♦️ खास महिलांसाठी सोपे घरगुती व्यवसाय तेही शून्य भांडवलात ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून ! ♦️

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

भारतातील बहुतेक स्त्रिया या हाउसवाइफ म्हणून काम करतात. घरातील सर्व कामे संपल्यावर त्यांना काहीतरी घरीच करता येईल असा व्यवसाय करावा वाटतो, पण योग्य संधी आणि भांडवलाच्या अभावामुळे त्यामागे राहतात. काही स्त्रियांकडे या दोन्ही गोष्टी असतात पण त्यांना नेमके काय करावे? हे सुचत नाही. अशा सर्व होतकरू आणि जिद्धी स्त्रियांसाठी आज आपण असे नऊ घरगुती व्यवसाय सांगणार आहे जे घरबसल्या भरपूर पैसा मिळवून देतील.

नं. 1 व्यवसाय – छोटे-छोटे कापड दुकान + शिवणकाम : मोठ्या खरेदीसाठी लोक बाहेर जातात. पण छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी जवळच दुकान असेल तर किती सोयीचे होईल. अशा छोट्या कापडाच्या दुकानाला जर शिवणकामाची जोड लागली तर नक्कीच तुमचा व्यवसाय भरभराटीला जाईल.

नं. 2 व्यवसाय – शिकवणी (ट्युशन) : आजकाल शून्य भांडवलावर आधारित जास्त इन्कम मिळवून देणारा हा व्यवसाय आहे, तो म्हणजेच शिकवणी. सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे मोठ्या ट्युशन मध्ये आपली मुले पाठवण्याची पालकांची मानसिकता राहिली नाही. तुम्ही जर योग्य पात्रता धारण करीत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या सुवर्ण संधीचा मध्ये जर तुम्ही योग्य रिझल्ट दिला, मग तुमचा व्यवसाय भरभराटीला लागला म्हणून समजा.

नं.3 व्यवसाय – भोजन सेवा (टिफिन) : तुम्ही जर चांगला स्वयंपाक करणारे असाल तर हा चांगला व्यवसाय आहे. आजकाल पुरुष कामानिमित्त आणि विद्यार्थी देखील शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. त्यांना घरचे जेवण किंवा घरगुती जेवण हवे असते. अशा लोकांना तुम्ही घरूनच टिफिन पुरवू शकता. तुम्ही जर जेवणाचा दर्जा उत्तम दिला तर हेच लोक तुमच्या व्यवसायाची जाहिरात करतील.

नं. 4 व्यवसाय मुलांना सांभाळणे (बेबी कीपिंग) : आजकाल स्त्रिया नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडत आहेत. अशा वेळेस त्यांना लहान मुलांना घेऊन काम करणे शक्य नसते. शहरांमध्ये भरपूर पाळणाघरे आहेत पण त्यांना आपली मुले संभाळण्यासाठी विश्वासाची आणि खात्रीची व्यक्ती हवी असते. तुम्हाला जर लहान मुलांचे आवड असेल तर तुम्ही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात.

नं. 5 व्यवसाय कागदी किंवा कापडी पिशव्या : मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पॉलिथिनच्या पिशवीवर पूर्णपणे बंदी घातल्याने या दोन्ही पिशव्यांची मागणी बाजारपेठेत वाढलेली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि आकर्षक पिशव्या बनवून तुम्ही हा व्यवसाय मोठा करू शकता.

नं. 6 व्यवसाय – मसाले तयार करणे : घरोघरी आणि दैनंदिन जीवनात जीवनावश्यक वस्तू म्हणून वापरला जाणारा मसाला हा पदार्थ आहे. मसाला बनवण्याचे छोटसं प्रशिक्षण सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एकदा या व्यवसायात तुमचे नाव झाले तर तुम्ही घरगुती फरसाण, दिवाळी फराळ, लाडू, विविध खाद्यपदार्थ पुरवण्याची वाढ तुम्ही यामध्ये करू शकता.

नं. 7 व्यवसाय – परसबाग रोपे : परसबागेसाठी रोपे बऱ्याच लोकांना घरी किंवा गॅलरीमध्ये परसबाग करण्याचा छंद असतो. अशा छंदी लोकांना फुलांच्या झाडाची रोपे पुरवण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता. परसबाग तयार करण्यासाठी तुम्हाला जागा पण खूप कमीच लागते आणि भांडवल सुद्धा कमीच लागते.

नं. 8 व्यवसाय – छंद वर्ग आयोजन करणे : ट्युशन आणि छंद वर्ग यामध्ये फरक आहे. महिलांचे आणि लहान मुलांचे छंद जोपासण्याचे तुम्ही काम करू शकता. जसे हे चित्र काढणे, कागदी वस्तू बनवणे, मायक्रमच्या शोभेच्या वस्तू बनवणे, विविध प्रकारचे घरगुती गिफ्ट बनवणे अशा वस्तू बनवणे शिकवण्याचा छंदवर्ग व्यवसायदेखील तुम्ही करू शकता. अर्थातच तुम्ही या सर्व वस्तू कला असेल तर बाजारातही पुरवू शकता.

नं. 9 व्यवसाय – पाककलेची किंवा इतर पदार्थ बनवणे : धावपळीच्या युगात लग्नसमारंभात लागणारे पदार्थ हे बनवण्यासाठी वेळ नाही. बाजारामध्ये रेडीमेड खरेदी केलेला अशा वस्तू आवडत पण नाहीत. म्हणूनच म्हणूनच तुम्ही असे पदार्थ बनवण्याच्या ऑर्डर घेऊ शकता. यामध्ये फरक असा आहे की हे सर्व पदार्थ बनवण्याचे साहित्य तुम्हाला समोरील व्यक्तीचा पुरवेल.

तुम्हाला फक्त अशा वस्तू बनवून द्यायचे आहेत. त्याबद्दल तुम्ही मनासारखा मोबदला पण घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही अशाप्रकारे अगदी सोपे आणि घरगुती व्यवसाय आहेत जे भांडवली खर्चात आणि कमीत कमी भांडवलात घरबसल्या करता येतात. तर तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन तुमची आवड विचारात घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.