आजकाल मराठी माणसांची वेगवेगळ्या माध्यमा मधून खूप फसवणूक केली जात आहे. मित्रांनो आज आपण ६ फसव्या कल्पना बघणार आहोत ज्याचा वापर करून मराठी माणसांना फसवलं जात आहे, गंडवला जात आहे, लुबाडला जात आहे.
१) अनेकदा आपण Youtube ला असे विडिओ बघत असतो आमच्याकडे अशी अशी मशीन आहे किंवा आमची हि मशीन घ्या आणि माल बनवा आणि आम्ही तो विकत घेऊ. या स्टेटमेंट ला काही अर्थ राहत नाही. त्यांची मशीन विकली जाणे हा त्यांचा विषय असतो. ते त्यांची मशीन विकतात आणि बाजूला होतात नंतर मात्र तो माल विकत घेणार कि नाही याची काही गँरंटी नसते.
आणि आपल्या माणसाला महिन्याला तुम्हाला लाख, दीड लाख मिळतील असा समजून त्यांचा गळ्यामध्ये त्या मशिन्स मारल्या जातात आणि नंतर आपल्याला प्रोडकशन चा अनुभव नाही, मार्केटिंग चा अनुभव नाही, व्यवसायाचा अनुभव नाही आणि मग ती वस्तू आपल्या गळ्यामध्ये पडते. हे सगळे प्रॉब्लेम होतात.
उदाहरणार्थ पूर्वी एक इमू पालनाचा मोठा फंडा आला होता. कि तुम्ही इमू घ्यायचा २०-३० हजार रुपयांना आणि त्याच अंड ४ हजार रुपयांना विकल जात. मराठी माणसाने ते पैसे लावले आणि नंतर कळलं कि इमू आणि ते अंड असला काही संबंध नाहीए. आता ते इमू जंगलामध्ये पण सोडू शकत नाही, खाता पण येत नाही, पाळता पण येत नाही आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तसंच आमची हि मशीन घ्याआणि आम्ही माल विकत घेऊ हि एक लोकांना फसवण्याचा आयडिया आहे.
२) दाम दुप्पट योजना: यामध्ये तुमचे पैसे १ वर्षांमध्ये, २ वर्षांमध्ये दुप्पट होतील असा म्हटलं जायचा. लक्षात घ्या जितका मोठा आमिष तितका धोका मोठा असतो. म्हणून अशी कुठली योजना असेल तर तिथे १००% तुमची फसवणूक होण्याच्या संध्या जास्त आहेत. अति घाई जीव जाई तसच अति लाभ मूळ भांडवलासोबत खराब हे गणित आपण समजून घ्यायला पाहिजे.
त्यामुळे १ वर्षांमध्ये, २ वर्षांमध्ये दाम दुप्पट होईल अशी कुठे योजना असेल तर अशा योजनांना थारा देऊ नका. अशा योजना जे तुमच्याकडे घेऊन येतात ते तुमचे जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक असतात आणि म्हणून आपण त्यांचा आश्वासनाना बळी पडला नाही पाहिजे. असे लोक पैसे कमावतात पण आपल्याला बुडवून पैसे कमावतात. म्हणून शहाणं राहणं खूप गरजेचं आहे.
३) MLM(मल्टि लेवल मार्केटिंग): यामध्ये तुम्हाला मोठया कार्यक्रमांना बोलावलं जात. तिथे सगळे त्यांचे भाड्याचे लोक तयार असतात ब्लेझर वगरे घातलेले आणि त्या सगळ्या लोकांना ट्रेन केलेला असता कि मी एवढे करोड कमावले तेवढे कमावले सांगायला. अशा MLM मधून लोकांची फसवणूक होत असते.
५ हजार, १० हजार ची वस्तू त्यांच्या गळ्यामध्ये मारली जाते, मग तुम्ही २ मेंबर करा, ४ मेंबर करा त्यांना फसवा आणि मग चैन बायनरी प्लॅन चालत राहणार आणि तुम्हाला घरी बसून मरेपर्यंत पैसे मिळणार असे सांगणारे लोक असतात. सगळ्याच कंपन्या फसवतात असा नाही पण काही कंपन्या खूप चांगला काम करतात आणि त्यांची स्टॅबिलिटी हि चांगली असते. हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक आहेत कि ज्यांना MLM मधून यश मिळत, किंवा त्याची कंपनी शेवटपर्यंत टिकते, काम करते. नाहीतर काही कंपन्या नवीन नवीन मार्केट मध्ये येतात आणि थोड्या दिवसांनी गायब होतात.
४) पेपर मध्ये सोपा प्रश्न विचारून kbc च्या नावाने Lucky draw होत असल्याचा भासवलं जात व तुम्ही जिंकलेली गाडी किंवा परदेश हॉलिडे चे आमिषं दाखवून टॅक्स चा नावाखाली तुम्हाला फसवलं जात. उत्तर दिल्या नंतर आपल्याला कॉल येतो कि तुम्हाला अमुक तमुक बक्षिस मिळालं आहे. खरंतर त्यांनी टॅक्स स्वतः भरला पाहिजे पण ते तो टॅक्स आपल्याला भरायला सांगतात. टॅक्स चा नावाखाली ते आपल्याकडून ३०-३५ हजार, १ लाख पैसे घेतात आणि नंतर त्यांचा नंबर, व्हाट्सअँप नंबर बंद करून टाकतात आणि कंपनी पण बंद होऊन जाते.
५) तुम्हाला डायरेक्ट बँके सारखा SMS येत असतो मग ते त्या मध्ये OTP विचारतात आणि काही लोक SMS समजून त्याला उत्तर देतात आणि ते आपल्याला खूप महाग पडू शकत. खरा तर Youtube, Facebook, Whatsapp या गोष्टींचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने business साठी करता येतो पण खूप लोकांनी याचा उपयोग लोकांना फसवण्या साठी केला आहे. त्यामुळे कोणत्याही अमिषाला बळी पडून आपला OTP कोणाला देऊ नका.
६) ऑनलाईन होणारी मैत्री ही फसवी असते. फेसबुक वरचे खूप प्रोफाइल हे खोटे असतात, अकाउंट्स बोगस असतात. आपले गुपित कोणाला सांगू नका. सुंदर मुलींचा फोटो ठेवतात व तुम्हाला फ्रेइन्ड request पाठवतात. २ ३ दिवस बोलण्या झाल्या नंतर मी जरा अडचणी मध्ये आहे असा म्हणून तुमचा कडून पैसे उकळले जातात व नंतर लक्षात येत कि आपण त्यांचा सोबत बोलत आहे ती मुलगी नसून मुलगा आहे किंवा मुलगी खोटी आहे.
असाच तो सिलसिला चालू राहतो. अशा खूप केसेस होतात आणि मराठी माणसाला गंडवण्याच्या हे जे काही फंडे लोकांनी काढले आहेत त्यापासून सावध रहाव. आपल्या कष्टाचे पैसे आहेत आणि म्हणून ते असे कोठेही वाया घालू नये.
Superb Mast Mahiti. Thanks a Lot.