मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. यामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्याचे एक टोपण नाव आहे आणि त्याचीच माहिती आज आपण आज घेणार आहोत.
महाराष्ट्र कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्हे महाराष्ट्रातील मोठी पैलवान तयार झालेली आहेत.
शूरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील सर्वात जास्त पुरुष आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न बघतात आणि ते होतात. शिक्षणाचे माहेरघर म्हणून महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यांमध्ये भारतातील मोठे शैक्षणिक संस्था उपलब्ध आहेत.
भारताचे प्रवेशद्वार आणि सात बेटांचे शहर म्हणून महाराष्ट्राच्या मुंबईची ओळख आहे. 52 दरवाजांचे शहर म्हणून महाराष्ट्रातील पूर्वीचे औरंगाबाद आणि सध्याचे छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याची ओळख आहे. तांदुळाचे कोठार म्हणून महाराष्ट्राचा रायगड जिल्ह्याची तर ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे.
कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते. ज्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असेही म्हटले जाते. साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. हा जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मुंबईचा गवळीवाडा म्हणजेच परसबाग आणि द्राक्ष जिल्हा अशी महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे.
संत्र्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याची ओळख आहे. जे ऑरेंज सिटी या नावानेही प्रसिद्ध आहे. केळीच्या बागाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. संस्कृत कविता जिल्हा म्हणून राज्यातील नांदेड जिल्ह्याची तर समाजसेवकांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याची ओळख आहे.
ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला तर गळीत धान्य यांचा जिल्हा म्हणून धुळे या जिल्ह्याला ओळखले जाते.हळदीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील हळद संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखले जाते. या मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात.
तर गोंड राजांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्याला ओळखले जाते. तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या टोपण नावाची माहिती जाणून घेतली आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात राहता? आणि तुमच्या इथे त्या भागाला काय म्हटले जाते? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..