय शेती) राष्ट्रीय फलोत्पादन अभियान औषधी वनस्पती योजना.
कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – गळीत धान्य व तेलताड राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – कडधान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टीक तृणधान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान -कापूस सूक्ष्म सिंचन संच वितरक नोंदणी (PMKSY) कृषी निविष्ठा विक्रेते यांचे साठी पदविका अभ्यासक्रम (DAESI)
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेसाठी अर्थसाह्य पीक कापणी प्रयोग मार्गदर्शिका आदर्श गाव योजना पोकरा अंतर्गत बीजोत्पादन करणे साठी अनुदान गुणनियंत्रण बाबत मार्गदर्शक सुचना सन २०२०-२१ रासायनिक खतांचे दर / महाबीज बियाणे दर.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Khupch chan
Chan