प्लॉट खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे? ।। सर्वांगीण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण दैनंदिन जीवनात अनेकजण प्लॉट खरेदी करतात, पण प्लॉट विकत घेताना आपण कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? ते आपण आज इथे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण खरेदी करीत असलेल्या प्लॉटचे प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच सातबाराचा उतारा अथवा सीटीएस उतारा पाहणे गरजेचे आहे. आपण ज्या व्यक्तीकडून प्लॉट मिळकत खरेदी करतो ती मिळकत विद्यमान मालकाचे नाव आहे किंवा नाही? याची शहानिशा करणे आवश्यक आहे.

सातबारा वर गोल वर्तुळात नमूद केलेले फेरफार वाचणे आवश्यक आहे. कारण फेरफार उतारा यावरून सदर मिळकतीचा इतिहास आपल्याला समजतो. वेळोवेळी झालेली खरेदी गहाण व इतर व्यवहार याची माहिती आपणास समजते. हा मिळकतीचा आरसाच असतो. सातबारावरील इतर अधिकारांमध्ये मिळकत धारकांची बँका अथवा वित्तीय संस्थांची बोजे असल्यास त्याची माहिती आपल्याला समजते.

मित्रांनो बरेच वेळा काय होते की आपण जो प्लॉट खरेदी करतो त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलेले असते आणि आपली फसवणूक होते. त्यामुळे सातबारा बघणे आवश्‍यक आहे. त्यामुळे चालू तारखेचा सातबारा उतारा पाहणे व त्याबाबत कायदेशीर सल्लागारांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरते. प्लॉट खरेदी करताना आपण खरेदी करत असलेल्या प्लॉट वर रिझर्वेशन अथवा संपादन याबाबतची माहिती नगर रचना कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्याकडून द्यावी.

प्लॉट खरेदी करताना प्लॉट मिळकतीचे सर्व शासकीय, निमशासकीय कर चालू तारखेपर्यंत भरलेले आहे किंवा नाही? याची शहानिशा करावी. प्लॉटची सरकारी मोजणी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत झाले आहे का? असल्यास त्याची योग्य तो दाखला मिळवावा. प्लॉट मिळकतीबाबत जास्त खपाचा वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन त्या मिळकतीबाबत हरकती मागवाव्यात व वकिलाकडून मिळकतीबाबत तीस वर्षाचा शोध दाखला म्हणजेच ( सर्च रिपोर्ट ) घ्यावा.

सात बारा मधील, कॉलम 2 मधील इतर हक्काची वारसाची बँक बोजाची नोंद आहे काय? याची खात्री करावी. शक्यतो संगणीकृत सातबारा घ्यावा. प्लॉट व बांधकाम परवानगीकरता किती निर्देशांक मिळणार आहे याची वास्तू विशारद यांच्याकडून माहिती घ्यावी. प्लॉट नोंदणीकृत सहकारी गृहरचना संस्थे मधील असल्यास अशा संस्थेकडून त्यांची अटी व शर्ती यांची माहिती घ्या.

आपण आपल्या जागेचा सातबारा चा उतारा नोंद झाल्यानंतर प्रत्येक सहा महिन्यात नंतर माननीय तलाठी यांच्याकडून काढावा व तो जपून ठेवावा. जागा खरेदी झाल्यानंतर सातबारा उतारा नोंद झाल्यानंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे. ताबा घेणे म्हणजेच प्लॉटला चारी बाजूस कुंपण करणे व प्लॉट ला तारेची कंपाऊंड असावे व त्यामध्ये मालकीबाबत चा बोर्ड प्लॉट खरेदी नंतर तात्काळ लावून घ्यावा.

प्लॉट ला ड्रेनेजची व्यवस्था आहे का? याची चौकशी करावी वडिलोपार्जित जमीन असल्यास तोंडी वाटणे पत्र झालेली जमीन खरेदी करू नये. न्यायालय अथवा दुय्यम निबंधक कार्यालयात वाटणी पत्र झालेले असावे. वाटणी पत्रावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात. आपण खरेदी करत असलेल्या प्लॉट मिळकतीचा आजूबाजूचा परिसर, वातावरण याबाबत तर निरीक्षण करणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ प्लॉट च्या जवळ ओढा, नाला जात असल्यास भरपूर पावसानंतर आपल्या प्लॉटमध्ये पाणी साचेल का? प्लॉट च्या आजुबाजुस कचरा डेपो, तत्सम कारखाना, उच्च दाबाची विद्युत वाहणी जात आहे का ? याची माहिती मिळवावी. प्लॉट खरेदी च्या ठिकाणी शाळा, कॉलेज बगीच्या, पोहोच रस्ता, नियोजित रस्ता याबाबतची माहिती मिळवावी.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.