भाडेकरार म्हणजे काय? भाडेकरार (रेंट अग्रीमेंट) मध्ये कुठल्या बाबींचा उल्लेख आवश्यक आहे, भाडे करार करताना घरमालकाने आणि भाडेकरूने कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या !

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

घर भाड्याने देताना व घेताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे भाडेकरार. ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेंट अग्रीमेन्ट असे म्हणतो. भाडेकरार म्हणजे काय? भाडे करार करताना कोणती काळजी घ्यावी, भाडेकरार मध्ये कुठल्या बाबींचा उल्लेख आवश्यक आहे, भाडे करार करताना घरमालकाने आणि भाडेकरू कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

प्रथम आपण भाडे करार रेंट अग्रीमेंट म्हणजे काय हे जाणून घेऊया. कोणतेही घर भाड्याने देताना किंवा घेताना घरमालक व भाडेकरू यांच्या मध्ये झालेला लेखी करार म्हणजे भाडे करार होय. घर मालक तसेच भाडेकरू ह्या दोघांचंही हित जपण्यासाठी हा करार केला जातो.

हा करार साधारण अकरा महिन्यासाठी केला जातो. रजिस्त्रेशन ऍक्ट 1908 नुसार, भाडे करार जर बारा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी चा असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक ठरते. हा करार जागेचा मालक आणि भाडेकरू यांच्यातील लिखित करार असतो आणि तो दोन्ही पक्षांच्या हिताचा असतो.

घरावर हक्क सांगणारा व्यक्ती हा एक तर घराचा मालक असायला हवा किंवा घराच्या मालकाने त्याला त्या जागेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार म्हणजे मुखत्यार पत्राद्वारे ज्याला पण इंग्रजीमध्ये पावर ऑफ अटॉर्नी म्हणतो त्याद्वारे त्या व्यक्तीला दिलेला असावा. भाडे करारामध्ये अटी व शर्ती नमूद केलेल्या असतात जसे की घराचा पत्ता, प्रकार आणि क्षेत्रफळ तसेच मासिक भाडे व सुरक्षा ठेव रक्कम ज्याला इंग्रजीमध्ये आपण सिक्युरिटी डिपॉजिट म्हणतो ते किती असेल ते संमतीने ठरविल्या जाते व तसा उल्लेख केला जातो.

Guidelines For New Property Handover Procedure | New Property Board

घर कोणत्या कारणाने आणि काय उपयोग यासाठी भाड्याने घेण्यात येत आहे आणि करार किती कालावधीसाठी वैध आहे या गोष्टी लिहिलेल्या असतात. करारावर घर मालक व भाडेकरू यांच्या सहमतीनेच स्वाक्षऱ्या केल्या जातात. एकदा या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या की त्या दोघांना पाळणे बंधनकारक होते.

या करारामध्ये काही बदल करायचा असेल तर तो दोन्ही पक्षांच्या स्वाक्षरी पूर्वी केला जातो एकदा स्वाक्षऱ्या या झाल्या की त्यात कोणताही बदल केला जात नाही. जर कुठल्याही प्रकारच्या बदलाचा प्रस्ताव घर मालक किंवा भाडेकरूंच्या मार्फत ठेवला गेला तर एक महिना अगोदर नोटीस देणे आवश्‍यक असते, किंवा किती महिने अगोदर नोटीस दिली जाईल याचा करारात उल्लेख केलेला असतो.

याच करारामध्ये करार संपुष्टात आणण्याच्या अटी सुद्धा नमूद केलेल्या असतात. करार करताना घ्यावयाची काळजी : भाडे करार करताना घर मालक व भाडेकरू या दोघांचे नाव तेच लिहावे हे शासकीय दस्तावेज उदाहरणार्थ आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड यावर असेल. प्रॉपर्टीचा पत्ता देतानाही अधिकृत असावा.

शक्य झाल्यास सोबत नकाशाही लावावा. तसेच दोघांच्या आधार कार्ड व प्यान कार्डची प्रत जोडावी. करारात भाडे देण्याची दर महिन्याची तारीख नमूद करावी. जर उल्लेखित तारखेस भाडे दिले नाही तर प्रति दिवशी किती दंड आकारला जाईल याचाही उल्लेख असावा. शक्यतो भाडे चेक, आरटीजीएस, एनइफट ने घ्यावे यामुळे घरमालकास सरकारला द्यावा लागू शकतो मात्र तो योग्य आहे.

Handover Inspections | Practical Completion & New Home Inspections | Handovers.com

यामुळे एक फायदा असा होईल की आपला भाडेकरार अधिकृत असल्याचा पुरावा होईल. भाडे करार करताना कमीत कमी दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे. भाडे करारामध्ये उल्लेख करावयाच्या आवश्यक बाबी : भाडेकरार मध्ये घराचा पत्ता व्यवस्थित नमूद करणे गरजेचे आहे, घर कुठल्या तारखेपासून व किती महिन्यासाठी भाड्याने असणार आहे तसेच पाणी वीज बिल घराचा टॅक्स कोण भरणार याचा स्पष्ट उल्लेख असावा.

भाडे देण्याची दर महिन्याची तारीख नमूद केलेली असावी. घरामध्ये कोण कोणते सामान, सुविधा आहेत उदाहरणात पंखा, गिजर, फर्निचर यांचाही उल्लेख केला गेला पाहिजे. दुरुस्ती ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेंटेनन्स म्हणतो याची जबाबदारी कोणाची असेल याचाही उल्लेख असावा सुरक्षा ठेव रक्कम किती असणार ते केव्हा परत करणार याचाही उल्लेख असावा.

भाड्याने देण्यात येणाऱ्या घराच्या उपयोगाबाबत स्पष्ट उल्लेख असावा उदाहरणार्थ घर भाड्याने घेतले तर त्याचा उपयोग निवासी वापरासाठी आहे असा उल्लेख करावा इतर उपयोग केला. उदाहरणार्थ व्यवसायिक कार्यालय तर तो कराचा मांडल्या जाईल व घरमालक भाडेकरू कडून रिकामे करून घेऊ शकतो

भाडे करार करताना घरमालकाने घ्यावयाची काळजी : घरमालकाने भाडेकरूची निवास त्याची पार्श्वभूमी तो भाडे देण्यास सक्षम आहे का हे तपासले पाहिजे. जर २-३ महिन्यानंतर भाडेकरूने भाडे थकवले तर, घरमालकास घर रिकामे करून घेण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो.

घरमालकाला भाडेकरूची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे. भाडे करार करताना भाडेकरूने घ्यावयाची काळजी : भाडेकरूने भाड्याने घेत असलेल्या घराचा काही वाद आहे का किंवा त्यावर न्यायालयाने स्टे आणला आहे का हे तपासले पाहिजे अन्यथा फसवणूक होऊ शकते.

भाडेकरूने हेही तपासले पाहिजे की ज्या व्यक्तीकडून घर भाड्याने घेत आहे, तोच खरा घराचा मालक आहे का? नसेल तर त्याला त्या जगेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मुखत्यार पत्राद्वारे (पॉवर ऑफ अटॉर्णे) त्या व्यक्तीला दिला असावा. जर हे तपासले नाही तर घराचा मूळ मालक विना नोटीस घर सोडण्यास भाग पाडू शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.