जीवामृत म्हणजे काय? ।। ते कशासाठी वापरतात ।। ते कसे बनवायचे याबद्दल अतिशय महत्वाची माहिती !

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो ,आज आपण जीवामृत म्हणजे काय? ते कशासाठी वापरतात व ते कसे बनवायचे ते पाहू. आपल्या पैकी बऱ्याच जणांना जीवामृत बद्दल काहीच माहीत नाही आणि म्हणूनच आज त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. जीवामृत हे फवारणी साठी वापरलं जातं त्याच 1 एकर साठीचे प्रमाण पुढील प्रमाणे:

200लिटर पाणी+10 किलो देशी गायीचे शेण+5 -10लिटर देशी गायीचे गोमूत्र+1किलो गूळ किंवा 4 लिटर उसाचा रस +1किलो बेसन+1 मूठ बांधावरची जिवाणू माती.जिवाणूंची माती म्हणजे अशी माती त्या मध्ये जिवाणूंच प्रमाण जास्त असत ,त्यासाठी कोणतीही माती घेऊ नये ,वडाच्या झाडाखालील त्याच्या मुळाजवळची जी माती असते त्यात जिवाणूचे प्रमाण जास्त असते.

हे मिश्रण काठीने किंवा हाताने एकत्र करून घ्यावे व ड्रम च्या तोंडावर गोणपाट झाकून 48 ते 72 तासांसाठी सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ असे दोनदा काठीने ढवळावे. महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना 200 ते 400 लिटर जीवामृत द्यावे.जीवामृत वापरण्याचा कालावधी हा 7 दिवसांचा आहे. म्हणजेच ते तयार केल्यापासून 7 दिवसांच्या आत ते वापरायचं आहे, नाहीतर पिकांवरील त्याचा परिणाम हा हळू हळू कमी होत जातो.

जीवामृत म्हणजे काय?: जीवामृत हे एक विरजन आहे, ज्याप्रमाणे दही बनवताना दुधामध्ये दह्याच विरजन घातलं जात त्याचप्रमाणे जीवामृत बनवताना त्या मध्ये जिवाणू मिसळले जातात जे पिकांना बुरशी, कीड ,तसेच अनेक रोगांपासून वाचवतात त्यामुळे ते एक अत्यंत चांगले असे बुरशी नाशक, विषाणू नाशक आहे, त्याच्या वापरामुळे जिवाणू आणि किटाणूंचा पीकांवरील प्रभाव आटोक्यात आणता येतो.

कोणत्याही झाडाने एक चौरस फूट पान प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सूर्यप्रकाशातून कणांच्या रूपात एक दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते.सोबतच मुळांनी जमिनीतून घेतलेल्या पाण्याची व पानांनी घेतलेल्या कार्बआम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती होते, संध्याकाळी त्या अन्नाची विल्हेवाट लावली जाते त्यापैकी काही अन्न मुळावाटे जमिनीतील जिवाणूंना खाऊ घातले जाते.

काही अन्न श्वसनासाठी खर्च होते ,काही अन्न दुसर्या दिवशीच्या झाडांच्या वाढीसाठी खर्च होते व शिल्लक राहिलेले अन्न पानांचे पोषण ,शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते किंवा खोडामध्ये साठविले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25 ग्रॅम फळाचे टनेज मिळते जेव्हा आपण एक चौरस फूट पानात 4.5 ग्राम अन्ननिर्मिती करतो.

तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्राम फळांचे टनेज मिळते हा टनेज आपल्याला एक चौरस फुट पानावर जमा होणारी 12.5 कॅलरी सूर्य ऊर्जा होय. ह्या सगळ्यांचा सारांश सांगायचा झाला तर थोडक्यात असे की जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेज देखील जास्त मिळते.दुप्पट म्हणजे जी नैसर्गिक वाढ आहे त्यापेक्षा जास्त पानांचा आकार आपण करू शकत नाही परंतु जी लहान पाने आहेत त्यांचा आकार आपण सुदृढ झाडांच्या पाना इतका करू शकतो.

त्याच्यामुळे आपल्याला टनेज म्हणजेच उत्पादन देखील जास्त मिळू शकते आणि पानांचा आकार वाढवण्यासाठी जे हार्मोन्स आवश्यक असतात ते हार्मोन्स जिवामृता मध्ये असतात त्याचा वापर केल्याने पिकांमध्ये त्याचा परिणाम हा आपल्याला दिसून येतो. कधी कधी काय होतं की जास्त पाऊस झाल्यानंतर किंवा पिकांना पाणी दिल्यानंतर मुळा जवळच्या सगळ्या पोकळ्या पाण्याने भरून जातात.

त्यामुळे पोकळ्यामधील हवा निघून जाते व जिवाणूंना व मुळाना प्राणवायू मिळत नाही व पीकं पिवळी पडतात कारण जमिनीतून नत्राचा पुरवठा थांबलेला असतो अशावेळी झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये अँसेटो डायझोट्रॉपिक्स जिवामृता ची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अँसेटो डायझोट्रॉपिक्स पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जिवाणू खेचून घेतात पांनाना खनिज उपलब्ध करतात.

आपण जिवाणूंची नावे ऐकली असतील तर नत्र विरघळणारे जिवाणू पालाश विरघळणारे जिवाणू स्फुरत विरघळणारे जिवाणू हे सर्व जिवामृता मध्ये असतात जीवामृतामध्ये जमिनीतील नत्र विरघळणाऱ्या जिवाणूंची संख्या वाढते परिणामी खतांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर केला जातो. तर आता आपण कोणत्या झाडांना किती प्रमाणात जीवामृत वापरायचं, फळझाडांना किती वापरायचं, नवीन फळझाडांना किती वापरायचं.

भाजीपाला असला तर किती वापरायचं खरीप पिके असेल तर किती वापरायचं याचा प्रमाण खाली दिल्याप्रमाणे आहे. पहिल्या वर्षी: पहिले सहा महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड व नंतरचे सहा महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड. दुसऱ्या वर्षी: प्रति झाड एक ते दोन लिटर जीवामृत. तिसऱ्या वर्षी: प्रति झाड दोन ते तीन लिटर जीवामृत. चौथ्या वर्षी: प्रति झाड चार ते पाच लिटर जीवामृत.

पाचव्या वर्षी: प्रति झाड पाच ते दहा लिटर जीवामृत व त्यानंतर पाच लिटर प्रति झाड हे प्रमाण कायम राहील. तुमची जमीन जर जिवंत म्हणजे लाईव्ह असेल तर त्या मधून मिळणारे उत्पादन हे देखील जास्त असतं आता लाईव्ह म्हणजे काय तर कोणत्याही जमिनीत जिवाणूंची संख्याही भरपूर प्रमाणात असते परंतु आजकाल जी रसायने आपण वापरतो त्यामुळे ही जिवाणूंची संख्या कमी होत जाते आणि जमीन निकस होत जाते जिवामृताच्या वापरामुळे त्या जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते व उत्पादन देखील वाढते.

भाजीपाला पिकासाठी फवारणी प्रति एकर. पहिली फवारणी: पेरणीनंतर एक महिन्याने 100 लिटर पाणी + पाच लिटर गाळलेले जीवामृत. दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या दहा दिवसांनी 100 लिटर निमास्त्र किंवा 100 लिटर पाणी+ तीन लिटर दशपर्णी अर्क. तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या दहा दिवसांनी 100 लिटर पाणी+ 2.5 लिटर आंबट ताक.

चौथी फवारणी: तिसऱ्या फवारणीच्या दहा दिवसांनी दीडशे लिटर पाणी+ दहा लिटर गाळलेले जीवामृत. पाचवी फवारणी: चौथ्या फवारणीच्या दहा दिवसांनी 150 लिटर पाणी+ पाच लिटर ब्रह्मास्त्र किंवा 150 लिटर पाणी+ पाच ते सहा लिटर दशपर्णी अर्क. सहावी फवारणी: पाचव्या फवारणीच्या दहा दिवसांनी 150 लिटर पाणी+ चार लिटर आंबट ताक.

सातवी फवारणी: सहाव्या फवारणीच्या दहा दिवसांनी दोनशे लिटर पाणी+ वीस लिटर गाळलेले जीवामृत. आठवी फवारणी: सातव्या फवारणीच्या दहा दिवसांनी दोनशे लिटर पाणी+ सहा लिटर अग्निस्त्र किंवा 200 लिटर पाणी+ आठ ते दहा लिटर दशपर्णी अर्क. शेवटची फवारणी: आठव्या फवारणीच्या दहा दिवसांनी दोनशे लिटर पाणी+ सहा लिटर आंबट ताक किंवा 200 लिटर सप्तधान्यांकुर अर्क.

नवीन फळबागांसाठी: प्रमाण प्रती एकर. पहिली फवारणी: कलम लावल्यानंतर एक महिन्यांनी शंभर लिटर पाणी+ पाच लिटर जीवामृत. दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीनंतर एक महिन्यांनी 150 लिटर पाणी+ दहा लिटर जीवामृत. तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीनंतर एक महिन्यांनी दोनशे लिटर पाणी+ वीस लिटर जीवामृत. व पुढील फवारण्या याच प्रमाणात ठेवाव्यात.

प्रतिमहा दोनशे लिटर पाणी 20लिटर जीवामृत व पाणी हे नेहमी दुपारी बारा वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या बाहेर द्यावे रासायनिक खतांच्या वापरामुळे जीवांची संख्याही कमी होत जाते ,जीवामृताच्या वापरामुळे जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. आता या जिवामृता मध्ये बेसन किंवा गुळाचा वापर का केला तर त्या जिवाणूंना खाद्य आवश्यक असतं नुसत्या हवेवर ते जगू शकत नाही.

त्यामुळे त्यांना सुक्रोज आणि ग्लुकोज ची आवश्यकता असते ते त्यांना गुळातून किंवा उसाचा रसातून मिळतं, बेसन पिठा मधून देखील जास्तीत जास्त प्रमाणात अन्न शोषण ते करतात यामुळे जिवाणूंची संख्या ही दुपटीने वाढते आणि जेवढ्या प्रमाणात जिवाणूंची संख्या वाढेल तेवढ्या प्रमाणात आपल्या जीवामृताचा फायदा देखील जास्त होतो व उत्पन्न वाढीस मदत होते.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जीवामृत तयार केल्यापासून सात दिवसांच्या आत ते वापरावे कारण की काय होतं शेतकरी मोठ्या परिणामकारक रीतीने जीवामृत तयार करतो परंतु काही कारणास्तव किंवा काही मजुरांच्या कमतरतेमुळे जर जीवामृत वापरण्यास वेळ झाला तर त्याचा परिणाम हा कमी दिसू शकतो म्हणून जीवामृत बनविल्या पासून जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत ते वापरल्यास त्याचा फायदा जास्त होतो