मित्रांनो, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही अशा बऱ्याच जणांना वाटते की आपल्याकडे शेत जमीन असावी. त्याचप्रमाणे जे शेतमजूर दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करतात अशा शेतमजुरांना देखील वाटत असते की आपल्याकडे आपली स्वतःची शेतजमीन असावी.
त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शेतीक्षेत्र कमी आहेत अशा शेतकऱ्यांना जर आणखी शेतजमीन घ्यायची असेल तर सर्वात मोठी अडचण असते, ती जमीन घेण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते पण जर तुमच्याकडे शेतजमीन घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर चिंता करण्याचे गरज नाही,
कारण की स्टेट बँक ऑफ इंडिया ची लँड परचेस स्कीम की तुमच्यासाठीच आहे. तर मित्रांनो जर तुम्ही शेतजमीन विकत घेण्यासाठी कर्ज घेत असाल, त्यासाठी अर्ज करत असाल, तर बँक तुम्हाला शेत जमीन विकत घेण्यासाठी शेत जमिनीच्या किमतीच्या 85 टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून देते. आपण या स्कीमम बद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
या स्कीम चा लाभ कुणाला मिळेल?: या स्कीम च्या शर्ती आणि अटी आहेत त्या काय आहे? याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. तर मित्रांनो या योजनेत बँकेकडून शेतजमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर बँक आपल्या जमिनीचे आकलन करते
व त्या जमिनीच्या किमतीच्या 85 टक्के रक्कम कर्ज म्हणून देते, तर शिल्लक असलेले 15 टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. या योजनेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी नऊ ते दहा वर्षांची मुदत दिली जाते. बँकेचे पूर्ण कर्ज फेडल्यानंतर जमीन तुमच्या मालकीची होते.
योजनेचे उद्दिष्ट: एसबीआय लँड परचेस स्कीमचा उद्देश हा आहे की छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे किंवा ज्यांच्याकडे शेती करणे योग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यासाठी मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी एक अट आहे ती म्हणजे अर्जादारावर कोणत्या दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.
या योजनेसाठी अर्ज कोण करू शकते ते पहा: ज्या लोकांकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे तसेच 2.5 एकर सिंचित जमीन असणारे एसबीआय लँड परचेस योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात. याशिवाय इतरांच्या शेतात काम करणारे भूमिहीन लोक सुद्धा यासाठी अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षांचा कर्जफेडीची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर विचार करू शकते, पण त्यांच्यावर इतर बँकांचे कर्ज असू नये.
या स्कीम मधून मिळणारे लाभ: या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर बँक खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीच्या किमतीचे आकलन करते व शेतजमिनीच्या एकूण किमतीच्या 85 टक्के रकमेचे कर्ज बँक देते तर आपल्याला फक्त 15 टक्के रक्कम द्यावी लागते.
कर्ज जेव्हा पर्यंत फेडले जात नाही त्या काळापर्यंत जमीन बँकेच्या नावावर राहील. त्यानंतर कर्ज फेडल्यानंतर ती तुमच्या मालकीची होईल. विशेष म्हणजे या योजनेत आपल्याला एक ते दोन वर्षे मोफत मिळतात. जमीन शेतासाठी तयार केलेली नसेल तर त्याला तयार करण्यासाठी दोन वर्ष बँक आपल्याला मोफत देत असते.
तर जमीन आधीपासून विकसित असेल तर त्यासाठी बँक तुम्हाला एक वर्ष मोफत देते. हा काळ संपल्यानंतर आपल्याला सहा महिन्यात हप्ता द्यावा लागतो कर्ज घेणारा व्यक्ती हा नऊ ते दहा वर्ष रिपेमेंट करू शकतो. अशाप्रकारे मित्रांनो एसबीआय लँड परचेस स्कीम बद्दलची माहिती होती.
तुम्हालाही जर शेतजमीन विकत घ्यायची असेल तर एकदा या योजनेचा विचार नक्की करा. SBI च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही वरील माहिती बघू शकता त्यासाठी आपल्या फोन मध्ये SBI land purchase scheme असे टाईप करावे. अधिक माहितीसाठी जवळील SBI बँकेत जाऊन माहिती घ्यावी ! सदर लेख हा नवीन घडामोडी या युट्युब चॅनेल वरून संकलित कला आहे.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
I have to purchase the land in kangaon dist wardha tal hinganghat 20acor arricaated land form my cousin uncle i will give 15% deposit of land pl do And guide me for further process
खुपच छान माहिती मिळाली 🙏 धन्यवाद