दुष्काळ घोषित तालुके यादी व दिला जाणारा लाभ पहा…

बातम्या

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. त्यासंदर्भामध्ये मित्रांनो आज दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा जीआर सुद्धा प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे कोणकोणती आहे आणि तसेच तालुक्यामधील नागरिकांना कोण-कोणता लाभ शासनाकडून दिला जाणार आहे, याबाबत या सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय या ठिकाणी आपण या जीआरमध्ये पाहूया..

घेतलेला निर्णय राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूर संवेदक विषयक, निकष वनस्पती निर्देशांक, मृदू आद्रता, पेरणी क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावी तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन या शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट अ दर्शिवलेल्या माहितीनुसार 15 जिल्ह्यात 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करत आहे.

दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या तालुक्‍यांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात तेथील नागरिकांना आता खाली या ठिकाणी दिलेल्या सुविधा आहे त्याचा लाभ या ठिकाणी शासनाकडून दिल्या जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिली सुविधा जमीन महसूलात सूट या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल.

त्यानंतर शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येईल. त्यानंतर कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट देण्यात येईल. त्यानंतर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानंतर रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकचा वापर हा सुरू करण्यात येईल. त्यांचे जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे हा सुद्धा या ठिकाणी देण्यात येईल.

सदर तालुक्यातील खातेदारांना कृषिविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय राहील. सदर निविष्ठा अनुदान हे कोरडवाहू पीक 29 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुज्ञेय राहील. सदर मदतीचे वाटप सन 2023 च्या खरीप हंगामातील सातबारा मधील पिकाच्या नोंदीच्या आधारे करण्यात येईल. प्रमुख पीक नसलेल्या आणि पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहु पिकांना सुद्धा मदत अनुज्ञेय राहील. बहुवार्षिक फळपिके आणि बागायती पिकाचे निकष ठरवाला जाईल.

फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्याचा निकळत सातबारामध्ये नोंद असणे आवश्यक आहे. नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामा हा निकष असेल. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामध्ये शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना निर्णय आणि सुट्टीच्या कालावधीत देखील करण्यात यावी. तसेच माध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना देण्यात यावे.
सण 2023 खरीप हंगामातील दुष्काळ तालुक्याची यादी..

या ठीकाणी जिल्ह्याचे नाव दिलेला आहे, त्यानंतर गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित केलेले तालुके आहेत त्यानंतर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके यादी दिलेले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार हा तालुका गंभीर स्वरूपाच्या म्हणून घोषित केलेला आहे. धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा तालुका मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव, त्यानंतर बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार, त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा त्यानंतर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी नगर, सोयगाव.

त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव, सिन्नर, येवला त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके म्हणून पुरंदर, सासवड, बारामती त्यानंतर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके म्हणून शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, धारूर, आंबेजोगाई. त्यानंतर जिल्ह्यामध्ये रेनापुर. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी तसेच धाराशिव, लोहारा त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला.

तसेच मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून करमाळा, माढा त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ म्हणून वाई, खंडाळा, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून हातकलंगले, गडींगग्लज, त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपच दुष्काळ म्हणून शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज इत्यादी तालुक्यांमध्ये याठिकाणी शासनाकडून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. या तालुक्यांची यादी मध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. जसे शासन घेण्यात येतील तसे आपले त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्यात येईल..