एकेकाळी खिशात फक्त 500 रुपये, आता आहेत 300 कोटींंचे मालक !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

1982 साली कोइंबतुर मधून 500 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या मुलाने आज 3300 करोड रुपयाची उलाढाल असलेली कंपनी मुंबईमध्ये उभी केली. रजनीकांतच्या एखाद्या दक्षिनांत चित्रपटात शोभावी अशी ही कथा आहे. थायरोकेअरच्या डॉक्टर वेलुमनी यांची.डॉक्टर वेलुमनी हे पदवीत्तर होऊन मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याकडे ना कोणाची ओळख होती ना पैसे होते.मुंबईत सलग पाच रात्री ते व्हीटी स्टेशनला झोपले होते.

दिवसाला पाच रुपये अशा हिशोबाने पुढचे म्हणजे शंभर दिवस पुरतील एवढीच रक्कम म्हणजे फक्त पाचशे रुपये होते.मुंबईत काही दिवस स्ट्रगल केल्यानंतर त्यांना बीएआरसी नावाच्या कंपनीमध्ये सरकारी नोकरी मिळाली.सरकारी नोकरी करत असताना वेलुमनी यांनी थायरॉईड या विषयावर पीएचडी केली. बीएआरसी कंपनीमध्ये वेलुमनी यांना विचारलं गेलं होत की थायरॉईड ग्रंथी कुठे असतात? आणि याच उत्तर त्यांना माहीत नव्हत.

arokiaswamy velumani foundert hyrocare

 

बरोबर दहा वर्षांनी 1992 साली त्याच वेलुमनी यांनी थायरॉईड याच विषयावर पीएचडी केली. चांगली नोकरी,घर, संसार अस त्यांचं आयुष्य आता सेटल झाल होत, मोठ्या पदावरून ते निवृत्त झाले असते पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.बीएआरसीमध्ये 14 वर्ष काम केल्यावर एक दिवस त्यांच्या बॉस बरोबर कशावरून तरी त्यांचे मतभेद झाले,त्यांचं बॉस त्यांना म्हणाला की मी बॉस आहे,मी सांगितलं आहे तस कर.

तस म्हंटल तर हे वाक्य फार मनाला लागण्यासारख न्हवत,पण वेलुमनी हे जरा वेगळेच आहेत.हे वाक्य त्यांना खटकल आणि त्यांनी पुढच्या वीस सेकंदात, होय फक्त वीस सेकंदात त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.संध्याकाळी येताना ते राजीनामा देऊनच घरी आले.वयाच्या 37 व्या वर्षी दोन लहान मुले असताना आणि पुढे की करायचे आहे हे काहीच ठाऊक नसताना असा निर्णय कोणी घेत नाही,पण वेलुमनी नक्कीच वेगळे होते.

यापुढे नोकरी करायची नाही एवढं त्यांनी पक्क केल होत.नोकरी सोडल्यावर हातात थायरॉईडची विषयाची डिग्री आणि पीएफचे मिळालेले दोन लाख रुपये एवढंच त्यांच्याकडे होत. त्याकाळी थायरॉईड टेस्ट फार महाग होत्या. डॉक्टर वेलुमनी यांना वाटले की मी या टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या तर त्या स्वस्तात उपलब्ध करून देता येतील.

आणि या केवळ विचाराने एक दुकानात थायरोकेअरची स्थापना झाली. डॉक्टर वेलुमनीना व्यवसायात मदत करणारी त्यांची पहिली कर्मचारी त्याची बायको होती.आणि मुख्य म्हणजे त्यांनी आपली स्टेट बँक मध्ये चांगली नोकरी नवऱ्याला मदत करण्यासाठी सोडली. आज तीस वर्षानंतर थायरोकेयर ही जगातील सगळ्यात मोठी थायरॉईड टेस्टिंग लॅब आहे.

नवी मुंबईमध्ये त्यांनी जगातील सर्वात मोठी आणि आधुनिक लॅब बनवली आहे.त्यामध्ये दररोज दोन लाख टेस्ट केल्या जातात.डॉक्टर वेलुमनी यांनी महाकाय यश मिळवलं त्याची केवळ यशोगाथा न गाता त्यामागे एक पद्धत आहे. वेगळा विचार करा.थायरोकेअरची सुरवात झाली तेव्हा टेस्टिंग मशिन खूप महाग होत्या.त्यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते.

Thyrocare Technologies Ltd. | Linkedin

पण थायरॉईड संबंधित एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती की बऱ्याच वेळा मशीन दिवसभर उभी असते,आणि दोन ते तीनच टेस्ट त्यामध्ये होतात,त्यांनी ज्यांच्याकडे अशा काही टेस्टिंग मशीन होत्या त्या लॅब्सला संपर्क केला आणि त्यापैकी एकाकडून ती मशीन भाड्याने घेतली. वेलुमनिनी त्या लॅबला सांगितले की तुमचे जेवढे टेस्ट असतील त्यांनी मोफत करून देईल,आणि त्यासोबत तुम्हाला मशीन चे भाडे पण देईन. एवढी चांगली ऑफर नाकरण्यासारखी नव्हती आणि त्यामुळे वेलुमनिना महाग मशीन स्वस्तात भाड्यानी वापरायला मिळाली.प्रत्येक उद्योजकाला अशा प्रकारचे अडचण येतेच.

प्रत्येक वेळेस पैसा हेच उत्तर असत अस नाही तर वेगळा विचार करूनसुद्धा आपल्याला प्रश्न सोडवता येतात. आपल्या स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करणं महत्त्वाचं आहे.वेलुमनी यांनी एमबीए केलं नव्हतं ते वैज्ञानिक होते पण टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक शिकलो अस ते नेहमी सांगतात. त्यांच्या मधल्या बिसनेस मॅनने ओळखलं होतं की दिवसभर पडून राहणाऱ्या मशीद व अकार्यक्षमता जर दूर केली तर जास्तीत जास्त लोकांना हि सेवा कमीत कमी किमतीत देता येईल. एका टेस्टचे 600 रुपये घेतले जात होते, जेव्हा वेळूमनी यांनी फक्त 100 रुपयांमध्ये टेस्ट करून द्यायला सुरुवात केली होती.

वेलूमनी यांनी आणखीन एक गोष्ट बदलली त्याची बायको दिवसा काम करायची आणि ते रात्री काम करायचे असं करून त्याने टेस्टचे रिझल्ट दुसऱ्या दिवशी ग्राहकांना द्यायला सुरुवात केली. कमी किंमत आणि तरीही उत्तम सर्विस यामुळे थायरोकेअर चे नाव आणि व्यवसाय वाढू लागला.जेव्हा थायरोकेअर मार्केट पेक्षा किंमती खूप कमी केल्या तेव्हा बऱ्याच लोकांनी वेलुमानिना सांगितले,की ती चूक करत आहेत.

अशा नी तो बिझनेस कधीच चालणार नाही असे बऱ्याच लोकांनी सांगितले. पण वेलुमणी आपल्या मतावर ठाम होते. कमी किंमतीमुळे त्यांचा बिजनेस खूप वाढला त्यामुळे सप्लायर्सकडून त्यांना चांगल्या सवलती मिळू लागल्या.पैसा कस्टमरकडून नव्हे तर सप्लायर्स कडून कमवायचा असतो हा नवा फंडा वेलूमनी यांनी सांगितला. आणि तो जगाला यशस्वी करून दाखवला.

एका पेपर वाचत असताना त्यांच्या लक्षात आले की जसे वर्तमानपत्रातील बातम्या देशभरातून एका ठिकाणी येतात आणि मग मग रातोरात छापून पुन्हा वर्तमानपत्र देशभरात पाठवले जाते,अगदी असाच मॉडेल थायरॉईड टेस्टच्या बिजनेसमध्ये वापरले जाऊ शकते असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते वापरून दाखवले. मुंबईमधील वाशी येथे थायरोकेअरची दोन लाख स्क्वेअर फुटाचे सेंट्रल लॅब आहे. देशभरातील सातशे शहरांमध्ये पसरलेले थायरोकेअर फ्रॅंचाईजी दररोज लाखो सँपल विमानाने वाशीच्या लॅबमध्ये पाठवले जातात.रातोरात टेस्ट केल्या जातात आणि रिपोर्ट ऑनलाइन उपलब्ध केले जातात.

सर्व फ्रॅंचाईजी दुसऱ्या दिवशी रिपोर्टची प्रिंट घेऊन ग्राहकांना ते देऊ शकतात.आणि यांनी तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात पहिल्यांदा केला.पूर्णपणे स्वयंचलित टेस्ट, ऑनलाइन सर्व्हर्स मध्ये रिपोर्टची साठवण, टेस्ट ट्यूब बारकोड ट्रेकिंग, विमानाने सॅम्पलची ने आण यामुळे थायरोकेयर स्पर्धकांचे इतकी पुढे गेली त्यांना गाठणे दूरच त्यांच्या जवळपास जाणारी कोणतीही कंपनी सध्या भारतात नाही.मुळात वेलुमनी नेहमी सांगतात की माझी कंपनी ही खरं तर एक आयटी आणि लॉजिस्टिक्स कंपनी आहे.

Arokiaswamy Velumani founder, chairman and managing director of Thyrocare Technologies Ltd.

फोकस. थायरोकेअरबद्दल मला सर्वात जास्त आवडलेला कोणता मुद्दा म्हणजे त्यांचा फोकस आहे.वेलूमनी यांनी नेहमी आपला बिजनेस मॅकडोनन्स सारखा आहे असं सांगतात.मॅकडोनन्स फक्त बर्गर विकते ते डोसा किंवा चायनीज विकू शकतात पण ते विकत नाही.कारण त्यांनी एकाच प्रोडक्टवर फोकस केला.यांनी यांनीसुद्धा सर्व स्टेज करण्यापेक्षा फक्त थायरॉईड टेस्ट वर फोकस केला.या टेस्ट रिपोर्ट मध्ये फक्त आकडेवारी असते जी संगणक करू शकतो.

अशा टेस्टवर फोकस केल्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी थायरोकेअरवर ऑटोमॅटिक करता आल्या,आणि एवढ्या सॉलिड फोकस मुळे आता थायरॉईड म्हटलं की लोकांना थायरोकेअरच आठवतो. एवढा मोठा हा ब्रँड बनला आहे. शरीरातल्या केवळ 15 ग्रॅम ग्रंथीवर फोकस करून विलोमनी यांनी आणि तीन हजार करोड चा ब्रँड बनवायला.
पीपल मॅनेजमेंट. वेलुमानीयांनी एकट्याने सुरुवात केली होती पण कंपनी मोठी करण्यात त्यांच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचं मॅनेजमेंट अतिशय चांगला आहे.

जेव्हा ते पदवीधर झाले तेव्हा ते एका इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा त्यांना तिथे त्यांना अनुभव नव्हता म्हणून जॉब दिला नाही. वेलुमानिनी मात्र फक्त फ्रेशर्सला आपल्या कंपनीत जॉब देण्याची पॉलिसी ठेवली.त्यांच्या कंपनीत जॉब करणाऱ्याचा तो पहिला जॉब असतो,त्यामुळे सर्व कर्मचारी उत्साहाने काम करतात, आणि त्यांना ट्रेनिंग देणे सोपे होते. त्यांचं घर हे त्यांच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर आहे.

जास्तीत जास्त वेळ लॅबमध्ये आणि ऑफिसमध्ये घालता यावा म्हणून ते तिथे राहतात. अजूनही 14 तास दररोज काम करतात. कर्मचाऱ्यांना मोटिवेट करणारे भाषणे ते देतातच पण त्यासोबत त्यांच्यासोबत काम करने,जेवणे हे देखील करतात. नवीन लग्न झालेल्या कर्मचाऱ्यांना जोडीदारासोबत ते जेवनासाठी घरी बोलतात.एक हजार कर्मचाऱ्यांचा कुटुंब ते बापाच्या मायेने सांभाळत आहेत. थायरोकेअरचा आयपीओ हा भारतातील सर्वाधिक सबस्क्राईब झालेला आयपीओपैकी एक आहे.शरीरातील 15 ग्रॅमच्या ग्रंथीवर काम करून तीन हजार करोडचा ब्रँड उभा करणाऱ्या डॉक्टर वेलुमनी यांची यशोगाथा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.