मित्रांनो लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉइंट खात उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची गरज भासते. त्यासाठी आता घरबसल्या तुम्हाला विवाह प्रमाणपत्र कसे काढायचे याची माहिती आपण घेणार आहोत.
तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप करायचे आहे ‘आपले सरकार’ त्यानंतर तिथे दिलेल्या न्युज यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल, नंतर तुमचे रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो आणि तुमचा जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे,
तसेच खाली दिलेला कॅपचा लेटर टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे असे केल्यानंतर तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे ,जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर तिथे दिलेल्या इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषा निवडा
तसेच डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, त्यापुढे तुम्हाला ग्राम विकास व पंचायत राज विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये दारिद्र्यरेषेखालील नोंदणी, एपीएल दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील.
त्यातील विवाह नोंद या पर्यायावर क्लिक करून आपल्याला पुढे जाता येईल तिथे तुम्हाला सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे. तसेच तालुका आणि गावाची नाव देखील निवडायचे आहे. त्या शेजारील असलेल्या पतीचे नाव या रकान्यातमध्ये तुम्हाला नवरदेवाचे म्हणजेच वराचे नाव संपूर्ण टाकायचे आहे तसेच खाली विवाह दिनांक आणि विवाह चे ठिकाण हे टाकायचे आहे
यानंतर नवरदेवाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे तसेच शेजारी दिलेल्या wife name या पर्याया खाली तुम्हाला वधूचे नाव टाकायचे आहे आणि त्यानंतर दिलेल्या wife UPI ID या रकान्यात तुम्हाला वधुचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, वधूचे नाव टाकताना सासरचे नाव तुम्हाला टाकायचे आहे, तसेच वधूचे प्रथम नाव हे शाळेच्या दाखल्यावर जे असेल ते ठेवायचे आहे.
यानंतर खाली दिलेल्या समावेश करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे असे केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल तिथे ok या पर्यायावर क्लिक करायचे आहे. खाली तुम्हाला upload documents हा पर्याय दिसेल तो निवडल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी त्यात पेज ओपन होईल तिथे सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे
ज्याची रुंदी ही 160 पिक्सेल आणि उंची 200 ते 212 पिक्सेल दरम्यान असायला पाहिजे ,तसेच फोटोची साईज 5ते 20 केबी यादरम्यान असायला पाहिजे ,तिथे आधी नवरदेवाचा आणि आणि त्याखाली नवरीचा फोटो निवडायचा आहे. यानंतर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तुमचा अर्ज भरल्याचा तपशील दिसेल.
हे प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी आहेत तो पाच दिवसांचा आहे जे की ग्रामसेवक तुम्हाला देतील खाली दिलेल्या upload documents या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचे विवाह प्रमाणपत्र पाच दिवसांमध्ये ग्रामसेवक तुम्हाला निर्गमित करतील.नंतर येणाऱ्या मेसेज वर ok हा पर्याय निवडा. यानंतर तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह होतील.
शेवटी शासनाचे चलन तुम्हाला भरायचे आहे ,त्यासाठी तुम्ही पेटीएम किंवा एटीएम डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्डचा देखील वापर करू शकता. पैसे भरल्यानंतर दोन-तीन दिवसांनी तुम्हाला पुन्हा एकदा आपले सरकार या पेजवर लॉगिन करून मुखपृष्ठ वर तपासायचे आहे की तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आले आहे का? असे असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
तसेच अशाप्रकारे तुमचं नाव, अर्ज क्रमांक तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करा असे पर्याय तुम्हाला दिसतील, विवाह प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता व त्याची कलर प्रिंट काढू शकता.त्यावर कुठलाही सही शिक्का घ्यायचे तुम्हाला गरज नाही कारण यावर आधीच तुमचे जे ग्रामसेवक आहे त्यांची डिजिटल सिग्नेचर असते. तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे मित्रांचे किंवा तुमचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र घरबसल्या काढू शकता.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,
अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Plz ,
Requisted sir/ mam
Marrage certificate is required
Khupch chan
छान माहिती दिलीत
चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत।विवाहनोंदणी कार्यालयाच्या हेलपाट्यापासून वेळेची बचत होईल।सर्व कागदपत्र असुनही वर वधुला कार्यालयात हजर राहणे अनिवार्य आहे ह्या कारणास्तव नोंदणी करण्यास संबंधीत
गोंदिया नगरपरीषदच्या कारकुनाने नकार दिला। वरवधु पैकी एकाला नोंदणी करता येते की नाही,कागदपत्र व प्रक्रियाची माहिती कृपया कळवावी।धन्यवाद ।
घर पट्टी भरावी लागते का?
ग्राम सेवक ने सांगितले घर पट्टी भरल्या शिवाय marriage certificate नाही मिळणार
It doesnt give option of Mumbai City in this
Mi kel ahe but ajun response nhi milala 1 mahina zala reject pan nhi zal ahe
मला मँरेज सर्टफिकेट काढायचे आहे