सर्च आणि टायटल रिपोर्ट म्हणजे काय ? याची आपल्याला आवश्यकता कधी पडते? लागणारी कागदपत्रे काय? लागणारा कालावधी किती? ।। सर्च आणि टायटल रिपोर्ट कोणी बनवला पाहिजे? किंवा कोणाकडून तयार करून घ्यायचा? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखातून !

कायदा शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सर्च आणि टायटल रिपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे काय? आणि लागणारा कालावधी किती? सर्च आणि टायटल रिपोर्ट कोणी बनवला पाहिजे? किंवा कोणाकडून तयार करून घ्यायचा? याबाबतची सविस्तर माहिती आत्ता आपण पाहणार आहोत.

स्थावर मालमत्तेच्या बाबतीत घर, जागा, प्लॅट, प्लॉट, जमीन, मोकळी जागा किंवा शेतजमीन इत्यादी प्रकारच्या स्थावर मालमत्तेच्या बाबतीत ती प्रॉपर्टी निरवित आणि निरजोखमी असल्याचा निर्वाळा चा दाखला म्हणजेच सर्च आणि टायटल रिपोर्ट असे आपल्याला म्हणता येईल.

टायटल आणि सर्च रिपोर्ट याची आपल्याला कधी आवश्यकता लागते?

तर टायटल आणि सर्च रिपोर्ट ची आवश्यकता ही जमिनी, शेतजमिनीच्या किंवा त्या प्रॉपर्टीच्या व्यवहाराच्या वेळेस, खरेदी-विक्रीचे व्यवहारा च्या वेळेस किंवा अजून दुसऱ्या प्रकारचा जो काही व्यवहार असेल त्यामध्ये आपल्याला टायटल आणि सर्च रिपोर्ट ची आवश्यकता भासते. त्या नंतर जर सदर स्थावर मालमत्तेवर  आपण किंवा सदर प्रॉपर्टीवर जर आपण बँकांकडून लोन घेत असेल किंवा फायनान्स कंपनी कडून जर आपण लोन घेत असेल,

तर त्यावेळी सुद्धा आपल्याला बँक किंवा फायनान्स कंपनी आपल्याला टायटल आणि सर्च रिपोर्ट मागत असतात. त्यानंतर टायटल आणि सर्च रिपोर्ट ची अजून एक आवश्यकता कुठे पडते? तर, जर अशा प्रकारच्या मोकळी जागा,शेतजमीनी किंवा जे काही काय प्लॅट आहे प्लॉट आहे त्या प्लॉट वरती किंवा मोकळ्या जागेवरती जर आपल्याला एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल,

एखादी योजना जर तिथे  करायची असेल आणि विकसित करायची असेल ती जागा तर त्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या शासनाच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तर अशा प्रकारच्या परवानगी घेण्यासाठी आणि विविध प्रकारच्या योजना त्या स्थावर मालमत्तेच्या प्रॉपर्टीमध्ये राबवण्यासाठी त्यावेळी सुद्धा आपल्याला सर्च आणि टायटल रिपोर्टचे डिमांड त्या ठिकाणी होत असते.

तर अशा प्रकारे स्थावर मालमत्तेच्या बाबतीत सर्च रिपोर्ट हा जो कागद असतो तो खूप महत्त्वाचा, खुप इम्पॉर्टंट असा दस्तावेज असतो. तर सर्च आणि टायटल रिपोर्ट यासाठी आपल्याला सुद्धा जर सर्च आणि टायटल रिपोर्ट काढायचा असेल, तर त्यासाठी आपण वकिलांना कुठल्या प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतात किंवा काय सबमिशन त्यांना आपण केली पाहिजे आणि त्याला किती वेळ लागू शकतो?

तर कुठल्याही प्रॉपर्टी च्या बाबतीत मालकी हक्काबाबत जे सर्व पेपर असतात, ते सर्व पेपर, डॉक्युमेंट्स, सातबारा, फेरफार आणि विविध प्रकारचे पूर्वीपासूनचे जे काही कागदपत्रे आपल्याकडे असतील ते कागद व सर्व कागदपत्रांची एक फाईल तयार करून आपण वकिलांकडे द्यावी लागत असते आणि त्याच्यासाठी कमीत कमी सात दिवसाचा वेळ लागतो.

कमीत कमी सात दिवसाचा वेळ असतो किंवा जास्तीत जास्त त्यांनी वीस दिवस किंवा एक महिना सुद्धा लागू शकतो. जर समजा प्रॉपर्टीमध्ये इमिटेशन जास्त असतील,तर वारसांची नाव जास्तीत जास्त असल्यामुळे त्याला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो. तर, अशा प्रकारे सर्च आणि टायटल रिपोर्ट हा बनवून घ्यायचा असतो.

सर्च रिपोर्ट कोणी बनवला पाहिजे?

सर्च रिपोर्ट हा तज्ञ वकिलांकडूनच, असे जे कोणी स्थावर मालमत्तेच्या बाबतीत प्रावीण्य प्राप्त केलेले वकील मित्र असतात. त्यानंतर रियल इस्टेट मधील काम करणारे वकील मित्र असतात, सीनियर एडवोकेट असतात. अशा वकिलांनी च फक्त सर्च रिपोर्ट तयार केला पाहिजे बनवला पाहिजे. आणि तयार करून घेणार्‍यांनी तो अशाच व्यक्तींकडून तज्ञ वकिलांकडून तयार करून घेतला पाहिजे.

तर , सर्च रिपोर्ट च्या कागदपत्रांची जी फाईल आहे ती वकिलांकडे दिल्यानंतर पेपर नोटीस पब्लिक पेपर नोटीस म्हणजे दैनिक वृत्तपत्र जे काय असते त्यामध्ये सदर प्रॉपर्टी च्या बाबतीत जाहीर नोटीस देणे. आणि त्याबाबत चा खुलासा करणे, वेरिफिकेशन करणे हे एक महत्त्वाचे समजले जात.

त्या नोटिसचा पिरेड हा कमीत कमी सात दिवसाचा असतो किंवा पंधरा दिवसाचा असतो किंवा 21 दिवसांचा सुद्धा असू शकतो. मग त्या ठराविक कालावधीत जर समजा संबंधित वकिलांना जर ऑब्जेक्शन कुणाचे आले नाही किंवा कोणाची हरकत आली नाही तर कुणाचे काही हितसंबंध त्यामध्ये नाही असे गृहीत धरले जाते आणि त्या नोटीस चा संदर्भ घेऊन सुद्धा त्या सर्च रिपोर्ट मध्ये तसं मेंशन केला जात.

त्यानंतर सर्च रिपोर्ट तयार करताना जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय (सब रजिस्टर ऑफिस) यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सदरचे वकील हे रिसीट तयार करत असतात. त्या सर्च बाबतचे पावती घेत असतात आणि शासकीय त्यामध्ये पैसे आकारून ती पावती घेऊन,संबंधित प्रॉपर्टीच्या सर्वे नंबर च्या बाबतीत   तिथे त्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन मॅन्युअल सर्च करत असतात.

सर्व कागदपत्रे व्हेरिफाय करत असतात आणि अशा प्रकारचा ते सर्च रिपोर्ट घेत असतात. त्यानंतर ऑनलाईन सर्च चा एक प्रकार असतो. ऑनलाईन मध्ये सुद्धा कमी दिसतात का? सदर प्रॉपर्टीच्या बाबतीत काही कुठे आढळतात का? कोणाला गहाण लीज अशा प्रकारे त्या प्रॉपर्टीवर काही आहे का?  हे सगळं व्हेरिफाय करत असतात

आणि अशा प्रकारे सगळ व्हेरिफाय केल्यानंतरच वकील त्या प्रॉपर्टीच्या  संदर्भात सर्च आणि टायटल रिपोर्ट देत असतात. टायटल रिपोर्ट देताना त्या रिपोर्टच एक विशिष्ट प्रकारच फॉरमॅट असतं. त्यामध्ये त्या प्रॉपर्टीचा विस्तृतपणे वर्णन असतं. प्रॉपर्टी मालकाच संपूर्ण नाव, पत्ता अशाप्रकारे प्रोपर्टी चे संपूर्ण हिस्ट्री त्यामध्ये येत असते.

प्रॉपर्टी आत्ताच्या मालकाकडे कोणाकडून आली? त्यांच्याकडे कोणाकडून आली? अशा प्रकारे  ती सर्व हिस्ट्री त्यामध्ये मेंशन केलेली असते आणि सर्व प्रकारची हिस्टरी मेंशन करून नंतर मग वकिलांचा ओपिनियन म्हणून एक पार्ट सुरू असतो त्यामध्ये एडवोकेट मेन्शन करत असतात की, त्यांना त्या प्रॉपर्टी बद्दल काय वाटतं? ते त्यामध्ये असत. अशाप्रकारे सर्च आणि टायटल रिपोर्ट बनवला जातो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा