केंद्र सरकार जनतेला देत आहे 2.67 लाख रुपये! तुम्हाला पण हा मेसेज आला आहे का? जाणून घ्या तथ्य.

बातम्या

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये केंद्र सरकार एका योजनेअंतर्गत सर्व लोकांना २.६७ लाख रुपये देत असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल मेसेज व्यतिरिक्त आणखी एक मेसेज चालू आहे ज्यामध्ये सरकारी योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात 2,67,000 रुपये जमा झाल्याचे लिहिले आहे. काय आहे यामागचे तथ्य? तुम्हाला असा मेसेज आल्यास काय करावे? याबाबत या लेखात आपण माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हा मेसेज खरा आहे का?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) वस्तुस्थिती तपासली असता त्याचे सत्य समोर आले आहे. मोबाईलवर आलेला हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच सरकार अशी कोणतीही योजना चालवत नसून अशा फॉरवर्ड मेसेजशी सरकारचा काहीही संबंध नसल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

तुम्हाला मेसेज आला असल्यास काय करावे?

सरकारी योजनेंतर्गत तुमच्या खात्यात २.६७ लाख रुपये जमा झाल्याचा दावा करणारा मेसेज तुमच्या मोबाईलवर आला असेल, तर सावधान. पीआयबीने म्हटले आहे की, सरकारी योजनेच्या नावाने असे फसवे संदेश पाठवले जात आहेत आणि त्यानंतर तुमचे बँक खाते त्यातून रिकामे केले जाऊ शकते, त्यामुळे अशा संदेशांपासून दूर राहा. तुम्हाला असा संदेश आल्यास त्वरित तो डिलिट करावा ज्यामुळे पुढील कोणताही अनुचित प्रकार रोखला जाईल.

कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करणे टाळा :

सरकारी योजनेंतर्गत २.६७ लाख रुपये मिळवण्याचा दावा करणाऱ्या मेसेजसोबत एक वेब-लिंक देखील दिली जात आहे. या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. पीआयबीने असे संदेश टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि मेसेज मध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. अशा लिंकवर क्लिक केल्याने तुमची महत्वपूर्ण माहिती हॅक होण्याचा धोका आहे.

या पूर्वीही Viral झाले आहेत असे मेसेज : 

सरकारी योजनेंतर्गत पैसे देण्याबाबतचा मेसेज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक मेसेज समोर आले असून या माध्यमातून अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले आहेत. त्यामुळे सावधानता बाळगा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.