अपयशी लोकांच्या 7 सवयी ।। ह्या सवयी तुमच्यातही असतील तर वेळीच सवय बदलून स्वतःला सावरा ।। वेळीच सावध व्हा !

लोकप्रिय

अपयशी लोकांच्या 7 सवयी: या सवयी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देत नाहीत. जाणून घेऊया कोणत्या सवयी आहेत आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकता. कोणतीही व्यक्ती आयुष्यात यशस्वी किंवा अपयशी होणार की नाही याच्या सवयींवर अवलंबून असते. अशा काही सवयी असतात ज्या तुम्हाला कधीच श्रीमंत किंवा यशस्वी होऊ देणार नाहीत. आणि जर तुम्ही या सवयी सोडून दिल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

श्रीमंती किंवा गरिबी कोणाच्याही भाग्यावर अवलंबून नसते. ते अवलंबून असते तुमच्या हार्ड वर्क आणि तुमच्या मेहनतीवर. गरिबी श्रीमंती ही फक्त तुमच्या कामाच्या रिझल्ट वर अवलंबून असते आणि म्हणूनच तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या सवयी ज्या आजपासून तुम्हाला सोडव्या लागतील:

1)टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडिया: कधी श्रीमंत लोकांना पाहिले का की टीव्ही पाहण्यात, मोबाईल मध्ये किंवा सोशल मीडिया बघण्यात त्यांचा वेळ वाया घालवतात? टीव्ही बघून, सोशल मीडिया वापरून किंवा फक्त या नेत्याने फोटो अपलोड केलाय म्हणून ते लाईक करून त्यांना फॉलो करून काही होणार नाही.

उलट तुम्ही तुमचा जास्त वेळ टीव्ही मोबाईल हातात घेऊन तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. जसे की शरीरातील चरबी वाढते, ताणतणाव आणि मानसिक तणाव आणि हे सायंटिफिकली प्रूफ झाले आहे की फक्त टीव्ही पाहून आणि रात्र रात्रभर मोबाईल यूज करून तुमचे विचार करण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

आणि जर तुम्हालाही आयुष्यात सक्सेस व्हायचे तर टीव्ही आणि मोबाईल जास्त वेळ बघणे बंद करा. कारण तुम्ही अशा गोष्टींमुळे तुमचा वेळ वाया घालवता ज्यातून तुम्हाला काही शिकायला पण मिळत नाही. म्हणूनच अशा गोष्टींसाठी वेळ द्या ज्या गोष्टीतून तुम्हाला काही तरी शिकायला मिळेल.

2) अनहेल्दी जेवण : अपयशी लोक त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्यांना खूप प्रकारचे वाईट आजारही होतात. मी असं म्हणत नाही की तुम्हीअनहेल्दी जेवण खाऊन यशस्वी होऊ शकत. परंतु तुम्ही अनहेल्दी जेवण जेवणात घेतल्यानंतर तुम्ही तंदुरुस्त राहू शकत नाही

आणि एक संशोधना नुसार बाहेरचे अन्न खाल्याने हृदयाचे चार ते पाच मोठ मोठे आजार माणसाला होतात. आणि याचं दुसरं कारण असं की तुम्ही चांगले जेवण केल्याने तुमची हेल्थ पण खुप चांगली राहील आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग रहाल. तर यशाच्या मार्गावर तुमच्यासाठी खुप सोप्पे होऊन जाईल.

3) फालतू शॉपिंग: गरीब लोक त्याही गोष्टी विकत घेऊन येतात जी त्यांना काहीच कामाची नसतात. आणि अशा अनेक गोष्टी खरेदी करून आणतात ज्या फक्त दिखाव्यासाठी असतात, शोसाठी असतात. यामुळेच ते लाईफ मध्ये कधीच पुढे जात नाहीत. दुसरीकडे श्रीमंत लोक त्याच गोष्टी विकत घेतात ज्या गोष्टींची त्यांना खूप गरज असते.

4) उशिरा उठण्याची सवय: उशिरा उठण्याची सवय अयशस्वी लोकंमध्ये खूप दिसून येते आणि त्या जागेवरचा सक्सेसफुल लोक लवकर झोपी जातात आणि लवकर उठतात. तुम्ही सुद्धा कधी ट्राय करून बघा, सूर्योदयच्या आधी अंथरुणातून बाहेर कधी येऊन बघा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती पॉझिटिव्हिटी येऊ लागेल.

5)व्हार्टच्युअल गेम्स प्रेमी: ही ती लोक आहेत ज्यांना गेम्स बघणे खूप आवडतं, पण खेळायचं नाही. तुमच्यातील खूप लोकांना वाटेल की चुकीचा आहे पण जर तुम्हाला खरच गेम्स आवडतात ना तर ते बघण्यापेक्षा स्वतः खेळा. उदा. तुम्ही क्रिकेट खूप बघता पण फिफ्टी-फिफ्टी ची एक मॅच आठ तासाची असते आणि आठ तास मॅच बघून तुम्हाला काय मिळतं? या जागेवर तुम्ही एकदा जरी ग्राउंडवर जाऊन मॅच खेळली तर तुमचं शरीर फिट राहील आणि आयुष्यात नेहमी कोणतेही काम करण्याची इच्छा तुमच्या मनात नेहमी उत्साहाने येत राहील.

6) दुसऱ्याला नेहमी ब्लेम करणे: असे लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत. स्वतःची कितीही मोठी चूक असली ना तरी ते लोक दुसऱ्यालाच नाव ठेवतात की त्यांने ही चूक केली मी केली नाही आणि त्याच जागेवर सक्सेसफुल व्यक्ती आपली चूक कबूल करून त्या चुकांमध्ये सुधारणा करतो आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो. आणि अपयशी लोक नेहमी स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याला त्याला नेहमी ब्लेम करत असतो.

7) विश्वास: अपयशी लोक याच एका मोठया कारणा मुळे अपयशी होतात. कोणत्याही कामावर त्याचा स्वतः वर विश्वास नसतो आणि तो नेहमी अपयशी ठरत असतो आणि त्या जागेवर यशस्वी लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवून आपल्या कामावर परिपूर्ण फोकस करतो आणि मग त्या लोकांचे रिझल्ट तुमच्यासमोर आणि या समाजासमोर दिसून येतात आणि अशा लोकांना समाजात खूप पसंत केलं जातं. जर तुम्ही या सवयी सोडून दिल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.