भारतातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोणते? जाणून घ्या!!

बातम्या

मित्रानो तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या भारत देशातील 18 व्या लोकसभेमध्ये 543 पैकी तब्बल 504 खासदार कोट्यावधीचा आहेत. म्हणजे जवळपास 93% खासदार आरती लोकसभेमध्ये कोट्यावधी आहेत. 2014 आणि 2019 संसदेतील तुलनेत कोट्यावधी खासदारांची संख्याही वाढलेली आहे. 2014 मध्ये संसदेत 82% तर 2019 मध्ये 88% खासदार कोट्यावधी होते. अशातच आज आपण 18 व्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत पाच खासदारांची माहिती जाणून घेणार आहोत.

◆ ज्योतिरादित्य सिंधिया : 18 व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा 5 वा क्रमांक लागतो. भारतीय राजकारण्यांनी आणि संस्थानाचे शासक जिवाजीराव सिंदिया यांचे नातू आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्यप्रदेश राज्याच्या कोणार्क शहरांमधून निवडून आले. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात यानुसार 424 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती.

◆ प्रभाकर रेड्डी : 18 भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये प्रभाकर रेड्डी यांचा चौथा क्रमांक लागतो. हे एक भारतीय राजकारणी आणि व्हीपीआर मायनिंग इन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. तेलगू देसम पार्टीचे प्रभाकर रेडी आंध्र प्रदेश मधील एका लोकसभा मतदारसंघातून केली आहेस. यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात यानुसार 716 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती.

◆ नवीन जिंदाल : भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये नवीन जिंदाल यांचा तिसरा क्रमांक लागतो. हे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत. भारतीय जनता पक्षाचे 54 वर्षी जिंदल हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्री जिंदाल यांचे पुत्र आहेत. नवीन जिंदाल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रत्येक पत्रकानुसार 1230 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती.

◆ कोंडा विश्वेश्वर रेड्डी : 18 व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो. जे भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध आयटी उद्योग आहेत. भारतीय जनता पक्षाचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे तेलंगणातील एका मतदारसंघातून विजयी झाले आहेत. कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात यानुसार 4068 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती.

◆डॉक्टर चंद्रशेखर पेमासन्नी : 18 व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये डॉक्टर चंद्रशेखर पेमासन्नी याचा पहिला क्रमांक लागतो. हे एक भारतीय राजकारणी आणि एका ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म संस्थापक आहेत. म्हणजे तेलगू देसम पार्टीचे डॉक्टर चंद्रशेखर पेमासन्नी यांनी हे आंध्रप्रदेश मधील एका लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत. डॉक्टर चंद्रशेखर पेमासन्नी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनुसार 5700 कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती.

तर आज आपण 18 व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत 5 खासदारांची माहिती जाणून घेतली आहे. या लोकसभेमधील तुमचा आवडता खासदार कोणता आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..