गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे? गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा घेण्या योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क तर नाहीये? गुंठेवारी प्लॉट पाडण्यासाठी काय करावं लागत? आणि पाडलेल्या गुंठेवारीचा सातबारा कोणाच्या नावावरती असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या !

Uncategorized लोकप्रिय शेती शैक्षणिक

सर्वप्रथम पाहूया की गुंठेवारी काय आहे? गुंठेवारी म्हणजे काय? आत्ता या बाजू आपण नॉन अग्रीकल्चर गुंठेवारी आणि एन ए प्लॉट हा वेगळा आहे याला एकत्र आपण आणत नाहीये. गुंठेवारी प्लॉट विषयी आपण सर्व प्रथम बोलूया. गुंठेवारी म्हणजे काय तर समजा माझ्याकडे एक एकर जमीन आहे किंवा २० गुंठे जमीन आहे. ती सिटी च्या लगत आहे किंवा गावाच्या लगत आहे.

मी काय करणार, मी मध्ये रोड पाडणार आणि माझ्या सोयी नुसार किंवा जसा प्लॅन बसतो त्या पद्धतीच्या प्लॅननुसार मी रोड काढणार मध्ये आणि समजा एक एक गुंठ्याचा, दीड हजार स्केवर फूट किंवा दोन हजार स्केवर फूट चा असे गुंठेवारी प्लॉट काढणार. आणि ते प्लॉट करून मी मार्केट मध्ये विकायला काढणार.

विकायला काढणं, विकणं किंवा विकत घेणं यामध्ये विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला ह्या गोष्टी सोयीच्या आहेत पण गव्हर्नमेंट ने यावर बंदी घातलेली आहे. गव्हर्नमेंट ने बंदी अशी घातलेली आहे की शेतीचे तुकडे होऊ नयेत. एका माणसाने ११ गुंठ्यापेक्षा कमी जमीन ही दुसऱ्याला विकता येत नाही किंवा त्याच्या नावावर ही होत नाही. ते रेजिस्ट्रेशन होत नाही.

तुम्ही विकत घ्यायला गेले तर होत नाही. अगोदर काय व्हायचं, २०१२ च्या अगोदर की सर्व गुंठेवारी जमीन घेते वेळी चार पाच जण यायचे, दोन दोन हजार स्केवर फीट ची जागा असे पाच जण मिळून अकरा गुंठे किंवा बारा गुंठे किंवा तेरा गुंठे असे बरेचसे लोक येऊन घ्यायचे आणि एकाला मूळ मालक कडून बाकीच्यांच्या सातबारा वरती नाव ओढायचे. पण अत्ता तेही बंद झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला ही जमीन अशी घेता येत नाही.

सर्वप्रथम गुंठेवारी म्हणजे काय आणि गुंठा कसा पाडला जातो हे आपण बघितलं. आत्ता गुंठेवारी प्लॉट घेणं हे कितपत योग्य आहे? गुंठेवारी प्लॉट घेणं हे माझ्या दृष्टीकोनातून योग्य नाही. कारण, गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा तुमच्या नावावरती सातबारा हा कधीच होत नाही. आत्ता ही एक बातमी खरी आहे की जे २०१२ च्या अगोदर जेवढे गुंठेवारी मध्ये प्लॉट घेतलेले आहे त्यांना गव्हर्नमेंट ने सवलत दिलेली आणि काही प्रमाणात टॅक्स भरून त्या पद्धतीने त्याच एन ए प्लॉट मध्ये रूपांतर केलेलं आहे.

एन ए प्लॉट म्हणजे काय आहे तर नॉन अग्रीकल्चरल प्लॉट. नॉन अग्रीकल्चरल म्हणजे बिन शेती असलेला प्लॉट म्हणजे काय तर तिथे तुम्ही घर बांधू शकता त्यांच्या एफ एस आय प्रमाणे, तिथे उद्योग सुरू करता त्याला एन ए प्लॉट म्हणतो आपण. तर एन ए प्लॉट जो नसतो तो गुंठेवारी. तर गुंठेवारी घेणं अयोग्य का आहे, तर सातबारा तुमच्या नावावर कधीच होत नाही.

दुसरी गोष्ट, तुमचा तो मालक फिरणार आहे तुमच्या सोबत त्याच रेजिस्ट्रेशन होत नाही. नोटरी वरती ती जागा तुम्ही विकत घेता. नोटरी ही मान्य नसते. योग्य खरेदी होत नाही हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय तर समजा तुम्ही घेतलेल्या जागेवरतीच उद्या चालून तिथे रोड आला. टाऊन प्लानिंगनुसार चेंज होत असत.

तिथे रोड आला तर त्या मध्ये तुमचा गुंठेवारी मध्ये घेतलेला प्लॉट जाऊ शकतो. आणि एन ए प्लॉट का जाऊ शकत नाही कारण एन ए प्लॉट हा टाऊन प्लानिंग मध्ये समाविष्ट असतो त्याच्यामुळे एन ए प्लॉट हा सुरक्षित असतो. समजा तुमचा गुंठेवारीच्या प्लॉट वरती तिथे रिझर्वेशन आलं.

गव्हर्नमेंट चा काहीतरी ऍमिनिटी स्पेस चा एरिया आला, तिथे गव्हर्नमेंट ऑफिस उघडायचा असेल तर गव्हर्नमेंटच्या प्लानिंगनुसार तुमची जमीन धोक्याची असू शकते आणि तुमच्याकडे ठोस सबुत हा काहीच नसतो. आत्ता तुम्ही म्हणाल की बरेचसे लोक घेतात गुंठेवारी जागा, घर बांधतात आणि राहतात तिथे. पण तिथे राहिले तरी उद्या चालून तिथे रिस्कच आहे लिगली. तर या गोष्टी मुळे मी तुम्हाला सजेस्ट करिन की गुंठेवारीचे प्लॉट घेणं योग्य नाही.

आत्ता गुंठेवारी पाडणाऱ्याचा काय लॉस आहे किंवा फायदा आहे? गुंठेवारी पाडणाऱ्याला काहीही लॉस नाही आणि फायदा भरपूर आहे. तो गुंठेवारी मध्ये तुम्हाला प्लॉट पण विकतोय आणि मुळ सातबारा हा त्याच्याच नावावरती राहतो. तुमच्या नावावरती सातबारा हा कधीच होऊ शकत नाही.

तर मित्रांनो, आत्ता दुसरा मुद्दा आहे की जे गुंठेवारी चे प्लॉट विकणारे लोक असतात ते म्हणतात की एन ए प्लॉट हा लवकरात लवकर होणार आहे. होणार आहे आणि त्याची किंमत कमी असते म्हणून आपण त्याच्या अमिषापोटी जाऊन ती घेत असतो. तर गुंठेवारी मध्ये प्लॉट घेतेवेळी जर तुम्ही एन ए प्लॉट जर होत असेल तर माझं तुम्हाला सजेशन असं राहील की त्याच्या मध्ये तुम्ही काही टोकन अमाउंट द्या,

५०% अमाउंट द्या आणि एन ए झाल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण रक्कम देऊन तुमच्या नावाने लिगली हे करू शकता पण गुंठेवारीच एन ए मध्ये रूपांतर करताना टाऊन प्लानिंग ही एक गोष्ट आहे, सरकार ने आत्ता लॉन्च केलेली आहे, त्यानुसार तुम्हाला त्याचे सर्व कागदपत्राची आणि त्याच्या आराखड्या मध्ये बसण्यायोग्य गुंठेवारी झालेली असेल तर त्याला मान्यता मिळते तर हा एक मुद्दा आहे. तर मित्रानो,

२०१३च्या अगोदरचे जे गुंठेवारीमध्ये प्लॉट होते ते सर्व एन ए प्लॉट मध्ये कन्व्हर्ट केले आहेत. पण आत्ता २०१३ पासून आत्तापर्यंतचे जे व्यवहार होत आहेत, त्याच्यासाठी भरपुर गव्हर्नमेंटचे स्ट्रिक्ट ऍक्शन घेणारे नियम निघालेले आहेत. तर विचार करून तुम्ही तुमचा प्लॉट घ्या किंवा तुम्ही तुमचा प्लॉट विका.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

5 thoughts on “गुंठेवारी प्लॉट आणि NA प्लॉट मध्ये फरक काय आहे? गुंठेवारी पाडलेला प्लॉट हा घेण्या योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क तर नाहीये? गुंठेवारी प्लॉट पाडण्यासाठी काय करावं लागत? आणि पाडलेल्या गुंठेवारीचा सातबारा कोणाच्या नावावरती असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या !

 1. अच्छी जानकारी है|
  कृपया मुझे बताये की दो अलग अलग ले-आउट के बीच से जो गाडर रोड होता है,या ले-आउट होने से पहले जो खेतो के बीच रास्ते होते है जो ले-आउट होने के बाद ले आउट के मुल आकर की गणना मे नहीं आते ऐसी जमीन का कौन मालक होता है |ऐसी जमीन पर अतिक्रमण हो तो उस जमीन से लगे प्लॉट धारक कहां शिकायत करें? और कैसे शिकायत करें?
  कृपया मार्गदर्शन करें

 2. एन ए प्लॉट घेतला तर घरपट्टी आणि महसूल दर वर्षी भरावा लागतो ,आणि गुंठे वार घेतला तर जागा नावावर नाही झाली तरी , बांधलेलं घर तुमच्या नावे होऊ शकते , म्हणजे घरपट्टी घेणाऱ्याच्या नावे असते ,भविष्यात सरकार ला कर हवा असेल तर दंड प्रकरण करून जागा घेणाऱ्याच्या नावे होऊ शकते , फक्त जमीन घेताना ती जमीन विकणाऱ्या ची आहे हे खात्री करून घ्या.

  1. नाही. घरपट्टी नोंदीकरिता मालमत्ता हस्तांतरण सादर करताना नगरपालिका फक्त नोंदणीकृत मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रेच स्वीकारतात. नोंदणीकृत कागदपत्रे नसतील तर अनधिकृत शास्ती लावून घरपट्टी लावली जाते, ज्यामुळे शासनाकडे तुमची मालमत्ता ही अनधिकृत आहे, अशी नोंद होते.

 3. फ्लैटची गूँठेवारी होऊ शकते का ?
  एखादी बिल्डिंग चे वरचे मजले अनओथोराईसड़ असतील व त्यामुळे त्या बिल्डिंग मधली औथोराईसड़ फ्लैट ची विक्री करायची असेल तर त्यांची गुन्ठेवारि करून विक्री होते का?

 4. आम्ही एका व्यकतीला 1994दीड गुंठा प्लाॅट विकला होता तो पहीला गुंठा खरेदीदार होता त्यामुळे त्यांने माझ्या शिल्लक ठेवलेल्या जागेची नोंद ग्रामपंचायत ला स्वताची ८अ ऊत्तार्यावर दोन गुंठे लावली 2002च्या दरम्यान व त्याने ज्यावेळी 2016ला त्या जागेवर बांधकाम करतानी मी अडवले असता त्याने मला ग्राम पंचायती बांधकाम परवानगी २गुंठे दिली व मी पोलीस तक्रार पण केली ग्रामपंचायत जिल्लहा परिषद ला आत्ता पर्यंत ती नोंद दुरुस्त करणे करीता भरपुर तक्रारी अर्ज केले पण प्रतीऊत्तर मीळेणा मग काय करावे .
  कृपया उपाय सुचवा ..

Comments are closed.