लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीयेत? तर हा लेख तुमच्यासाठीच आहे ! जाणून घ्या उधारी वसूल कशी करावी याबद्दलची महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मित्रांनो जी माणसं साधी सरळ असतात त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय गटातील आहे त्यांना उधारी वसूल करण्यात बऱ्याच अडचणी येत असतात. आपण अनेक वेळा सहानुभूती म्हणून मित्रांना किंवा नातेवाईकांना उधारीवर पैसे देतो. पण आपले हक्काचे पैसे आपणास परत मिळत नाही अशा वेळेस भरपूर त्रास होतो.

उसने दिलेले पैसे न मिळाल्यामुळे फक्त आपणासच नाही तर सर्व घराला मानसिक ताण सहन करावा लागतो. हा त्रास होऊ द्यायचे नसेल तर असे उसने पैसे उधारीवर देण्याअगोदरच काही काळजी घ्यावी लागते, ती कोणती घ्यावी याविषयी आजच्या लेखातून आपण माहिती घेणार आहोत.

१. माणसे ओळखायला शिका : मित्रांनो तुम्ही ज्या माणसाशी आर्थिक व्यवहार करणार आहात, त्या माणसाची पार्श्वभूमी ओळखायला शिका. ज्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही आर्थिक व्यवहार करणार आहात त्याची समाजातील पत, त्याचा स्वभाव या गोष्टीची माहिती प्राप्त करून नंतरच त्यांच्यासोबत व्यवहार करा.

२. माणूस पडताळून पहा : तुम्ही ज्या माणसाला चांगले ओळखत नाही त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्याची वेळ आली, तर त्याला सर्वप्रथम थोडे पैसे द्या समजा त्याने जर दहा हजार रुपये मागितले तर त्याला दोन हजार रुपये द्या, दिलेल्या पैशाची तो माणूस कशी परतफेड करतो हे पहा आणि नंतरच त्याच्यासोबत मोठे व्यवहार करा.

३. नियमावली तयार करा : पैसे उसने देताना किंवा उधारीवर माल देताना तुमची नियमावली तयार पाहिजे. म्हणजे पैसे किती दिवस उधार ठेवायचे एक महिना ? दोन महिने ? हे पक्के ठरवून घ्या. जर वेळेवर पैसा परत दिला नाही तर काही दंड आकारण्याची बोलणी करून ठेवा. म्हणजे दंडाच्या भीती पायी तरी आपली रक्कम वेळेवर परत मिळेल.

४. वसुली यंत्रणा तयार करा : एकदा का मुदत संपली की लगेच त्याचं दिवशी कर्जदाराला फोन किंवा एसेमेस करा. त्याला कळू द्या की तुम्हाला पैशाची किती गरज आहे. त्याला काय वाटेल, आपले संबंध खराब होतील, तो स्वतः आणून देईल, असा विचार करत असाल तर तुमचे पैसे डुबले म्हणून समजा. त्यामुळे न लाजता न घाबरता उधारी मागा कारण उधारी वसुलीत सुरुवातीला तुम्ही ढिले पडला तर बरबाद झाला म्हणून समजा.

५. शेवटची एक संधी द्या : एखादा माणूस फार चांगला असतो. कोणाचे पैसे बुडवू नये अशी त्यांची मानसिकता असते. पण कधीकधी अशा माणसावर सुद्धा एखादे मोठे आर्थिक संकट येऊ शकते. म्हणूनच कर्जदारास एकदा त्याची अडचण अवश्य विचारा. खरंच त्याची अडचण असेल तर त्याला एक संधी द्यायला काहीच हरकत नाही.

६. ब्लॅक लिस्ट तयार करा : तुमच्या परिसरात जे लोक मुद्दामून पैसे बुडतात त्यांचा शोध घ्या तुमच्या विश्वासू मित्रांसोबत चर्चा करून आशा लोकांची यादी तयार करा आणि मरेपर्यंत अशा लोकांसोबत उधारी आर्थिक व्यवहार करू नका.

७. बोभाटा करा चर्चा करा : ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले त्याला सोडू नका. माणुसकी म्हणून माफ करू नका. कारण पैसे बुडून माणूसच नाही हे सिद्ध केलेले आहे. म्हणून ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले त्याची त्याच्या मित्रांमध्ये चर्चा करा. त्याच्या मित्र कंपनी नातेवाईक ही बातमी पसरवा की तो कुठेही गेला तरी त्याला मान वर करून फिरायची लाज वाटली पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण करा मग पहा तुमचे पैसे तुमच्या घरी स्वतःहून आणून देईल. मात्र हा उपाय शक्यतोवर अगदी शेवटी वापर. ह्या उपायाने तुमच्यावरर संकट देखील ओढवू शकते त्यामुळे जरा जपूनच हा पर्याय निवडा.

८. वसुली एजन्सी नियुक्त करा : उधारी वसूल करण्याचा शेवटचा पर्याय मित्रांनो काही माणसे ही निर्लज्जम सदासुखी असतात. त्यांना कोणत्या गोष्टीचे काहीच वाटत नाही. मग अशा माणसाजवळ असलेल्या उधारीवर पाणी सोडू नका. समाजात असेही काही लोक आणि एजन्सी आहे ती उधारी वसूल करून देतात.

या कामासाठी ते मोबदला सुद्धा घेतात. तुमच्या उधारी रकमेतून थोड्याफार पैसे वसुली वसुली एजन्सी साठी खर्च झाले तरी चालेल पण तुमचे पैसे बुडवणाऱ्याला सोडू नका. हे वसुली एजन्सीवाले साम-दाम-दंड-भेद या सर्व मार्गांचा अवलंब करून उधारी थकलेल्या माणसांकडून पैसे वसूल करतात आणि तुमचे पैसे तुम्हाला परत करतात. तर मित्रांनो अशा प्रकारे वरील आठ मार्गाचा अवलंब केला. तर आयुष्यभर तुमची उधारी कोणीही अडवणार नाही.

वरील ८ उपायांव्यतिरिक्त अजून दुसऱ्या दृष्टिकोन घेऊन देखील आपण आपले उधारी दिलेले पैसे परत मिळवू शकतो : 1] सरळ सरळ साध्या शब्दात फॉर्मल मागणी करावी. 2] व्यक्ती समोर येतच नसेल तर साधारण कॉल करणे किवा Text करावे. 3] समोरच्या व्यक्तीच्या घरी माणूस पाठवणे, आणि formal मागणी करणे.

4] कधीही फोनवर, किंवा व्हाट्स अप वर हिंसात्मक भाषा / शिवराळ भाषा वापरू नये. 5] कौल रेकॉर्डिंग होऊन उगाचच अडचण वाढू शकते. 6] कधीही समोरच्याच्या पाहुण्या समोर, नातेवाईकांसमोर किंवा इतर त्रयस्थ व्यक्ती समोर पैशाची मागणी करूच नये, त्यामुळे असा अपमान जिव्हारी लागून वेगळ्या प्रकारे बदल्याची भावना बाळगू शकतात.

7] ऍडव्हान्स चेक घेऊन किंवा बिलावर ग्राहकाची सही घेऊन त्याची कॉपी जवळ ठेवली त तर पुढे फायदा होईल. ८] रिकव्हरी साठी समोरच्याने चेक, DD, पेटीएम, चिल्लर, दहाच्या नोटा, काहीही ऑप्शन दिला तरी तो स्विकारावा. 9] रिकव्हरी एजन्ट हा प्रकार सगळ्यात शेवटीच वापरावा किंवा वापरणे टाळावेच.

10] सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे एखादया प्रतिष्ठीत व्यक्तीस मध्यस्थी घालून आपला दगडाखाली अडकलेला हात काढून घेणे. उधारी वसुली साठी सांगितलेल्या आठ टीप आणि प्रासंगिक दुसरा दृष्टिकोन तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.